आंबे पूर्णिमा...
10 years ago
From today, painting is dead!
मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..
..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.
रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!
....... आज काल बातम्या जरा उशिराच मिळतायत... आत्ताच लक्ष्मणराव देशपांडे यांच्याबद्द्ल महेंद्रच्या ब्लौगवर वाचले... आता तसे म्हणाल तर ही बातमी तशी अनेक ब्लौगवर वाचायला मिळाली असती .. मात्र एका पर्स्नल टच मध्ये वाचायला अन् पहायला महेंद्रच्याच ब्लौगवर मिळाले... महेंद्रच्या ब्लौगवरती "वराड निघालय लंडनला" चा विडिओ सुध्या आहे... जरुर पहा..! ..असो....
* देवाची गाडी - मिरज - पंढरपुर दरम्यान वाहतुक करणारी आगगाडी. सध्या हा मार्ग ब्रौडगेज बनतोय म्हणे, आणि ती देवाची गाडी - मिरजच्या कारखान्यात - की - संग्राहालयात उभी आहे!