Sunday, 6 September 2009

तुमचा ब्लॉग आणि ब्लॉग हिटस् ..!

परवाच्या एका पोस्ट वरती श्री. रानडे यांनी ब्लॉग हिटस् कशा वाढवता येतील? असं विचारलं होतं. लागलीच उत्तर देता येणं शक्य नव्ह्त, म्हटलं सविस्तर लिहाव. कदाचित इतरांनाही उपयोगी पडेल. तर, ब्लॉग हिटस् वाढवण्यासाठी काही काही टेक्निकल गोष्टीही लागतात, जसं सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन वगैरे वगैरे. पण त्या आधी आपण काही इतर नॉन-टेक्निकल म्हणता येतील अशा गोष्टी पाहु.

१.तुमच्या ब्लॉगचे कंटेंटस् - ओरिजिन्यालिटी: हे सर्वात महत्त्वाचे. तुम्ही काय लिहिता, कसं लिहिता यावर तुमच्या ब्लॉगवर लोक येत असतात. ओरिजनल कंटेट्स असणार्‍या ब्लॉगवरच लोक वाचनं पसंद करतात. म्हणजे तुम्ही जर इतर साइट्स / ब्लॉग्ज वरुन कॉपी करुन पोस्ट करत असाल तर, लोकांना त्यात नविन काही वाटेल किंवा आवडेल असं सांगता येणार नाही. शिवाय ते ब्लॉगिंगच्या एथिक्स मध्ये बसत नाही, असंच मी म्हणेन. जर कंटेट्स इतर साइटवरुन घेतले असतील तर ते लिंक करा. मुळ लेखकाचा आदर करा! आता ओरिजनल कंटेंट्स लिहिण्यासाठी थोडं डोकं चालवावं लागतं हे ही खरंच! पण स्वतः लिहिलेले - मनमोकळे पणानं लिहिलेले पोस्ट्स वाचकांना नेहमीच भुरळ घालतात हेच खरं. उदा. दयायचं म्हटलं तर महेंद्र कुललर्णीं किंवा अनिकेत चा ब्लॉग वाचा. भन्नाट आणि बिंधास्त लिहितात हे. आणि म्हणुनच त्यांचे हिटस ५०००० पेक्षा अधिक आहेत. शिवाय खुद्द वर्डप्रेसच्या हॉट ब्लॉग लिस्ट मध्ये त्यांचे ब्लॉग आहेत!

२.कमेंटस् - प्रतिक्रिया: तुम्ही जर एखादी पोस्ट / ब्लॉग वाचलात तर आपलं - प्रामाणिक - मत जरूर नोंदवा. पटलं - नाही पटलं हे लिहा. त्यामुळे लिहिणार्‍यास चालना आणि लोकांपर्यंत आपले म्हणने पटल्याचा आनंद होतो. पुढील लिखानास उत्तेजनाही मिळते. आता त्यात तुमचा फायदा असा की, तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया - कमेंट ही त्या ब्लॉगवर येणार्‍या - कमेंट करणार्‍या दुसर्‍या वाचकाच्या नजरेस पडते. स्वतः कमेंट लिहिण्याआधी बरेच लोक, इतरांनी काय मतं मांडली आहेत हे वाचतात. त्यामुळे तो/ ती तुमच्या ब्लॉगवर येण्याची शक्यता असतेच. आहे ना फायदा!
आता ब्लॉगर म्हणुन येणार्‍या प्रतिक्रिया/ कमेंटस यांना उत्तर देण्याची जबाबदारीही तुमची आहेच. तेंव्हा, कुणी प्रतिकिया दिली तर त्याला उत्तर जरुर द्या! त्यामुळे ब्लॉगर आणि वाचक यांच्यामध्ये एक फ्रेंडली नातंही होऊन जातं आणि एक सोशल नेटवर्क तयार होऊन तुम्हाला "माऊथ पब्लिसिटी" चा ही फायदा होतो.

