Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 15 March 2012

आळीमिळी -गुपचिळी...

... शिवरायांच स्मारक जमीनीवर उभारण्यास जागा नाही म्हणुन समुद्रात उभाराचे वादे.. १९९५ सालापासुन जनतेला अक्षरशः चुना लावत चाललेलं हे स्मारकाचं राजकारण... हजारो एकरचे ग्रहप्रकल्प करण्यासाठी यांच्याकडे जमीन आहे... नसेल तर बळकवायचीही तयारी... पर्यावरणाच्या गोष्टी फक्त स्मारकासाठीच लागु का?... त्या ग्रह प्रकल्पांसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकारण्यांची कामगिरी वाखानण्याजोगी.. मग स्मारकासाठीच का आळीमिळी? आयुष्यभर राजांच्या नावाचं राजकारण करणारे नेमके याच बाबतीत गप्प का?



शिवरायांचे स्मारक, स्मृती आमच्या हृदयात आहे... उगाच राजकारण करु नका... राजकारणी म्हणुन आपण लायक नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे.. त्याची प्रचितीही आलीच आहे.. मग आता काय 'सर्टीफाय' होण्याची वाट पाहताहात का?


सचिन व त्याच्या कामगिरीची बाराखडीही माहिती नसलेले, उगाचच त्याच्या 'त्या' शतकाची कुचेष्टा करताहेत.. सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अकलेचे दिवे पाजळताहेत... का.. कशासाठी..? आपल्या आयुष्यात आपण असे किती दिवे लावलेत ज्यासाठी आपण सचिनच्या रेकॉर्डची वाट पहात आहात...?

Saturday, 8 October 2011

मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका

मराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:
मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे.मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.

चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!

Sunday, 17 April 2011

आनंद मेळावा: १०० वर्षांपुर्वीचे महाराष्ट्र दर्शन

भारत देश व महाराष्ट्र २२व्या शतकाकडे प्रगतीची वाटचाल करीत आहे. धकाधकीच्या जीवनात नागरीक व अभ्यासाच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबून गेला आहे. अशा वेळी १०० वर्षांपुर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते? हे आजच्या तरुण पिढीला माहित नाही. मामाच्या चिरेबंदी वाडा फक्त बालगीतांमधुनच मुलांना ऐकायला मिळतो. वासुदेव, वाघ्या-मुरळी, पिंगळा इ. सांस्कृतिक ठेवा लोप पावत चाललेला आहे.


आनंद मेळावा: ५५० कलाकारांनी साकारलेली १०० वर्षांपुर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण लोककला, संस्कृती व गाव यांचे सजीव दर्शन.

१०० वर्षांपुर्वी प्रत्येक खेडे स्वयंपुर्ण होते. गावाची गरच गावातच भागवली जात होती. रामप्रहरी वासुदेव गाणे गात सर्व गावाला जाहे करीत होता. भल्यापहाटे शेतकरी मोटेवर गाणी गात शेताला पाणी पाजत होता. तेल तेल्याच्या घाण्यावर, सनगर व कोष्टी यांच्या हातमागावर घोंगडी, लुगडी विणली जात होती. पखालीतुन कोळी सर्व गावाला पाणी पुरवत होता. हे सर्व गावचे असणारे गतवैभव लुप्त झाले आहे.

आनंद मेळावा २०११
ठिकाणः गो-हे बुद्रुक - डोणजे - सिंहगड - पुणे
दि. २२ एप्रिल ते ८ मे २०११
वेळ: दुपारी ३ ते रात्री ८

छायाचित्र - पिकासा आल्बम वरुन - साभारः समीर
आपल्या माहितीसाठी सयाजीराजेपर्क.कॉम वरुन! पी.डी.एफ. = सयाजीराजेपर्क.कॉम

Monday, 11 April 2011

ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स: मुक्त्त स्रोत प्रणाली - आज्ञावली

या आधीची कॉपीराईट्स - पायरसीची पोस्ट आपण वाचलीच असेल. आता आपण पाहु की संपुर्ण संगणकच आपण ओपन सोर्सवर कसा चालवु शकतो! शिवाय ब्लॉग डिझाईन करताना लागणारी सॉफ्टवेअर्स - मोफत [मोफत म्हंजे फुकाट!] आहेत काय? महाजालावर - इंटरनेटवर शोधलं तर बरीच अशी सॉफ्टवेअर्स सापडतील - मात्र त्या बाबत चांगलं मत / प्रतिक्रिया असल्याशिवाय ते इंस्टॉल करायलाही आपण धास्तावतो. चला, मी वापरुन पाहिलेल्या/ वापरत असलेल्या अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावलींबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊ!



