दैनंदिनी - ३ स्प्टें. २००९
सुट्टीचा दिवस... मस्त आरामात उठणे.. सोप्यावर पडुन टीव्ही पाहणे.. यातच सकाळ संपली...!
दुपारी गेलेली लाईट रात्री ९.१५ आली... आणि म्हणे पुण्यात लोड शेडिंग कमी होणारयं... हो.. खरं का? कधी पासुन?
संध्याकाळी पाऊस - रिमझिम - होताच... त्यामुळे पुण्यात जाऊन - म्हणजे - पेठेत जाऊन - "गणपती पाहणे" झालेच नाही... असो... सोसायटीचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम - खिडकीतुनच पाहिला.... कदाचित मी प्रमाणापेक्षा [*] जास्त आळशी झालोय, हेच खरं!
@शिनु साठी कमेंटस् मध्येच हेल्प पॉईंटस् लिहिलेत... होप, ही विल सक्सिड् !
विचार होता - ऑनलाइन न जाण्याचा... पण जाम बोअर होतं... विदाऊट ब्लॉगिंग, मेलिंग... :(* आळसाचं प्रमाण कसं ठरवायचं? चला, शुभरात्री .. उद्या भेटु!
माझं अगदीच "अट्टल दारुड्या" सारखं झालयं… कितीही नाही म्हटलं तरी तो गुत्त्यावर आणि मी नेटवर जायला चुकत नाही !
0 comments:
Post a Comment