ब्राऊजर वॉर मध्ये आणखी एका ब्राऊजरची भर पडलीय आणि ती म्हणजे "एपिक". बंगलुरु स्थित "हिड्न रिफ्लेक्स" या कंपनीनं हा ब्राऊजर बनवला. मोझिलाच्या भक्कम मुलभुतावर आधारीत या ब्राऊजरमध्ये बर्याच सोयी - सुविधा आहेत!
जसं:
१. सर्वात महत्त्वाचं म्हणजे - इनबिल्ट अॅन्टीवायरस! "ई-सेट अँटीवायरस" स्पायवेअर आणि स्पॅमसाठी तुमचा पी.सी. / फोल्डर स्कॅन करु शकता!
२. बातम्या: चालु घडामोडी व ताज्या बातम्यासाठी एका क्लिक मध्ये - आपण आय.बी.एन. लाईव्ह, एन्.डी.टी.व्ही, रीडीफ यांच्यावरील बातम्या तुम्ही - कोणत्याही संकेतस्थळावर न जाता, ब्राऊजरच्याच एका - डाव्या - भागात पाहु शकता.
३. भारतीय भाषांसाठी खास टायपिंगची सोय. आता त्यासाठी कोणतही सॉप्टवेअर इंस्टॉल करावं लागणार नाही! अक्षरांच्या सजावटीसाठी "रायटर" म्हणुन एक वेगळाच एडिटर आहे. ईंडिक मध्ये टाईप केलेले लेखन तुम्ही रायटरमध्ये पाठवुन तिथं त्याची सजावट - रंगरंगोटी करु शकता किंवा सरळ "सेव" करु शकता.
४. बर्याच अंशी सोशल नेटवर्कींगसाठी वापर - मात्र हे नेटवर्क बहुतांशी रोजच्याच वापरातलं - जसं - फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट, जी-मेल, याहु-मेल या खात्यांना ब्राऊजरच्या बाजुच्याच बार मध्ये तुम्ही चालु ठेवु शकता.
५. शिवाय काही कामाच्या गोष्टींची नोंद - टु डु, टायमर - अलार्म, युट्युब, मॅप्स, नोकरी, प्रवास, गेम्स आणि काही डेटा बॅक-अप या सारख्या गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध.
६. स्निपेट्स मध्ये - कामाचं काही टेक्स्ट - नोट कॉपी करुन ठेवता येते.
७. फायरफॉक्स - प्रमाणेच बाकीच्या सोयी - जसं टॅब्स, वेगवेगळ्या थीम्स वगैरे - वगैरे. मात्र एपिकमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड ग्राफिक्स/ फोटोही ठेवु शकता!
... तर आता वापराबद्दल बोलु -
पहिली बाजु:
१. वापर आणि हाताळणी अगदीच फायरफॉक्ससारखी असल्याने वापर अगदीच सोपा म्हणता येईल.
२. नेहमीच ईटरनेटच्या समोर असणारे/ बातम्या आणि सोशल नेटवर्कवर वारंवार भेट देणारे यांच्यासाठी हा ब्राऊजर पर्वणीच वाटेल.
दुसरी बाजु:
१. टेक्निकली मला आवडलेलं फीचर म्हणजे फाईल बॅक-अप - गुगल डॉक्स वर तुम्ही इथुन तुमच्या फाईल्स चढवु शकता!
२. याशिवाय - "एपिक अॅप्स" मध्ये असलेल्या भरगछ काही अॅप्लिकेशन्सपैकी काहे अॅप्लिकेशन्स - जसं
"गेम्स" - मिळालेला अगदी थोडा वेळ वापरुन एखादी छोटी गेम खेळुन फ्रेश होता येतं.
"शॉपिंग" - स्कायमॉल, डेल अशा डिपार्ट्समेंट्सवर चालु असलेल्या खरेदीच्या ऑफर्स पटकन पाहता येतात.
"सोशल नेटवर्किंग" - यामध्ये "आइबिबो" किंवा "बिग अड्डा" पासुन "ट्विटर" ची वेगवेगळी अॅप्लिकेशन्स, ते फोटो साठवण करणारी पिकासा - फ्लिकर पर्यंत आणि जी-टॉक पासुन याहुपर्यंत सारे मेसेंजर्स!
३. फक्त "फ्री-अँटीवायरस" आहे म्हणुन किंवा बातम्या पाहणे वा लेखन करणे या सोयीसाठी मी वैयक्तिकरीत्या तरी वापर करणार नाही. कारण जर माझ्याकडे वेळ असेल तर मी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर बातमी वाचेन वा माझ्याकडे असलेल्या सॉप्टवेअरमध्ये - बरहा वगैरे - टाईप करीन. शिवाय एक "फ्री-अँटीवायरस" मिळतं म्हणुन त्यावर विसंबुनही राहणार नाही. कारण माझ्याकडे खरेदी केलेलं मॅकअफी आहेच!
