Monday, 23 February 2009

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन श्रद्धांजली!

....... आज काल बातम्या जरा उशिराच मिळतायत... आत्ताच लक्ष्मणराव देशपांडे यांच्याबद्द्ल महेंद्रच्या ब्लौगवर वाचले... आता तसे म्हणाल तर ही बातमी तशी अनेक ब्लौगवर वाचायला मिळाली असती .. मात्र एका पर्स्नल टच मध्ये वाचायला अन् पहायला महेंद्रच्याच ब्लौगवर मिळाले... महेंद्रच्या ब्लौगवरती "वराड निघालय लंडनला" चा विडिओ सुध्या आहे... जरुर पहा..! ..असो....

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन माझ्याबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांकडुन भावपुर्ण श्रद्धांजली!

... "वराड निघालय....." मी आमच्या शाळेच्या दिवसांमध्ये पाहिलेलं - मामाच्या गावी. मामाचं गांव, शेतावरचं घर, आणि आम्ही १५ बच्चे कंपनी [३ मामा आणि त्यांची ५+४+५ आणि मी = १५ मुलं, थोडक्यात हे घर म्हणजे खाटाल्यांचं!] आणि या नाटकाचं सेट-अप अगदी सेम असावं असं... !

तर, हे नाटक गावांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं होतं की - बरेच दिवस आम्ही ही "त्या" हिंग्लिश स्टाइल मध्ये बोलत होतो... जवळजवळ रोजच्या रात्रीच्या जेवणानंतर , अंगाणातल्या वाळुवर गोल करुन आम्ही टेप-रेकार्डवर ही कॅसेट ऐकत असू. ..... बरेच दायलौग तोंडपाठ होते.... ब-याच वेळा "होल वावर इज अवर!" यासारखे डायलौग असायचे.. मोठी मंडळी कधी कधी आमच्या थिल्लरपणाला वैतागुन म्हणायची "च्या आयचं बावळंट! नुसतं आसलंच बोला... लक्षणं काय नीट नाहिती.... आवतार बघा... आन् लंडनचा आव आणत्याती.... हुड.." .... आज लक्ष्मणरावांची आणि त्या वेळेची आठवण येवुन गेली....!

1 comments:

बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामधे करायची इच्छा असते पण राहुन जातात. ह्या एक पात्री प्रयोगाच्या तिकिटांसाठि २-३ वेळ प्रयत्न केला पण तिकिट मिळाले नाही.
अजुनही ’ती हाक’ जानराव .....ओ जानराव ऐकु येते बघा कानात.केवळ एका साडी- कम धोतर वापरुन सगळं विश्व आपल्या डोळ्यापुढे उभे करणे काही सोपे नाही. पण ते लक्ष्मणरावांनी करुन दाखवले.
विनम्र श्रध्दांजली .......