३.बॅक लिंक्सः आवडलेल्या ब्लॉगला जरुर फॉलो करा. परस्पर सहमतीने एक-मेकांच्या ब्लोगवरती लिंक एक्सचेंज करा. म्हणजे तुमच्या आवडत्या ब्लॉगची लिंग तुम्ही तुमच्या ब्लॉगवर द्या आणि बदल्यात तुमच्या ब्लॉगची लिंक त्या ब्लॉगवर टाकण्यास विनंती करा.

४.पोस्टचे नाव - टॅग्ज - लेबल्सः पोस्टचे नाव हे "कॅची" असावं म्हणजे क्युरॅसिटीनेही लोक तुमच्या ब्लॉगवर येतील. मात्र पोस्ट - लेख - नावाला धरुनच असावी. नाही तर पोस्टचे नाव "पुण्यात उडत्या तबकड्या" असं द्यायचं आणि लेख "स्वाईन फ्ल्यु" वर लिहायचा, असं करु नका. कदाचित सुरुवातीला काही लोक येतीलही, मात्र नंतर त्यांचा पोपट झाल्याचं पाहुन फिरकणारही नाहीत! तसेच पोस्टच्या खाली लेबल्स, टॅग्ज जरुर लिहा. त्यामुळे तुमचा ब्लॉग कॅटेगरायझ व्हायला मदत होते. शिवाय सर्च इंजिनमध्येही फायदेशीर ठरते!

५.सोशल नेटवर्किंग साइटस - फोरम्स - ट्विटर: जर तुम्ही ऑर्कुट/ फेसबुक वर असाल तर मित्रांना नविन पोस्टचे स्क्रॅप टाका.. मात्र त्यांचे पुर्ण पेज अशा स्क्रॅपनी भरुन नका टाकु. एखाद्या फोरम - किंवा डिस्कशन साइटवर रजिस्टर्ड असाल तर प्रोफाइल मध्ये आपल्या ब्लॉगचा उल्लेख करा.
ट्विटर ला रजिस्टर करा आणि आपले नेटवर्क - फॉलोअर्स - वाढवा - मायक्रोब्लॉगिंगचा हा प्लॅटफॉर्म तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी चांगलीच करु शकतो.

६.जाहिराती: जाहिरातींनी भरलेल्या ब्लॉगवर मी शक्यतो जात नाही. तिथं वाचण्यपेक्षा त्या जाहिरातीच त्रासदायक ठरतात. हां, तुम्ही गुगल एडसेन्स किंवा तत्सम जाहिराती वापरत असाल तर हरकत नाही. मात्र त्यांनी तुमचा ब्लॉग भरुन टाकु नका! जाहिराती - ब्लोगच्या डिझाइन प्रमाणे व्यवस्थित टाकलेल्या असाव्यात. पॉप अप वापरुच नका. अशा साइटस/ ब्लॉग्ज फार इरिटेट करतात. बरेच लोक पुन्हा अशा साइटवर येण्यास तयार नसतात.

७.ग्राफिक्स - फोटोज: फक्त टेक्स्ट असणारे पोस्ट वाचणे कंटाळवाणे असते. त्यामुळे तुमच्या पोस्ट मध्ये ग्राफिक्स - इमेजेस असणं महत्त्वाचं. आता फोटो किंवा ग्राफिक्स मिळवण्यासाठी ते कोणत्याही वेबसाइटवरुन घेणे योग्य नाही. घेतलेच तर - ग्राफिक्स *** या साइटवरुन घेतले असं नमुद करा. त्यामुळे तुमची बाभ़ळ बुडणार नाहे [गावची म्हण - नुकसान होणार नाही!] मात्र तुमचा प्रामाणिकपणा नक्कीच दिसुन येईल. शिवाय झिमँटा सारखी सुविधा आहेच या साठी!

८.ब्लॉग मीटर - एनालिटिक्स: तुमच्या ब्लॉगवर येणार्‍या विजिटर्सना ओळखा. म्हणजे ते कुठुन आले.... कसे - काय सर्च करुन आले? कोणत्या ब्लॉगवरुन आले? हे माहित करण्यासाठी गुगलचे एनालॅटिक्स ही सुविधा किंवा स्टॅट काऊंटर वापरा. यामुळे तुम्हाला तुमच्या विजिटर्सबद्द्ल बरीच माहिती मिळते. शिवाय गुगल वेबमास्टर टुल्स ही सुविधाही खास त्यासाठीच आहे. त्यावरही तुम्हाला बरीच माहिती मिळु शकते.

