Friday, 27 February 2009

वेळ घालवण्याचे माझे - सध्याचे - उद्योग...

हा.... त्याचं काय आहे.. औफिसमधुन घरी गेल्यानंतर स्कायवरचे सगळे - अवॅलेबल - चॅनेलस बघणे हाच मोठा उद्योग आहे.. पण सालं ते डबडं गेला आठवडा झाला बंद पडलय... म्हणे सॅटेलाइट सिग्नल मिळत नाही! तसं फार वाईट वाटत नाही.. कारण, इन-मिन ३-४ चॅनेल दिसतात.. स्टार गोल्ड - ज्याच्यावर तेच तेच सिनेमे कितीतरी वेळा दाखवताहेत... आणि मी बघतोय.. दुसरा - स्टार वन आणि उत्सव ..यांच्यावरही भारतात संपलेल्या किंवा बंद पडलेल्या मालिका दाखवल्या जाताहेत.. एक दोन मुझिक चॅनेल - ९-एक्स... तेच का टाईमपास.

बोलायला पण कुणी नाही... तसा यांच्याकडे वेळच नसतो म्हणा.. नुसतं हाय- हॅलो - आणि बाय एवढच काय ते पर्स्नल बोलणं...  नाही तर - तेच रोजचं - प्रोजेक्ट - डेड्लाईन - अपडेटस - चेन्जेस - ब्ला ब्ला ब्ला... हुर्रर्र्रर्र..!

मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा  [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..

..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.

रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!

तसा रेडी-टु-इट चा  पण कंटाळा आलाय... पण काय करणार... नाईलाज आहे.... अधुन मधुन फिश आणि चिप्स किंवा फ्राइड चिकन हेच ते काय जरा बदल.. मायला, पण या कोंबड्यांना टेस्टच नाही राव, अगदिच सपाक आहेत..! रविवारी मात्र मस्त कोल्हापुरी स्टाइलमध्ये चिकन बनवतो. तसे आपल्याकडचे सारे मसाले मिळतात म्हणुन बरे... नाहीतर इमॅजिन करा - आपल्याकडच्या मसाल्या बिगर - कोल्हापुरी चिकन अन् रस्सा .. कसा लागेल?

व्हेज - लोकांनी या नौन-व्हेज डिस्कशन बद्दल मला माफि करावी!

असो... रविवारी पुन्हा भेटु ...

2 comments:

"मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन"

हे बाकी खरं!!!!!
कारण त्या शिवाय तुम्ही चित्रपट पाहुच शकत नाही..

@महेंद्र,
नाही तर काय? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, या आधी मी असं सिनेमा पाहणं नेहमीच टाळल आहे. बरेच सिनेमे मी थिएटरलाच पाहतो. पण सध्या नाइलाज आहे ना. अडला हरी .....!

ता. क. कदाचित ही एक पळवाटही म्हणता येईल, कसं?