१. संगणकप्रणाली [ऑपरेंटींग सिस्टम]: सध्या तर या विभागात मायक्रोसॉफ्टच्या विंडो'ज ची चलती आहे. मात्र मॅक [ आणि गुगलची क्रोम ] ही सुध्दा कमालीची प्रसिध्द संगणकप्रणाली आहे. मुळत: सर्वर म्हणुन वापरली जाणारी युनिक्स - लिनक्स [लायनक्स] या आता युजर इंटरफेस असणार्‍या रुपात उपलब्ध झाल्याने तिचाही वापर वाढतो आहे. तर - संगणकप्रणाली साठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे - उबंटु! काही दिवसांपुर्वीपर्यंत ऑनलाईन रजिस्टर करुन आपण ही संगणकप्रणाली मोफत मागवु शकत होता. मात्र आता आपण नाममात्र पैसे देवुन सीडी मागवु शकता. डाऊनलोड साठी मात्र ही संप्र अगदी मोफत उपलब्ध आहे.

विकि वरुन घेतलेली अधिक माहिती अशी:
उबुंटु अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणार्‍या आवृत्त्या अशी उबुंटुची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. याशिवाय केडीई डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत.

मी सुध्दा काही दिवस ही प्रणाली वापरली आहे. आपणांस या प्रणाली बद्दल अधिक माहिती - मदत हवी असल्यास या संगणकप्रणालीचे आघाडीचे वापरकर्ते व प्रचारक विद्यार्थी श्री. विशाल तेलंग्रे यांच्याशी संपर्क साधा!

२. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऐवजी ओपन ऑफिस: ओपनऑफिस हे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती ओपनॉफिस.ऑर्ग बीटा आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर मराठीतही उपलब्ध आहे. ओपनऑफिस मध्ये वर्ड - एक्सेल - डाटाबेस - प्रेझेंटेशन हे सर्व करता येते. शिवाय एका क्लिक मध्ये मस्तपैकी पी.डी.एफ. ही बनवता येते. [ तुमच्या ब्लॉग - पोस्टचे ई-बुक बनवण्यासाठी झक्कास ना!] देवनागरी - मराठी - हिंदी वगैरे भाषांसाठीही ओपनऑफिस एकदम उपयुक्त आहे. उबुंटु संगणकप्रणाली सोबतही आपण हे ओपनऑफिस इंस्टॉल करु शकता.

उबुंटु संगणकप्रणाली सोबत फायफॉक्स ब्राऊजर व ईतर बरीच सॉफ्टवेअर्स येतात. थोडक्यात उबुंटु संगणकप्रणाली आपला संगणक वापरण्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करुन देते.

जर आपण मॅक संगणकप्रणाली वापरत असाल व अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावली [ओ.सो. सॉ.] साठी ओपनसोर्समॅक.ओर्ग या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

आता ब्लॉग च्या डिझाईन बद्दल बोलु:

३. फोटो एडिटींग - ग्राफिक्स यांसाठी: या विभागात फोटोशॉप हे सगळ्यात वरती आहे. मात्र ते घेणं सगळ्यांनाच परवडेल असं नाही! तर त्यासाठी मुक्त्त स्रोत मध्ये "गिंप" नावाचं सॉफ्टवेअर आहे. मी अजुनही ते वापरतोय. सुरुवातीला थोडा सराव केला तर यात बर्‍याच गोष्टी करता येतील. माझ्या ब्लॉगवरील बर्‍यापैकी ग्राफिक्स गिंप मध्येच बनवलेली आहेत.

या शिवाय काही ऑनलाईन एडिटरही आहेत जसं:
एविअरी: यामध्ये फोटो इफेक्ट पासुन गाण्याचे इफेक्ट करता येतात
पिक्सलर: फोटो इफेक्ट
पिकनिक: फोटो इफेक्ट व काही कलाकारीही करता येते!

शिवाय गुगलचे पिकासा मध्ये आपणांस काही सुंदर फोटो इफेक्ट्स देता येतील.