९.वाचकांचे म्हणने: वाचक काय वाचण्यात इंटरेस्टेड आहेत हे आपण लिहिलेल्या वेगवेगळ्या पोस्ट मधुन आपल्याला समजेलच. त्यामुळे मुद्द्याचं आणि गरज असेल तेवढंच लिहा. हजार ओळींची पोस्ट कंटाळवाणी ठरु शकते. त्यापेक्षा थोडक्यात लिहिलेली पोस्ट कधीही वाचणीय असते!

१०.रेग्युलर लिखाण: रेग्युलर लिखान तुमच्या ब्लॉगला जिवंत ठेवतं. रोजच लिहायला पाहिजे असं नाही.. किंवा रोजच फालतु - काहीही लिहुन फायदा होईल असं नाही. दोन दिवसांतुन एखादी पोस्ट - मात्र वाचण्यालायक लिहिली तर तुम्हाला चांगला वाचक वर्ग मिळु शकतो.

११. ई-मेल सिग्नेचर: तुम्ही जेंव्हाही एखादी मेल लिहिता, त्यामध्ये तुमच्या सिग्नेचर नंतर तुमच्या ब्लॉगची लिंक टाकल्यासही तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी होण्यास मदत होते. उदा. जीमेल - याहु - रेडिफ वगैरे. हो, मात्र ऑफिसच्या मेल मध्ये तसं करु नका म्हणजे झालं.

१२: ब्लॉग रीडर्स साईटः मराठीब्लॉग्ज.नेट, ब्लॉगअड्डा.कॉम, ब्लॉगवाणी.कॉम, ब्लॉगकॅटलॉग.कॉम, स्टंबलअपॉन्.कॉम या सारख्या साईटस् वरती आपला ब्लॉग जोडा. त्यासाठी त्यांचे विजेटही मिळतात. ते तुमच्या ब्लॉगवर टाका. या साइट ब्लॉगच्या डिरेक्टरीज किंवा एकत्रिकरण करतात. शिवाय सर्च इंजिनमध्ये त्यांचं रॅकिंग चांगलं असल्याने या साइट्स वरुनही तुम्हाला भरपुर हिट्स मिळु शकतात. उदा. माझ्या ब्लॉगवर सर्वात जास्त हिट्स"मराठीब्लॉग्ज. नेट" वरुन येतात.

१३. ब्लॉग डिझाइन: तुमच्या ब्लॉगचे डिझाइन हे थोडसं वेगळं असावं. कॉमन डिझाइन्स मनात भरत नाहीत त्यामुळे वाचक किंवा विजिटर लवकरच बोअर होतो. या बद्द्लची एक पोस्ट [ब्लॉगचे डिझाइन] मी आधी लिहिलिय ती वाचा.

आता सर्च इंजिन बद्द्लः
१.खाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगर / वर्डप्रेसच्या कोडमध्ये टाका.
तुमचा ब्लॉग जर फ्री वर्डप्रेस वर असेल तर हा कोड टाकता येणार नाही. मात्र तुमचे स्वत:चे होस्टींग घेऊन केलं असेल तर मात्र नक्कीच करता येइल!
... अपडेटः
ह्या दोन ओळी तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या कोड मध्ये टाकायच्या आहेत.
१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. लेआऊट टॅब वर क्लिक करा.
३. "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.

<title>data:blog.pageTitle/></title>

दिसेल, त्याच्या लागलीच खाली ह्या दोन ओळी पेस्ट करा.
<meta name="Keywords" content="keywordOne, SecondKeyword, 3rdKeyword, add your won keywords here!"/>

<meta name="Description" content="This is my website. Add your own description here!"/>

४. कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन टेक्स्ट बदला.
५. सेव बटन क्लिक करा.... झालं

ह्या कोड मुळे सर्च इंजिन मध्ये दिसणारी तुमची लिंक त्या की-वर्ड साठी कॅटेगरायज होईल आणि लिंकच्या खाली दिसणारी ओळ ही तुमचे डिस्क्रीप्शन असेल.

