Categories

Aeroplanes

Aeroplanes

Saturday, 8 November 2008

केंब्रिज सिटी सेंटर , किंग्ज कौलेज आणि थोडे आसपासचे फोटो ......


... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

Friday, 7 November 2008

केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी...


.... परवा नोव्हेंबरला केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी - पहायला गेलो होतो... वा! मस्त मजा आली.. मागच्या ट्रीपच्या वेळी [२००६] पण हा इव्हेंट मी पाहिला होता... फार मोठा कार्यक्रम होता राव तो... या वर्षी स्पौसररस मिळाल्यामुळे थोडासा फरक जाणवला.... काही का असेना.. या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
दरवर्षी ५ नोव्हे. ला केंब्रिज, यु.के. मध्ये आतिषबाजी केली जाते... अंदाजे १९५० च्या आसपास ही रीत सुरु झाली आणि पहिली ३० वर्षे काही लोकल फॅमिलिजनी मिळुन हा गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. नंतर १९८० मध्ये टोनी हौब्स यांनी हा पुर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतला... आज केंब्रिज फायरवर्क्स एक परिपुर्ण ट्रेडिंग कंपनी म्हणुन कार्यरत आहे ..!
... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

Thursday, 6 November 2008

मामला मार्केटचा ....



Img: © http://www.kaltoons.com

...भुंगा!


भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोफत सौफ्टवेअर्स - सौजन्य - मायक्रोसौफ्ट

Image representing Microsoft as depicted in Cr...Image via CrunchBase
मंडळी, बिल गेट्स साहेबांच्या कॄपेने भारतीय विद्यार्थ्यांसाठी, ड्रीमस्पार्क [DreamSpark] योजनेअंतर्गत काही सौफ्टवेअर्स मोफत - म्हणजे - फुकट देण्यात येत आहेत.
यामध्ये आहेतः
  • Windows Server,
  • Microsoft Visual Studio,
  • Expression Studio,
  • Virtual PC
आणि इतर काही ....

सौफ्टवेअर्स कसे मिळवालः
... अगदीच सोप्प आहे. कोणत्याही एनआयआयटी [NIIT] किंवा ऍपटेक [Aptech] ट्रेनिंग सेंटमध्ये जा.
आपल्या कौलेज चे ओळखपत्र दाखवा आणि सौफ्टवेअर्स घेऊन जा..

अधिक माहिती : http://www.dreamsparkindia.com/dreamspark/GetDreamTools.aspx?Tab=1


...भुंगा!


Reblog this post [with Zemanta]

Wednesday, 29 October 2008

दिवाळी - नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!

.... हम्म्म्म्म्म्म ....ब-याच दिवसात काही लिहिणे झाले नाही.... जरा बीझी झालोय... काहीतरीच काय... थोडा आळशी झालोय म्हणा तर... !

... दिवाळी झाली .. मस्त साजरी केली असणार तुम्ही लोकांनी.... हा... माहितय मला... गेल्या वर्षीची घरची दिवाळी आठवतीय मला... या वर्षी पुण्याऐवजी केंब्रिजमध्ये दिवाळी साजरी केली... धुम-धडाक्या नाही... तीच आपली शांत - दिवे लावुन... फटाके मिळाले... मात्र उडवायची पंचाईत... औफिसमधुन माहिती काढली तर समजले की नाही उडवलेले चांगले... उगाचच शेजारच्यांची झोप मोड करणे बरे नाही... काय सांगावे - एखाद्याने तक्रार केली तर आपली दिवाळी सासरच्या लोकांबरोबर - पोलिसांबरोबर - व्हायची ... :)

सकाळी लवकर उठुन तयार झालो... दिवे लावले... मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना फोन करुन शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली.... दिवाळी संपली... आणि .. चला कामावर....!

असो... तुम्हा सर्वांना ही दिवाळी अतिशय म्हणजे फारच - खुप - आनंदाची आणि भरभराटीची जाओ... नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!


पुन्हा भेटुच.....

...भुंगा!

Wednesday, 3 September 2008

गणपती बाप्पा मोरया ...!!