इतर काही छोटी - पण उपयुक्त माहिती:

४. फेव-आयकन: ब्लॉग किंवा संकेतस्थळावर बुकमार्क केलेल्या दुव्यासमोर दिसणारा तो छोटासा आयकन आपण पाहिलाच असेल. तो ऑनलाईन तयार करण्यासाठी डायनॅमिक ड्राईव्ह ला भेट द्या. शिवाय या संकेतस्थळावर आपणांस अजुन काही उपयोगी प्रोग्राम मिळतील.

५. एव्हरीस्टॉकफोटो.कॉम:
ब्लॉगवर वापरण्यासाठी फोटो - तेही कॉपीराईट्सच्या माहितीसहीत शोधण्यासाठी हे एक उत्तम संस्थळ. एडव्हांस सर्च वर क्लिक करुन "लायसेंस" च्या खाली - Show only licenses that allow commercial usage हा पर्याय निवडा. शिवाय त्या फोटो - इमेजच्या वापराबद्दलची माहितीही त्याच फोटोखाली मिळेल.

तुम्हालाही माहित असणारी काही उपयुक्त माहिती प्रतिक्रियेच्या स्वरुपात देता येईल! ... चला अधिक माहिती पुढच्या पोस्टमध्ये!

Sunday, 3 April 2011

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

माझा गांव - माझा देश!

Some places clicked on mobile, during this Gudi-Padwa trip to home.


Monday, 28 March 2011

तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?

ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही. काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच नावावर खपवायचा प्रयत्न असतो.

बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक मुद्दा! मित्रांनीही बर्‍याचदा यावर प्रश्न विचारलेले. मी काही कायद्याचा तज्ञ अथवा पंडित नाही, मात्र उपलब्ध असणार्‍या माहितीच्या आधारे काही माहिती इतरांसाठी लिहितोय.


भारतीय प्रताधिकार कायदा हा ब्रिटीश प्रताधिकार कायदा - १९११ वरुन तयार करण्यात आलेला असुन सध्या तो भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार अंमलात आहे.

प्रताधिकार - कॉपीराईट - म्हणजे काय?
प्रताधिकार हा साहित्यिक, नाटककार, कलाकार, सिनेमा - संगितकार - ध्वनिमुद्रण यांना [या कार्याशी निगडीत असणार्‍यांना] त्यांच्या कार्याची/ कामाची नक्कल होऊ नये यासाठी कायद्याने दिलेला एक अधिकार आहे. त्यामध्ये या संबंधित कामाचा/ कार्याचा वापर, संबधित सार्वजनिक व्यवहार, फेरफार करुन स्वीकार व अनुवादन याबातही अधिकार आहेत. या अधिकारांमध्ये कार्यान्वये काही बदल असु शकतात.

काय काय कॉपी-राईट होऊ शकतं?
  • वाङमयीन कार्य
  • संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
  • नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
  • मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
  • चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य
  • ध्वनिमुद्रण - नोंदणी
  • गृहशिल्प - इमारतीचे नकाशे संबधित कार्य
वरील पर्यायांमध्येही उप-पर्याय आहेत/ असु शकतात.

प्रताधिकार - कॉपीराईट - हे शाश्वत/ कायमस्वरुपाचे असु शकते का?
- नाही. प्रताधिकार - कॉपीराईट - कायदा ठराविक कालासाठी आहे. जसं:
  • वाङमयीन कार्य
  • संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
  • नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
  • मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
  • चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [छायाचित्र/ छायाचित्रण व्यतिरिक्त]
या बाबतीत - लेखक/ निर्माता यांच्या मृत्युनंतरच्या पुढील वर्षापासुन साठ वर्षापर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असतो.
उदा. जर लेखक/ निर्माता यांचा मृत्यु २०११ साली झाला तर ते कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल
  • निनावी - अनामित कार्य - टोपन नावाने लिखित
  • लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले कार्य
  • छायाचित्र
  • चलचित्रनिर्माण - चित्रपट
  • ध्वनिमुद्रण - नोंदणी
  • शासनाचे - सरकारी कार्य
  • सार्वजनिक अंगीकृत कार्य
  • आंतरराष्ट्रीय संघटना कार्य
या बाबतीत - पहिल्या प्रकाशनानंतरच्या पुढील वर्षापासुन साठ वर्षापर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असतो.
उदा. २०११ साली प्रकाशित कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.

