Categories

Aeroplanes

Aeroplanes

Showing posts with label यु.के.. Show all posts
Showing posts with label यु.के.. Show all posts

Wednesday, 4 March 2009

सनी डे ...

कालच्या सोमवारी एकडे मस्त सनी डे होता... म्हटले औफिसला चाली - चाली करत जावे... मग काय गेस्ट हाऊस आणि औफिसच्या मधला रस्ता पकडला आणि त्या हिरव्यागार हिरवळीवरुन हुंदडत - हुंदडत हाफिसात हालो [... ह ची मात्रा ..] ... तसे येता येता काही फोटो पण काढले .. हे बघा..!







तसा "ह" च्या मात्रेवरुन "ह" चे वाक्य आठवले - हिमालयातील हिरव्या - हिरव्या हिरवळीवर ही हेमा हिरोइइन, हात हालवत हिंडत होती !

Friday, 27 February 2009

वेळ घालवण्याचे माझे - सध्याचे - उद्योग...

हा.... त्याचं काय आहे.. औफिसमधुन घरी गेल्यानंतर स्कायवरचे सगळे - अवॅलेबल - चॅनेलस बघणे हाच मोठा उद्योग आहे.. पण सालं ते डबडं गेला आठवडा झाला बंद पडलय... म्हणे सॅटेलाइट सिग्नल मिळत नाही! तसं फार वाईट वाटत नाही.. कारण, इन-मिन ३-४ चॅनेल दिसतात.. स्टार गोल्ड - ज्याच्यावर तेच तेच सिनेमे कितीतरी वेळा दाखवताहेत... आणि मी बघतोय.. दुसरा - स्टार वन आणि उत्सव ..यांच्यावरही भारतात संपलेल्या किंवा बंद पडलेल्या मालिका दाखवल्या जाताहेत.. एक दोन मुझिक चॅनेल - ९-एक्स... तेच का टाईमपास.

बोलायला पण कुणी नाही... तसा यांच्याकडे वेळच नसतो म्हणा.. नुसतं हाय- हॅलो - आणि बाय एवढच काय ते पर्स्नल बोलणं...  नाही तर - तेच रोजचं - प्रोजेक्ट - डेड्लाईन - अपडेटस - चेन्जेस - ब्ला ब्ला ब्ला... हुर्रर्र्रर्र..!

मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा  [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..

..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.

रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!

तसा रेडी-टु-इट चा  पण कंटाळा आलाय... पण काय करणार... नाईलाज आहे.... अधुन मधुन फिश आणि चिप्स किंवा फ्राइड चिकन हेच ते काय जरा बदल.. मायला, पण या कोंबड्यांना टेस्टच नाही राव, अगदिच सपाक आहेत..! रविवारी मात्र मस्त कोल्हापुरी स्टाइलमध्ये चिकन बनवतो. तसे आपल्याकडचे सारे मसाले मिळतात म्हणुन बरे... नाहीतर इमॅजिन करा - आपल्याकडच्या मसाल्या बिगर - कोल्हापुरी चिकन अन् रस्सा .. कसा लागेल?

व्हेज - लोकांनी या नौन-व्हेज डिस्कशन बद्दल मला माफि करावी!

असो... रविवारी पुन्हा भेटु ...

Friday, 7 November 2008

केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी...


.... परवा ५ नोव्हेंबरला केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी - पहायला गेलो होतो... वा! मस्त मजा आली.. मागच्या ट्रीपच्या वेळी [२००६] पण हा इव्हेंट मी पाहिला होता... फार मोठा कार्यक्रम होता राव तो... या वर्षी स्पौसररस न मिळाल्यामुळे थोडासा फरक जाणवला.... काही का असेना.. या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
दरवर्षी ५ नोव्हे. ला केंब्रिज, यु.के. मध्ये आतिषबाजी केली जाते... अंदाजे १९५० च्या आसपास ही रीत सुरु झाली आणि पहिली ३० वर्षे काही लोकल फॅमिलिजनी मिळुन हा गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. नंतर १९८० मध्ये टोनी हौब्स यांनी हा पुर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतला... आज केंब्रिज फायरवर्क्स एक परिपुर्ण ट्रेडिंग कंपनी म्हणुन कार्यरत आहे ..!
... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!