Ganesha riding on his mouse. A sculpture at th...Image via Wikipedia
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची
नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना|
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥



...भुंगा!

Reblog this post [with Zemanta]

Saturday, 23 August 2008

आनंदा वॅली : एक दिवस - निसर्गासोबत ..!

पुण्यापासुन अंदाजे ६० - ७० की. मी. वर असलेल्या "आनंदा वॅली" ला शनिवारी गेलो होतो.. मस्त जागा आहे... निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस कधी संपलासमजले सुध्दा नाही...!



[** ऍनिमेटेड फोटो - अधिक माहितीसाठी - आनंदा वॅली - वेबसाईटवरुन घेतला आहे.]
कसे जावे:
पुणे -> पिंपरी चिंचवड रस्ता -> नाशिक फाटा -> चाकण -> चाकण नंतरचा जकात नाका संपल्यानंतर डाव्या बाजुला दोन प्रेट्रोल पंप आहेत. त्यानंतर डाव्या बाजुने जाणारा रस्ता पकडा. अंदाजे १०-१२ की.मी. अंतरावर - कडुस गाव आहे. गाव पार करा आणि तुम्ही आनंदा वॅली मध्ये पोहचाल.

मुंबई: देहु रोड -> सोमाटणे फाट्यावरुन तळेगांव-> चाकण -> चाकण नंतरचा जकात नाका संपल्यानंतर डाव्या बाजुला दोन प्रेट्रोल पंप आहेत. त्यानंतर डाव्या बाजुने जाणारा रस्ता पकडा. अंदाजे १०-१२ की.मी. अंतरावर - कडुस गाव आहे. गाव पार करा आणि तुम्ही आनंदा वॅली मध्ये पोहचाल.

निसर्गाच्या सान्निध्यात असणारे हे रीसार्ट शहरी वातावरणापासुन अगदीच अलिप्त आहे. विकेन्ड ट्रीप - किंवा कार्पोरेट मिडिंग्ज साठी अगदी योग्य..!

अधिक माहिती आणि पॅकेज साठी:
नकाशा:

फोन: 09860797735, 09860797733
ईमेलः info@anandavalley.com
वेबसाईटः http://www.anandavalley.com/


... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

Thursday, 31 July 2008

भटकंती: रतनगड


गेल्या शनिवारी किल्ले रतनगड पाहण्याचा योग आला... रतनवाडील देखणे शिव मंदिर आणि पावसाळी ट्रेक , दोन्ही अगदी मनात राहण्यासारखे..!

मात्र, तुम्ही सध्या रतनगडला जाण्याचा बेत करत असाल तर - चागली पकड - ग्रीप - असणारे बुट अतिशय महत्त्वाचे.. पावसामुळे ब-याच ठीकाणी जमिन निसरडी झाली आहे.. शिवाय गडावर चढताना असणा-या दोन उभ्या शिड्या काळजीपुर्वक पार करा...!

काही छायाचित्रे इथे आहेत ..
...भुंगा!

Monday, 28 July 2008

अर्ज किया है

वो यारों की महफिल वो मुस्कराते पल,
दिलसे जुडा है अपना बिता हुआ कल |
कभी गुजरती थी जिंदगी वक्त बिताने मे,
अब वक्त गुजर जाता है, चंद कागज के नोट कमाने मे ||

Friday, 11 July 2008

Sunday, 6 July 2008

घोरपडी रेल्वे गेट जवळ आज रेल्वे इंजिनचा अपघात झालाय..



घोरपडी रेल्वे गेट जवळ आज रेल्वे इंजिनचा अपघात झालाय....त्या मार्गे येणा-या - जाण्या-यांनी याची दखल घ्यावी हो .....!
.... आज सकाळी - सकाळी १ ते दिड तास ट्राफिक मध्ये घुसमटुन निघालो....

तुम्ही कितीही सहनशील असा - अशा वेळी तुमच्या सहनशिलतेचा अंत पहिला जातो...
कारण प्रत्येकजण इथे तुम्हाला ओव्हरटेक करायला पाह्तो....
मी आधी - मी आधी, जणु मरायलाही प्रत्येजण सर्वात आधी तयार असतो ....

Thursday, 26 June 2008