नमस्कार!
मायाजालावर असणार्या अनेक सुविधांपैकी एक म्हणजे "खादाडी"! हो, बर्याचदा तुम्ही आम्ही या मायाजालावरती पटापट बनवता येणार्या किंवा घरच्याघरी बनवता येणार्या काही पाकक्रिया शोधत असतो. बायकोसाठी काहीतरी नविन मेनु शोधणं माझ्या इतर कामांपैकी एक. आता मायाजालावर या सगळ्या पाकक्रिया शोधणे आणि त्या एकत्र करणं तसं अवघड नसलं तरी कंटाळवाणं नक्कीच वाटतं. शोध-शोध शोधायचं आणि नेमकं हवं त्यावेळी ते सापडत नाही, मग मनाचा आणि खाण्याचा मेनुच बदलतो! तेंव्हा म्हटलं - मायाजालावर आपल्या पाकक्रिया लिहिणार्या "खवैय्यांच्या" परवानगीने आपण एक छोटसं "ई-बुक" तयार करावं आणि त्याच संकल्पनेचं हे एक रुप!
डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा!
"पोटोबा"चं पहिलं "ई-बुक" भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.
चला तर मग - खादाडी सुरु करुया!
डाऊनलोड्स:
35 comments:
लगीन होईपर्यंत खुप कामाला येणार आहे, (नंतर सुद्धा येवु शकतो :)
भुंगा, भाग्यश्री धन्यवाद!
uttam ki rao
hovun javu de
mi aatach misal khalli aahe
aani lagech hi post
jai maharashtra ,jai khadadi!!!
@आनंद,
हो, मलाही आधी मिळालं असतं तर... ;)
काही हरकत नाही... सध्याही उपयोगी येऊ शकते!
@विनायक,
अरे वा.. मिसळ - कोल्हापुरी का?
या पी.डी.एफ. मध्येही असेच काही चमचमीत पाककृती आहेत!
एकदम जबरी झालंय....
@अपर्णा,
जबरी ना..! चला तुम्हा सर्वांना आवडलंय तर, उगाचच काम वाया नाही गेलं!
वा छानच उपक्रम. मराठीमधुन आहे म्हणुन जास्त आवडला. इंग्रजी मध्ये उगाचचं हे म्हणजे मराठीमध्ये काय? असं होतं
धन्यवाद आणि अभिनंदन
वा भूंगा क्या बात है!!! आइडियाची कल्पना लय भारी. मानव जातीच्या कल्याणाचे कार्य आपल्या हातून घडतं आहे. ह्यातल्या काही पाककृती नक्की करून पाहेन. आमच्या पोटोबाच्या वतीने तुमचे व भाग्यश्रीचे आभार मानतो..
नमस्कार दिपकदादा,
ई-बुक उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
आत्ताच मी yuvadunia ब्लागवर "सुनो 'दिल से'" पोस्ट वाचली.
अस काही online internet radio station आपण मराठी साठी करु शकतो का. सध्यातरी मला याबाबतीत काहिच माहित नाहि.पण याबद्दल आपण काहि करु शकतो का?
तुम्ही जर ब्लागर मीट ला जाणार असाल तर तिथे पण याविषयी चचा॑ कराल का?
@अनिकेत,
अगदी बरोबर.. इंग्रजीत ह्याच पाककृती वाचताना 'बेसन पीठ', 'ह. / तु. / म. डाळ' आणि मसाल्यांची नावं यांची सांगड घालता - घालता चायनिज मेनु बनतो!
@सिद्धार्थ,
मंडळ आभारी आहे!
मस्तच झालयं रे...सही
तुम्हा दोघांचे आभार......
@ तन्वी,
धन्यवाद तन्वी.
तुम्हां सर्वांना हे पुस्तक आवडल्याचे पाहुन आनंद होतोय :)
अरे, मस्तच! भाग्यश्री आणि भुंगोबा, दोघांचंही अभिनंदन!! सकाळी सकाळी खाऊचं पुस्तक पहायला मिळालं. पुस्तक आवडलं. त्यात दिलेले पदार्थ नेहमीच्या करण्यातले आहेत त्यामुळे एकदम हॅन्डी इन्फो मिळाला. छान! अनुक्रमणिकेमध्ये त्या पदार्थाच्या नावावर क्लिक केलं की त्या विशिष्ट पानावर जाता येतं हे जास्त आवडलं. आणि भाग १... म्हणजे अजून पुढचे भागही येतायंत तर....! पुढच्या सर्व भागांसाठी शुभेच्छा!
आयला लय भारी
लगेच डाऊनलोड करून ठेवले आता मला आणि नंतर बायकोला उपयोगी पडेल ;)
@कांचन कराई,
धन्यवाद! हो - ते अणुक्रमणिका मुद्दामच तशी बनवली. उगाचच पान् न पान शोधायला नको.
हा पहिला भाग आहे. तेंव्हा दुसरा भाग निश्चितच येणार!