  • प्रक्षेपण पुनर्निर्माण हक्क:
या बाबतीत पहिल्या प्रक्षेपणानंतरच्या वर्षापासुन पुढील पंचवीस वर्षांपर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.

  • प्रेक्षकांसमोर सादर करून दाखवणारा (नट - कलाकार - वादक इ):
या बाबतीत पहिल्या प्रयोगानंतरच्या/ सादरीकरणानंतरच्या वर्षापासुन पुढील पन्नास वर्षांपर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.

उचित व्यवहार - फेअर डीलिंग - च्या आधारे काय करता येते?
या बाबतीत वाङमयीन कार्य, संगीतयुक्त कार्य, नाटक - ड्रामा, मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य, चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [संगणकीय कार्यक्रमाव्यतिरीक्त] यांचा वापर खालील गोष्टींसाठी करता येतो:
  • वैयक्तिक वापर - संशोधन वगैरे
  • गुण-दोषविवेचन - समालोचन
  • संघ किंवा संघटना - यांच्याकडुन विना फायदा/ नफा या तत्त्वावर वापर/ उपयोग केला गेल्यास
  • संघ किंवा संस्था - या बाबतीत प्रयोग/ खेळ हा केवळ हौस म्हणून/ प्रेक्षकांकडुन पैसे न घेता अथवा धर्मसंस्थेच्या फायद्यासाठी वापर/ उपयोग केला गेला असल्यास
  • पुस्तकाच्या तीन पेक्षा जास्त प्रती न काढता वापरल्यास
अधिक माहिती: विकिपिडीया

आता ब्लॉगवर/ संकेतस्थळावर केलेले लेखन हे आपल्या विचारातुन झाले असेल तर ते लेखन रुपात आले की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. संबधित लेखनाच्या प्रकाशित तारखेवरुन त्याचा अस्सल/खरेपणाही कळतो त्यामुळे अशाप्रकारचे लेखन/ चोरी बर्‍याचदा सापडते. अशा संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

तर असा हा कॉपीराईट - प्रताधिकार, थोडक्यात!

थोडं विषयांतर करुन पायरसीकडे [चाचेगिरी?] पाहु. संगणक आणि संगणकाची आज्ञावली पासुन ते चित्रपटांच्या पायरसी पर्यंत.

आपल्याला सध्या संबधित असलेली संज्ञा: सॉफ्टवेअर पायरसी [संगणकाची आज्ञावली चौर्य!]: साध्या भाषेत सांगायचं तर - सॉफ्टवेअरचे प्रताधिकार उल्लंघन म्हणजेच सॉफ्टवेअर पायरसी! अर्थात इथेही प्रताधिकार - कॉपीराईट - हा प्रकार आहेच. आपण वापरत असणार्‍या संगणकावरील कार्यरत प्रणाली [ऑपरेटींग सिस्टम] ते संगणकावर टाकलेले सॉफ्टवेअर्स [संगणकाची आज्ञावली] हे सर्व सॉफ्टवेअर पायरसी मध्ये येते. त्यामुळे कोणतंही सॉफ्टवेअर फुकट मिळालं अथवा मित्रानं दिलं म्हणुन इंस्टॉल करायच्या आधी नक्की विचार करा.

बिझनेस सॉफ्टवेअर अलायंसच्या पाहणीनुसार भारत ६९% इतका पायरसी प्रमाण नोंदवुन ४२व्या क्रमांकावर आहे तर चीनचे पायरसी प्रमाण ८२% असुन तो १७व्या क्रमांकावर आहे.

वरील लिखाण लिहिताना मित्रासोबत या विषयांवर थोडं बोलणं झालं, मात्र त्यातील वादग्रस्त मुद्दे असे:

निखिल: मला रोज कुणी ना कुणी एखादा लेख/ कविता/ फोटो पाठवत असतं. अर्थातच ते फॉरवर्डेडच असतं. मलाही माहिती आहे की पाठवणार्‍याची हे लिहिण्याची किंवा तयार करण्याची क्षमताच नाही. मात्र त्यालाही हे कुणीतरी फॉरवर्डच केलेलं असतं? अशा वेळी कॉपीराईट किंवा मुळ लेखक/ छायाचित्रकार यांचा संबंध कसा?

