Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday, 30 March 2010

सारेच म्हणतात 'चेपेन - चेपेन'....

च्यायला [...शिवी असो वा नसो!].... वैताग आलाय नुसता.... नाही तर काय? किती दिवस झाले, एखादी पोस्ट लिहिन म्हणतोय.. पण कामाच्या *** घो! हो.. तुम्ही म्हणाल आता पोस्ट लिहायला तसा किती वेळ लागतो.. खरंय हो.. पण 'कंटाळा' नावाचाही एक प्रकार असतो... सगळ्यांकडेच.. कमी - जास्त प्रमाणात!

हां.. तर काय म्हणत होतो... ते - चेपेन - चेपेन.... आता हेच बघा ना:
काल त्या महान आय.सी.आय.सी.आय. बँकेने ई.सी.एस. न क्लिअर झाल्याने २७६ रु. [२५० + टॅक्स]चा चुना लावला. पण २५० रु. दंड जरा[?] जास्तच नाही का होत... आम्ही काय मुद्दामुन असं करतो काय?. तिकडे एच.डी.एफ.सी. ने ही १००रु. जास्त लावुन ई.एम्.आय. घेतला. लाईट-बिल चे "ऑटो - पे" मधेच उद्भवलं आणि होम-लोनच्या ई.सी.एस.ला काही रुपये कमी पडले. कदाचित वरती जेवढा दंड भरावा लागला ना.. तेवढेच असतील. च्यायला... चेपा - चेपा!

मार्च एंड आहे... जरां बँकानीही समजुन घ्यायला पाहिजे नां... पण असं कसं... बँक काय आमच्या 'बा'ची नाही... झालं... दंड भरला... शिवाय आता 'क्रेडीट हिस्टरी'वर ही ठपका लावला असेल या महान लोकांनी! चेपा - चेपा!

आणि आज सकाळी.. सोलापुर रोडवरुन एक महाशय - आपल्या टुकार [हो.. टुकारच.. नाहीतर काय एच.डी. म्हणु?] बाईकवर बायको आणि पुढं पोरगा बसवुन मस्त - सायकल ट्रॅक वरुन निघाले. पुढच्या चौकात मी डाव्या बाजुला - इंडिकेटर लावुन - वळत होतो - तर हे साहेब सरळ जाण्यासाठी अगदी समोर च आले. मीच थांबलो.. म्हटलं उगाच चिरडायला नको... तर हे अतिशहाणे - माझ्याकडेच अगदी खुन्नस खाऊन बघु लागले... बापरे... मी तर जाम घाबरलो... याचे डोळे फुटले - बिटले तर!! एक तर काडी पैलवान.. च्यायला एक ठोसा दिला तर होत्याचा नव्हता व्हायचा.. मागे बायको असली की अशांना जरा जास्तच जोर येतो... त्यात 'वहिणीसाहेब' तर दुर गेल्यावरही मोठे डोळे करुन अगदी 'प्रेमाणे' पहात होत्या... जणु म्हणतच होत्या - चेपा - चेपा!

अहो, महाराणी सायबा, जरा आपल्या सायबांनाच सांगा - "कारभारी दमानं..." एक तर बिगर हेल्मेट... त्यात सायकल ट्रॅक वरुन.. आणि त्यातल्या त्यात - डावीकडे वळणार्‍या वाहणांना न पाहता जणु सारे - सरळच निघालेत या तोर्‍यात निघालेत! मी आपला उगाचच स्वतःला समजावत होतो - "मामु... शांत! अंदर के शैतान को मत जगाव.. शांत बुलेटधारी... शांत...!"

हे एकच नाही... असे बरेच किस्से रोजच पाहतो... काही वेळा तर अगदी पॅरलल गाडी चालवत जाणारे यार - दोस्तही दिसतात. असे हे लोक... पण एक आहे... असे लोक त्यांच्या मित्रांमध्ये आवडते असतात... मलाही आवडतात... काही दिवसांनी ते इतरांचेही आवडते होतात.... आणि मग शेवटी 'देवाचेही आवडते' होतात.... आमच्यासारखे फक्त नाममात्र - कारणमात्र होतात!

स्वाहा!

Wednesday, 17 March 2010

आयुष्याच्या या सोनेरी काळात परत जाता आलं तर..

फार दिवसांपुर्वी एका मित्राची अशीच आशयाची इंग्रजी मेल आली होती. आज एका मित्राचा एस.एम.एस. आला. म्हटलं.. हेच मराठीत लिहुन बघावं... आठवणींना भावनांचा बांध घालण्याचा प्रयत्न!