आता अशा सोयी असणारा "फ्लॉक" हा ब्राऊजर आधीपासुन चांगलाच वापरात आहे. त्यातील ब्लॉगिंग, सोशल नेटवर्कींग, फीड रीडर हे फिचर्स अधिक चांगले आहेत. एकंदरीत मला वाटतं - सोशल नेटवर्किंग वाल्यांसाठी हा ब्राऊजर आहे! वरती दिलेल्या फिचर्समध्ये तुम्हाला एखादं फिचर आवडलं तर तुम्हीही एक "क्विक टेस्ट" करु शकता. मी माझ्या खास ब्राऊजर्स साठी असणार्या ऑफिसच्या मशिनवरती एपिक इंस्टॉल केलाय. मात्र माझ्या पर्सनल मशिनवर येण्यासाठी त्याला आणखी काही सॉलिड आणि युनिक फिचर्स आणावे लागतील. तोपर्यंत - फायरफॉक्स - रॉक्स!
9 comments:
मस्त आहे पोस्ट. ऑफिसच्या कॉंप्युटरवर लोड करतो गेम साठी बरा होईल . बाकी तसा फायरफॉक्स एकदम कम्फर्टेबल आहे वापरायला.
हो.. बरोबर!
मी कधी कधी एखादी गेम खेळायला मी एपिक नक्कीच वापरेन... मात्र सध्या तरी फायरफॉक्स रॉक्स!
मी आत्ताच डाउनलोड केलाय अजून तपासणी चालू आहे
प्रथम क्षणी चांगला वाटत आहे बहु नक्की कसा अनुभव देतोय ते
@विक्रमः
बघ ट्राय करुन.. नाहीतर तु नेहमीच ट्विटर वर असतोस - तुला बरं पडेल - अपडेट करायला!
मी आताच डालो करतोय..मस्त अपडेट
फायरफॉक्स - रॉक्स!
छान माहिती. मीही वापरून बघितला. चांगला आहे. पण माझा लाडका गुगल क्रोम सोडण्याएवढाही नाही :) ..
@सुहास, धन्स.
फायरफॉक्स रॉक्स! हेच खरं!
@हेरंब,
हो.. तुझा गुगल क्रोम किंवा माझा फायरफॉक्स सोडण्याइतका - नक्कीच नाही! पहिलंच वर्जन आहे.. कदाचित भविष्यात चांगल्या सोयी-सुविधा येतील तेंव्हा पाहु :)
पुर्वी वापरलेल्या अन फायरफॉक्सचाच क्लोन असलेल्या "फ्लॉक"ची आठवण झाली... कालच विक्रम ने मला वापरायला सांगितले, म्हणून मी माझ्या उबुन्टूवर क्रॉस-ओव्हर (वाइन वापरून) पद्धतीने [कारण त्याच्या बायनरी फाइल्सच मला मिळाल्या नाहीत, तो खरंच मोझिलाने ऑथोराइज केलाय ना? :( ] वापरून बघितला... सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचा मोझिलाच्या बर्याचशा सुविधांना अजुन चांगला सपोर्ट नाही, म्हणजे तो व्यवस्थितपणे इंटिग्रेट केलेला दिसत नाही! दुसरी गोष्ट म्हणजे बाय-डिफॉल्ट त्याचे मेन्यू हे टॉप बार वर दिले आहेत शिवाय बाय-डिफॉल्ट बुकमार्क्स बारच गायब आहे..(जे की मला मुळीच पटलं नाही!) असो... साइडबारची कल्पना जरा चांगली आहे, पण अगोदरच एवढे ऍड-ऑन्स उपलब्ध असल्यावर त्याची तशी फारशी गरजच वाटत नाही...
असो, मराठी टाइप करतांना नवख्यांना त्याचा तसा उपयोग होईल, ही एकच गोष्ट मात्र चांगली वाटली... अन, मला वाटले होते की ते लाइट-वेइट असेल, पण ती आशा सुद्धा फोल ठरली, एकूणच टेस्टींग करतांनाच ते माझ्या नजरेतून उतरले... मी पक्का एफ-एफ लव्हर, त्यामुळे मी नाहक त्याची बदनामी करतोय, अशी कोनाचाही ही प्रतिक्रिया वाचून समजूत होईल, पण खरंच मला त्या गोष्टी पटल्या नाहीत बरं.... बाय द वे, फायरफॉक्स न वापरणार्यांनी "फ्लॉक" नक्कीच वापरून बघावा, तो तुम्हाला "एपिक" सारखी किंवा अधिक "सुखे" अनुभवायास देईल! ;)
बाय द वे, दादा, तू याच्या नांदात फायरफॉक्सला सोडशील नाहीतर... :P
@विशाल,
अरे वा! तु तर माझ्या पोस्टमध्येच काही मुद्दे टाकलेस!
फायरफॉक्स सोडणार - नाही! अजुनतरी त्याच्या तोडीचा ब्राउजर मिळाला नाही!
Post a Comment