मी: हे बघ, लेखकाने त्याचे विचार लेखनात उतरवले किंवा छायाचित्रकाराने एखादे छायाचित्र काढुन ते प्रकाशित केलं की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. जर मुळ लेखक/ छायाचित्रकार माहित नसेल तर असं फॉरवर्डेड मटेरियल शक्यतो आपणहुन फॉरवर्ड करणं थांबवावं [ हां, मात्र काही सामाजिक संदेश/ माहिती देणार्‍या मेल्स फॉरवर्ड करा.] शिवाय अशी मेल पाठवणार्‍यालाही आपण हाच संदेश द्यावा. माहित असेल तर संबधिताच्या संकेतस्थळाचा दुवा द्यायलाच हवा. ते लेख/ छायाचित्र प्रत्यक्ष त्या - त्या संकेतस्थळावरच पाहुन आपणही त्या लेखकाला/ चित्रकाराला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं माझं मत. शिवाय अशा प्रकारे आपणही कुठतरी अशा प्रकाराला थांबवण्यात मदत करतोय ही जाणीवही राहिल.

निखिलः आता मला सांग, समज मी माझ्या एखाद्या मित्राचा/ ओळखीच्याचा किंवा आवडलेला एक लेख/ एक फोटो किंवा एखादं डिझाईन मी माझ्या ब्लॉगवर वापरलं. मला माहित आहे की तो लेख ज्या संगणकावर लिहिला गेला आहे - त्याची प्रणाली [ओ.एस] - किंवा - तो फोटो जे सॉफ्टवेअर [फोटोशॉप/ लाईटरुम] वापरुन प्रोसेस केला आहे - किंवा - ते डिझाईन जे सॉफ्टवेअर वापरुन बनवलं आहे [फोटोशॉप/ इलुस्ट्रेटर] - ते सारं पायरेटेड आहे! त्याच्या मशिनवर कित्त्येक - पायरेटेड - सिनेमे पडलेत!! जर आपण आपले काही चोरी झाल्याचे म्हणत असाल तर ते चोरीतुनच निर्माण झालेलं नाही का? मग त्याने "कॉपीराईट - कॉपीराईट" असं म्हणावं का? की तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?

मी: अरे बापरे! अगदी खोडालाच हात घातलास लेका!
हे बघ माझं प्रामाणिक मत असं आहे की पायरसी आणि कॉपीराईट्स दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. " स्वत: पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरुन कॉपीरायटेड मटेरियल आहे " असं संबोधणं चुकीचं असेल/ नसेल. त्याकडे नक्कीच प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. आणि कॉपीराईट्स संबंधी जागरुक असणारे हे लिगल सॉफ्टवेअर्सच वापरतील ना? कारण उद्या त्यांनी अशा एखाद्या चोरा-विरुध्द तक्रार करायची म्हटली तर त्यांना संबधित पुरावे देताना त्यांच्याकडील असणार्‍या मुळ प्रतिसोबत संबधित संगणक किंवा सोफ्टवेअर्स यांचीही माहिती द्यावी लागु शकते आणि अशा वेळी कॉपीराईट्सच्या ऐवजी पायरसीची केस होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

ब्लॉग - साहित्यचोरी - फोटो - ग्राफिक्स ते पायरेटेड सॉफ्टवेअर्स पासुन सिनेमाचे टॉरेंट्स सगळं एकच! कुणी कुणाला दोष द्यायचा? पायरसी आणि कॉपीराईट्स याबाबतीत लेखक आणि वाचक दोघांमध्येही प्रामाणिकतेची आणि कर्तव्यनिष्ठेची जाणीव हवीच हवी!

Tuesday, 22 February 2011

संस्कृत भाषा वाचवा....


संस्कृत भाषा पृथ्वीवरील प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानतात. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांची उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ञ "पाणिनी"ने इ. स. पूर्व काळात "अष्टाध्ययी" या ग्रंथात संस्कृताची पुनर्रचना केली. संस्कृत भाषेतील शब्दांनाच भारतीय भाषांमध्ये योजले आहे. संस्कृतमधूनच इतर भारतीय भाषा जन्मल्या आहेत. - विकिपीडिया

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.

उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा.

मला मिळालेल्या ई-मेल वरुन - जसंच्या तसं - आपल्या माहितीसाठी.

Monday, 7 February 2011

व्हॅलेन्टाईन्स डे - गिफ्ट आयडीयाज...

