महेंद्रच्या ब्लौगवरची "५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ" ही पोस्ट वाचता वाचता, माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण झाली....
... अंदाजे १९९४ च्या उन्हाळ्यातला हा किस्सा... आपल्या "देवाच्या गाडीने *" रेल्वेने मी मामाच्या गावावरुन माझ्या गावी चाललो होतो. "बिरोबाची जत्रा" असल्याने ट्रेन अगदीच खचा खच भरलेली. तसा माझा गाव म्हणजे तिसरा थांबा. अगदी दरवाज्याच्या तोंडात उभा राहण्यापुर्ती जागा मिळाली...दोन्ही हातानी दरवाजाजवळचा तो खांब पकडला होता. तर, उन्हाळ्याचे दिवस आणि मला सौलिड घाम आलेला... ! शिवाय महत्त्वाचं म्हणजे - त्यावेळी माझ्या तळपायाला खुपच [घाम?] पाणी सुटायचे... जरा कपाळावरचा घाम पुसायला एक हात वर नेला आणि शेजारच्याचा धक्का लागला... मग काय.. पायातील चप्पल आधीच स्लीपरी झालेली... गेला तोल.. घसारलो आणि गड-गडा लोळत त्या पटरीच्या उतारावरुन खाली... !!
........................ गाडीच्या त्या शेवटच्या डब्याकडे पहात.. कसा बसा उभा राहिलो.. उजव्या पायातली चप्पल आधीच पडल्यामुळे एक दगडाची खापरी चांगलीच तळव्यात घुसली होती.. कपडे झाडले आणि ती उजव्या पायाची चप्पल शोधली.... नशीब - सापडली लगेच.. आता प्रश्न होता त्या गावच्या स्टेशनपर्यंत पोहचायचा... रस्ता एकच - रेल्वेचा मार्ग - रेल्वे रुळांच्या कडं-कडंनी अंदाजे ४ कि.मी. चालत गेलो. गावांतुन परत मामाच्या गावाला जाणारी एक प्रवासी वाहतुक करणारी जीप पकडली आणि बॅक टु मामाचे घर! अर्थात घरी पोहोचल्यावर दवाखाना आणि मलम-पट्टी झालीच... मायला ... त्या डौक्टरचे इंजेक्शन मला पायाला झालेल्या जखमेच्या दुखन्यापेक्षा जास्त वेदनादायक वाटले होते..!
असो... त्या नंतर बराच काळ रेल्वेची धास्तीच घेतली होती.. मागच्या वेळी लंडनच्या त्या ट्युबमध्ये बसतानाही या किस्स्याची एक आठवण झाली होती हे नक्की! ...

* देवाची गाडी - मिरज - पंढरपुर दरम्यान वाहतुक करणारी आगगाडी. सध्या हा मार्ग ब्रौडगेज बनतोय म्हणे, आणि ती देवाची गाडी - मिरजच्या कारखान्यात - की - संग्राहालयात उभी आहे!
4 comments:
खरोखरच मोठा कठिण प्रसंग होता.. पण देवाचीच कृपा..
मी स्वतः अजिबात धार्मिक नाही, पण असं काही घडलं की मग मात्र विश्वास ठेवावासा वाटतो देवावर.
छान लिहिलंय.. अगदी डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं..
@महेंद्र,
तसा हा किस्सा, आपल्या त्या पोस्टमुळंच आठवला... आणि तसाच लिहिला पण.... !
हां, प्रसंग कठीण होताच, म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नव्ह्ती... मी धार्मिक - देववादी आहे किंवा नाही हे सांगता येणार नाही, मात्र "त्या विश्वव्यापी शक्तीवर" माझा पुर्ण विश्वास आहे !!
"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"
he koni lihila ahe ??? मिर्जा ग़ालिब. ki ashfaq ullah khan ???
नमस्कार!
बराच बाका प्रसंग ओढवलेला म्हणजे तुमच्यावर!! पण थोड्क्यात निभावलं ते एक बरं झालं...
खुप नव्हते ना लागले?
Post a Comment