@विक्रम,
हो, चांगली आयडिया आहे.. :)
मस्तच आहे आभारी आहे, दुसरया भागाची वाट पाहत आहे
रोहित
मस्त पुस्तक तयार झाले आहे. धन्यवाद! मी आताच हे इ-बुक माझ्या भावाला पाठवले. त्याला अजिबात स्वयंपाक येत नाही. सध्या परदेशात असल्यामुळे त्यालाच स्वयंपाक करावा लागतो. त्याला याचा निश्चितच फायदा होईल. पुन्हा आभार!
@रोहित,
धन्यवाद! दुसरा भाग लवकरच येईल!
@माधुरी,
आपल्याला/ भावाला हे पुस्त उपयोगी आले यातच भाग्यश्री [पाककृतींची लेखिका] व आमचा आनंद आहे!
आपल्याला नविन वर्षाच्या शुभेच्छा!
स्तुत्य उपक्रम! अन्नकृतीकर्ता सुखी भाव!
@मंजिरी,
आपले आभार माझ्यापर्यंत पोहोचले - ते भाग्यश्रीपर्यंत पोहोचवितो :)
धन्यवाद! आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुमच्या दोघांचेही अभिनंदन!
@डी.डी.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
भाग्यश्री आणि भुंगा दोघांचेही अभिनंदन ,
खूपश्या पाककृती सोप्या आहेत . करून पाहायला हव्या ....
@सचिन,
धन्यवाद :) नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयला ... सहीच ... भानस ताई पूस्तक छापून कुठे गायब झाल्या आहेत ते माहीत आहे का ??? तुझे अभिनंदन रे ... इ-बुक आले तुझे ... माझ्या इ-बुक चा मुहूर्त लागत नाही आहे अजून ... :D
@रोहन,
हा दोस्त.. भाग्यश्री गायबच आहे... ई-मेल रिप्लाय ही नाही.. ब्लॉगवर कमेंटही नाही!
असो.. आम्ही तुझ्या ई-बुकची वाट पहातोय!
abbbbbbb....:p pot bharala:)
@शिनु,
अ s s s s s s ब्ब! इथंपर्यंत ऐकु आलं :)
सर्वप्रथम दिपक तुझे अनेक आभार.गेले बारा-तेरा दिवस चाकावर होते.:) आज आलेय घरी परत. " पोटोबा " मस्तच झालेय. वरच्या प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटले. नवीन वर्षाची सुरवात छान झाली. पुन्हा एकदा तुझे व सगळ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार व सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
@ भाग्यश्री,
नवीन वर्षाच्या 'पोटभर' शुभेच्छा!
"पोटोबा" तुझ्या भन्नाट पाककृतींशिवाय शक्यच नव्हतं! वाचकांचा उत्साहही भरभरुन मिळाला.
सर्वांचे जाहिर आभार!
भुंगा भाग्यश्री ....
Good, पुस्तक छान जुळून आलय. मराठीतही अशीच Ebooks या पुढेही यावीत,
फक्त एक सुचवावस वाटतं कि प्रत्येक पानावर अनुक्रमानिकेसाठी थेठ लिंक द्यावी जेणेकरून सारखे पहिल्या पानावर जावं लागणार नाही...
दोघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील भागांसाठी भरपूर शुभेच्छा !!!!
सुरेखा....
नमस्कार,
खुप छान पुस्तक . डाऊनलोड केले आहे
धन्यवाद
अमोल केळकर
@सुरु,
हो, अशीच मराठी पी.डी.एफ. पुस्तकं देण्याचा प्रयत्न पुढेही राहिल.
या पुस्तकात काही त्रुटी राहुन गेल्यात.. आपल्या सुचना पुढच्या पुस्तकात नक्की पाळू :)
@अमोल,
धन्यवाद. असेच भेटत राहु
.... आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
अतिशय स्तुत्य उपक्रम! मला स्वत:ला ह्या 'पोटोबा'तील पाक कृती तर आवडल्याच...शिवाय माझ्या काही बहिणी, मैत्रिणी ना मी हे ई-पुस्तक ईमेल केल्यावर त्या हरखूनच गेल्या. परदेशात राहताना, देवनागरीत टाईप केलेले, मराठी स्वादिष्ट पाक कृतींचे, सचित्र पुस्तक... सोप्या व विविध रेसिपीज.... तिघींनी ह्यातील हिरव्या रश्शाची, केळीच्या हलव्याची (भरली केळी)व बृशेटाची कृती करून पाहिली.... झक्कास झाली व सर्वांना आवडली. अभिनंदन व शुभेच्छा! :-)
अरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
Khup chaan pustak aahe...Photo varun lagech padarth khavese vatate..:)
Dhanyavaad
खूपच उपयोगी ! मनापासून धन्यवाद, भुंगा अन भाग्यश्री ! - अंजली हैदराबादकर
Post a Comment