या व्हॅलेन्टाईन्स डे ला एकमेकांना काय भेट द्यावं - हा दरवर्षीचा महाप्रश्न! सगळ्यांसमोरचा म्हणत नाही - पण "व्हॅलेन्टाईन" ना नक्कीच पडत असावा. साध्या सोप्या प्रकारात म्हटलं तर - एखादं ग्रिटींग + गुलाबाचं फुल = व्हॅलेन्टाईन्स भेट! नेहमीच्या भेट-प्रकारात अंदाजे खालील गोष्टी असतात:

  • तिच्यासाठी फुलांचा गुच्छ + चॉकलेट्स + टेडी बेअर + की-चेन वगैरे
  • सोबत सिनेमाला जाणे...
  • त्याच्यासाठी वॉलेट किंवा परफ्युम...
  • तिच्यासाठी पर्स किंवा परफ्युम...
  • संध्याकाळी एखाद्या हॉटेलात जेवण!

मात्र यावर्षी जरासं वेगळं भेट दिलं तर? मी काही जादुचा मंत्र किंवा अफलातुन "आयडियाची कल्पना" देत नाहीये - मात्र जरासं नाविन्य सुचवतोय, एवढंच.

  • टी-शर्टः जरासं वेगळंपण असणारे टी-शर्ट "ओकाका" या संकेतस्थळावर पाहिले. मराठीपण मिरवण्याचा हा वेगळा प्रकार खरंच आवडला. यामध्ये आपण त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी असं दोघांसाठीही टी-शर्ट मागवु शकता.
  • पुस्तकः हो, एखादं प्रेमकथा असणार पुस्तक [ उदा. तिच्यासाठी - बकुळा- आणि त्याच्यासाठी - दुनियादारी- ] आपण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी नक्कीच मागवु शकता. यासाठी फ्लिपकार्ट किंवा रेडिफ या संकेतस्थळावरुन आपणांस "विनामुल्य घरपोच" पुस्तकं मागवता येतील. मराठीतील पुस्तकं रसिक साहित्य किंवा सह्याद्री बुक डेपो वरुनही मागवता येतील.
  • गेम्सः गेमाड्या व्हॅलेन्टाईन्स साठी काही परवडणार्‍या गेम्सही आपण फ्लिपकार्ट वरुन मागवु शकता.
  • रोमँटीक गाण्याचा सेटः संपुर्ण रोमॅंटीक गाण्यांचा सी.डी. सेटही एक भेट रोमॅंटीक ठरेल. यामध्ये पंचमदा पासुन सध्याच्या गाण्यापर्यंत आपणांस निवड करता येईल.
  • नियतकालिक [मॅगझिन] ची वर्गणी: त्याच्या किंवा तिच्या आवडीनुसार वर्षभरासाठी तुम्ही एखादं नियतकालिक [मॅगझिन] मागवु शकता. यामध्ये इतर नियतकालिकेही असतील - अगदी 'माझी सहेली' ते 'गृहशोभिका'. काही वाचनीय नियतकालिके तुमच्या पेपरवाल्याकडेही मिळतील. त्यातल एखादं बायकोसाठीही मागवता येईल.
  • यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डे - पुढच्या सोमवारी येतोय - म्हणजे एक आठवडा आहे - बघा सोमवारची सुट्टी मिळतेय का.. एखादी मस्त विकेंड-ट्रीप होवुन जाईल - कसं?

याशिवायही तुमच्या काही [ भन्नाट ] आयड्या असतीलच... जमलं तर शेअर करा.. इतरांनाही फायदाच होईल.

यासंदर्भात वाचावं असं काही:
त्याच्यासाठी: महेंद्र कुलकर्णीं लिखित = "रोमॅंटीक आयडीयाज.."
तिच्यासाठी: कांचन कराई लिकित = "रोमॅंटीक आयडीयाज.. माझ्याही"
व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे: = "मराठी ग्रिटींग"

"व्हॅलेन्टाईन्स डे" साजरा करायचा की नाही - यावर वादा-वादी होतेच - दरवर्षी!! मला वाटतं - प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा अशा सणाची गरज नाही.

Wednesday, 2 February 2011

"जोर का झटका" - तद्दन फालतु!

परवा चुकुनच हा कार्यक्रम पाहिला. एएक्सएन् वरचा वाईप-आउट चांगला वाटला होता. मात्र "जोर का झटका" पाहुन अपेक्षाभंगच झाला.