... जेंव्हा "निष्पापपणा" हा स्वाभाविक असायचा...
... जेंव्हा "पिणे" म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबा" हे एकमेव हिरो वाटायचे..
... जेंव्हा "प्रेम" म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबांचे खांदे" म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची...
... जेंव्हा "वाईट - शत्रु" म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची...
... जेंव्हा "ड्रामा" फक्त नाटकातच होतो असं वाटायचं...
... जेंव्हा "वाया गेला" असं कुणी म्हणायचं तेंव्हा "वेळ" हेच अभिप्रेत असायचं...
... जेंव्हा "औषध" म्हणजे फक्त खोकल्यावरच असतं असं वाटायचं...
... जेंव्हा "तोडा - तोडी" व्ह्यायची ती फक्त खेळण्यांची...
... जेंव्हा "दुखणारी गोष्ट" म्हणजे ते फुटलेले गुडघे असायचे...
... जेंव्हा "गुडबाय" फक्त उद्यापर्यंत असायचा...
... जेंव्हा "गेटींग हाय" म्हणजे झुल्यावर/ झोक्यावर झुलणे असंच माहित होतं...
... जेंव्हा "युद्ध - लढती" फक्त खेळातच असतात असं वाटायचं...

आयुष्य कीती सरळ - सोप्पं होतं... आणि - मला मोठं व्हायचं होतं!

[ मुळ लेखक - कवी: अनामिक ]

Monday, 15 March 2010

माणसांतले मैत्र वाढवा - सुरुवात आजच...गुढीपाडवा !

आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !


साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !

Sunday, 14 March 2010

ब्लॉगर टेंप्लेट डिझायनरः ब्लॉगरची नवी सुविधा!

मला वाटतं .... स्वत:चा ब्लॉग असणं आणि त्यांचं डिझाईन स्वत: केलेलं [ कमीत - कमी कस्टमायझेशन तरी ] - ही आता अभिमानाची गोष्ट झालीय. इतर ब्लॉग्ज मध्ये आपला ब्लॉग उठुन दिसण्यासाठी आपण [किमान, मी तरी!] काय काय करतो.. पैकीच एक म्हणजे जरा हटके - डिझाईन. बर्‍याच जणांचा ब्लॉगचं टेंप्लेट बदलण्याचा विचार असतो..


मात्र 'आपलं लेखन गेलं तर..?' किंवा 'जोडलेली विजेट्स गेली तर..?' असे अनेक प्रश्न असतात. मला आठवतय 'भाग्यश्री' [भानस] ने एकदा मला असंच विचारलं होतं.... साहजिक आहे.. ! असो.. मुद्दा हा आहे की - आपण आता आपल्या ब्लॉगरवरील ब्लॉगचं डिझाईन अगदी सोप्या पद्धतीनं - आरामात बदलु शकतो.... कसं - हे पहा!

१. ब्लॉगरच्या ड्रॉप्ट या सेवेला लॉगिन करा. घाबरु नका - हे संकेतस्थळ ब्लॉगरचेच आहे. मात्र नविन - प्रायोगिक असणारे बदल याठीकाणी दिले जातात.
२. "लेआउट" या टॅबवार क्लिक करा आणि पहा - शेवट्ची टॅब "टेम्प्लेट डिझायनर" अशी दिलेल.
३. त्यावर क्लिक करा आणि तयार व्हा - आपल्या ब्लॉगला एक नवं रुप देण्यासाठी.

नविन "टेम्प्लेट डिझायनर" या पानावर तुम्हाला मुख्य अशी चार/ पाच डिझाइन दिसतील व प्रत्येकी २-३ अशी मिळुन एकंदरीत १५ नविन डिझाइन्स मधुन तुम्हाला तुमच्या ब्लॉगचं रुप बदलता येईल. यामध्ये बॅकग्राउंड इमेज ते अक्षरांचा रंग या पर्यंत बरंच काही बदलता येईल... आणि तेही तुमचे विजेट - मुख्य कोड किंवा लेखन यामध्ये कोणताही बदल न होता!

सहीच ना....? तर मग बघा एक प्रयत्न करुन!
[ग्राफिक्सः साभार - ब्लॉगर बझ्]

Thursday, 11 March 2010

image - graphics collctions : Never delete this post!







































































































------------------ ---------------------
























































MM Hotlink Testing