२.तुमचा ब्लॉग गुगल, याहु, एम्.एस.एन/बिंग या सर्च इंजिनना सबमिट करा!

हुम्म.. झालं! काही वर्षांपुर्वी मी हेच काम प्रोफेशन चा भाग म्हणुन करत होतो.... सध्या नाही! त्यामुळे कदाचित अजुनही काही मुद्दे असतील!!

19 comments:

भुंगा,
आपण मांडलेल्या मताशी सहमत आहे. आदी जोशी यांच्या ब्लॉगवर पण अशीच १ पोस्ट आहे. त्याची लिंक http://adijoshi.blogspot.com/2008/05/blog-post.html

अनिकेत वैद्य.

योग्य मोजका सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद, हे सगळे अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या ब्लॉगच्या विषयी तुमचे काय मत आहे?

दीपक सान इतक्या विस्तृत माहिती करिता धन्यवाद .
ब्लॉग विश्वातील जनते साठी खूपच माहितीपूर्ण लेख आहे .
असेच लिहित राहा .आम्ही वाचत राहू :)

blog etc is good but there are too many spelling mistakes while writing marathi .......... so it is also one of point that you should check marathi grammer while writing a blog i hope you will understand this ..................

@अनिकेत, सचिन: आपल्याला माहिती उपयोगी वाटली - एवढं सगळं लिहिणं सार्थकी लागलं.
आभार!

@ वि. रानडे: आपला ब्लॉग बघितला. छान आहे. टेक्निकल माहिती उपयोगी वाटली. मात्र आपण जर हे कोर्स चालवत असाल तर पत्ता किंवा देणंही गरजेचं आहे. शिवाय नियमित लिखानही!

@अनामिक,
आपल्या सल्ल्याबद्दल अनेक आभार. शुद्धलेखनातील त्रुटी या की-बोर्ड - टायपिंगच्या आहेत.
शुध्द लिहायला - वाचायला सर्वांनाच आवडेल, आणि त्याचबरोबर आपण "आपल्या नावाने" केलेल्या सुचनाही!

नेहमीप्रमाणेच हाही लेख सुंदर व माहितीपूर्ण. अनामित नी म्हटल्याप्रमाणे शब्द लिहिताना चुका झाल्या आहेत पण त्या तुम्ही पुढ्च्या लेखात येऊ देणार नाही याची खात्री आहे. बाकी विषय चांगला निवडलात.

नेहमीप्रमाणेच अत्यंत उपयोगी पोस्ट लिहिल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती नेमक्या शब्दात तुमच्या पोस्टमध्ये मिळते तांत्रिक माहिती सोप्या मराठीत लिहिल्याबद्दल तुमचे कौतुक :)


आता नेहमीप्रमाणेच एक रडगाणं :)

अखेरचा पॊईंट समजला नाही. तुम्ही दिलेला कोड गॆजेटमध्ये ऎड करायचा का? क्रुपया याबद्दल मार्गदर्शन व्हावे.

हे मात्र मस्त आहे हं, आवडलं आपल्याला... मी तर काही आपल्याप्रमाणे एक्सपिरिएन्स्ड नाहिये, एक सेकंड इयर आयटी इंजिनिअरिंग स्टुडंट.... तुमच्या साइटचा खुप फायदा झाला मला... सगळ्यात जास्त तो ब्लॉगचे टेम्प्लेट चेज करताना.... आणि html ची जास्त माहिती नसल्याने खुप अडचणी आल्यात, पण आय अलमोस्ट डन इट, यु मेइ सी माय ब्लॉग www.vishaltelangre.tk आणि www.kalatnakalat.tk....
>>> आणि हो मला ब्लॉगर वरील साइटवर वरती स्वगृह पानांसारखे आर्चिव्ज पान टाकायचे आहे, त्यासाठीची लिंक कुठे शोधू, वर्डप्रेसवर तर ते जमलयं, पण ब्लॉगर वर प्रॉब्लेम येतोय....
>>> तसं माझं काही कन्टेन्ट हे माझं स्वतःचं नाहिये, पण जे आहे त्याला मस्त रिस्पॉन्स मिळालाम आणि महेंद्र काका, आणि अनिकेत यांनी सुद्धा मला प्रथम खुप मदत केलियं... तसं तुमच्या गुगलच्या साइटवरून तुम्ही तयार केलेले फोटोज मी अलरेडी माझ्या दोन्ही ब्लॉग्जवरल लावलेत, ते पाहून घ्या.....

