Sunday, 13 June 2010

महाराष्ट्र देशा...

परवा पंकज कडुन या पुस्तकाबद्द्ल ऐकलं... नंतर ए.बी.सी. मध्ये चौकशी केली तर "पुस्तक संपलंय" असं समजलं.. कधी येणार? तर रविवार पर्यंत येईल म्हणे.. चला.. लागलीच "जज्जो"ला पाच प्रति सांगुन टाकल्या.. एक माझी आणि चार मित्रांना भेट देणार....! अजुनही काही प्रती मागवण्याचा विचार आहे!

माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय?
- इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. म्हणुन हे महाराष्ट्र!

आत्ताच पुस्तक हातात पडलंय.. अजुन पुर्ण वाचलं नाही.. मात्र उघडुन एक "झलक" मारलीय. त्यानुसार, या पुस्तकातील फोटो खालील विभागात विभागले आहेत.

कणखर देशा: सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील - गड किल्ल्यांची फोटोगिरी.
पवित्र देशा: विविध देव-देवतांची, साधु-संतांची ही महाराष्ट्र भुमी!
दगडांच्या देशा: काळ्या पाषाणात कोरलेली लेणी, गुंफा यांचं हवाई दर्शन.
जीवन रेषा: जीवनाला जोडणार्‍या नद्या आणि रस्ते.
मुंबा आईच्या देशा: खास मुंबईचे फोटो.
अदभुत देशा: काही अद्भुत अशी फोटोगिरी.

मंडळी - आपल्या संग्रही बरीच पुस्तकं असतील.. असावीत. मात्र त्यात "महाराष्ट्र देशा" ची प्रत जरुर असावी... महाराष्ट्राचं असं हवाई दर्शन घडणं कदाचित प्रत्येकाच्या नशिबी नसेलही - मात्र या पुस्तकाच्या रुपानं आम्हांपर्यंत आमचा देश पोहचविल्या बद्दल उद्धवजींचे अनेक आभार!

माहिती:
नावः महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे
प्रकाशक: प्रबोधन प्रकाशन, मुंबई
मुल्यः रु. १००/-
खरेदी: ऑनलाईन = सह्याद्री बुक्स शिवाय "रसिक साहित्य" किंवा "ठक्कर्स बुक बँक" डेक्कनला मिळेल!

ता.क. पुस्तकं ऑफिसपोच केल्याबद्दल - खास आभार - जयेश जोगळेकर - [जज्जो]

5 comments:

मी पण मिळवले ते पुस्तक रायगडावर. पण तत्पूर्वीच वाचून काढले होते. लवकरच त्यावर आणि त्याच्या फोटोंवर एक सविस्तर पोस्ट ('समीक्षा' म्हणू की नको?) लिहायचे डोक्यात आहे. पण फर्स्ट लूकच भारी आहे. प्रेमात पडावे असे.

@पंकज,
हो.. पुस्तकाबद्दल तर वादच नाय!
सविस्तर पोस्ट लिहिच.. हवं तर समीक्षा म्हण... कारण यावर लिहायचं म्हणजे समिक्षक हा तुझ्यासारखाच पका भटक्या आणि फोटोड्या असायला पाहिजे!

झाले रे लिहून. ब्लॉगवर पोस्ट केलंय.

लवकरच हे पुस्तक माझ्याही संग्रही येईल. निदान पुस्तकातून तरी महाराष्ट्राचं हवाई दर्शन करता येईल.

Mast aahe pustak majhya pustak sangrahat jama jhale kadhich :)