[छायाचित्र - "जोर का झटका" संकेतस्थळावरुन]


या कार्यक्रमातील सहभागी आहेत - आकाशदीप सहगल, अमित सरीन, आशिमा भल्ला, बख्तियार ईरानी, क्लाउडिया सेस्ला, देबीना बनर्जी, डिम्पी महाजन, गौरव चोपड़ा, ग्रेसियस डीकोस्टा, हनीफ हिलाल, जेनिफर विंजेट, करिश्मा तन्ना, कृष्णा पाटिल, कुशल पंजाबी, मानस कत्याल, मनोज कुमार, मिंक ब्रार, नारायणी शास्त्री, नताशा सूरी, पायल रोहतगी, प्रियदर्शनी सिंह, राजा चौधरी, रोहित वर्मा, सिमरन कौर मुंडी, सोनिका कालीरमन, एनी, विंदु दारा सिंह व वृजेश हिरजी.. हुश्श..!

यातली कीती नावं आणि कोण ओळखीचं वाटतंय त्याचा विचार नका करु.. एक - दोन सोडले तर एकही नाव - चेहरा ओळखीचा वाटत नाही. शाहरुख फक्त कमेंटींग करतानाच दिसतो...

यापेक्षा चांगला कार्यक्रम "पोगो टी.व्ही" वर येतो. "टकेशि'ज कॅसल" नावाचा - त्यात जावेद जाफरीचा आवाज आहे. कॉमेडी म्हणुन तरी "टकेशि'ज कॅसल " या "जोर का झटका" पेक्षा कधीही चांगला आहे. किमान हसु तरी येतं. "जोर का झटका" पाहुन हसावं की रडावं - हेच कळत नाही!!

जाऊ दे... च्यायला - आपला "टकेशि'ज कॅसल" किंवा "सी.आय.डी" कधीही चांगला - हसायला तरी मोकळे..!

ता.क - ही टिपणी म्हणजे शा.खा. [शारुख हो!] च्या असंख्य - अगणित चाहत्यांना वाईट वाटावे किंवा त्यांनी हा कार्यक्रम पाहु नये यासाठी नाही! शा.खा. ला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा!

Tuesday, 1 February 2011

सावधान - इंकम टॅक्स रिफंड - फ्रॉड मेल!

टॅक्सपेअर, आपल्याला रु. ३२,७२०.०० इंकम टॅक्स रिफंड मिळणार अशी ई-मेल पाहताच काय आश्चर्याचा धक्का बसतो ना? एक तर टॅक्स भरायची मारामारी, त्यात भरलेल्या टॅक्सवर रिफंड मिळणार.. व्वॉ!


.... तर अशा प्रकारच्या ई-मेल सध्या जोर धरु लागल्यात. मार्च एन्ड जवळ आलाय - टॅक्स सेविंग - फायालिंग या सार्‍या धांदलीत अशीच एखादी ईमेल येते आणि नकळत आपण रिफंडच्या मागणीसाठी तयार होतो.

असाच एक मेल, माझा मित्र सचिनला आला. मात्र यातील बारकावे लक्षात घेवु:
१. हा ई-मेल आलेला ई-मेल आयडी सरकारी खात्याच्या डोमेनवर असल्याचं दिसतं - मात्र असे ई-मेल-एलियास बनवता येतात.
२. "क्लिक हिअर" ही लिंक भलत्याच डोमेनवर जाते. अशा लिंकवर क्लिक करायच्या आधी फक्त माऊस-ओवर केलं तरी - स्टेटस बार मध्ये त्या ती लिंक दिसते. ती लिंक इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कीच नाही.
३. थोडं पुढं जाऊन - क्लिक करुन - पाहिलं तर अगदी इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कल दिसते - मात्र वरती अ‍ॅड्रेस बार मध्ये - लिंकचा पत्ता पहा - तो नक्कीच इंकमटॅक्स च्या वेबसाईट्चा नाही.

.... यापुढच्या स्टेप्स मध्ये आपणाकडुन आपल्या बॅंक खात्यात लॉगिन करवुन घेतलं जातं - हे सगळंही नकलीच - मात्र अगदी खरं भासावं असं!

तर मंडळी - अशा फसव्या ई-मेल पासुन सावधान!

अधिक माहिती - या संकेतस्थळावर आहे.

Wednesday, 12 January 2011

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!



नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!