हा लेख अतिशय उत्कृष्ट झालाय. इतकी सर्वांग सुंदर माहिती क्वचितंच एखाद्या ठिकाणी वाचायला मिळते. गेले दोन दिवस औरंगाबादला होतो त्या मुळे दोन दिवस नेट वर लॉग इन करु शकलो नाही, म्हणुन हा लेख आजच पाहिला. लेखामधे सगळे पॉइंट्स कव्हर केले आहेतच. पण कन्सिस्टन्सी.. ही सगळ्यात महत्वाची . प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय करा.. हे पण फारच महत्वाचे आहेत . जेंव्हा लोकं कॉमेंट पोस्ट करतात तेंव्हा ते परत येउन चेक करतात.. ब्लॉग लेखकाने काय रिप्लाय दिलाय हे पहायला..जर तुम्ही रिप्लाय दिला तर लोकांना पण त्यांच्या मताला तुम्ही किंमत दिली आहे हे पाहुन बरं वाटतं..

@शिनु
पोस्ट अपडेट केली आहे.
"अपडेट" हा भाग वाचा.

@महेंद्रजी,
गेली दहा वर्षे फार प्रोफेशनल लाइफ पाहिली.. म्हटलं जरा सोशल व्हावं ... थोडी टेक्निकल मदत करावी. सारे प्वाँटस् अनुभवाचेच बोल आहेत! लोकांना खुश होताना आपणही खुष व्हावं... जरी हे सारं वर्च्युअल असलं तरीही त्यात एक वेगळाच आनंद अनुभवतोय! आभार!

khup chhan maahiti

Salil Chaudhary
www.netbhet.com

तर मग ते नुसतं विझेट म्हणूनच जोडता येईल तर, जाऊ द्या मला ते नविन पेज म्हणून जोडायचे होते, बरं ठिक आहे, माहितीबद्दल धन्यवाद...

www.vishaltelangre.tk

मस्तच रे ... ह्याला म्हणतात चाबुक ब्लोग्पोस्त ... तुझ्या ब्लॉगच्या हिट्स सुद्धा ह्याने वाढल्या असतील नक्कीच... :D

बाकी मी कामावर परत आलोय त्यामुळे आता पुन्हा जोरदार ब्लॉग्गिंग सुरू करतोय लवकरच. लडाख ट्रिप मस्तच झाली आमची. तुझा इमेल दे की. link मेल करतो. लिखाण येइल लवकरच ...

@रोहन,
हा.. हिट्स/ विजिटर वाढलेत हे नक्की... आणि त्यांचे "हेल्प - मेल" ही..! बघतोय वेळात-वेळ काढुन कशी मदत करता येते.

असो, तुझी हिमालय ट्रीप कशी झाली? कधी लिहितोय... आणि हो.. महत्त्वाचे म्हणजे "ते हजारो फोटो" कुठे आहेत?

मस्त झाले आहे हे पोस्ट. सर्व महत्वाचे पॉईंट्स कव्हर झालेत. SEO असा विषय आहे यात करावे तितके कमीच आहे. पण atleast सुरवातीच्या काही बेसिक गोष्टी पाळल्या तर फायदा खूप होतो.

नमस्कार...
पोस्ट फार उपयोगी आहे
एक शंका-
पण क्र.४ मध्ये (कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन टेक्स्ट बदला.)
इथे कीवर्ड्स मध्ये पोस्टचे लेबल्स टाकायचे का?
आणि description मध्ये काय लिहायला हवे?