भलेही मला कधी पालखीमध्ये सामिल होण्याची संधी मिळाली नाही... आणि मीही कधी तसा प्रयत्न केला नाही.. मात्र आज तसा योग आलाच! सकाळी औफिसला जाण्यासाठी निघालो आणि सोलापुर - हडपसर रस्त्यावर पालखीसाठी रस्ता बंद..!! मग काय... रस्ता खुला होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्यायी मार्गच नव्हता... मोबाइल वरुन औफिसला सदर मेल टाकली... थॅक्स टु मोबाइल इंटरनेट!! गाडी बाजुला लाऊन पालखि बघत उभारलो... काही फोटोही काढले आणि पालखीबरोबर थोडा चाललोही... तेवढीच मनाची समजुत... पांडुरंगाला नमस्कार सांगुन बाजुला झालो..!
बरेच लोक पालखीवाल्यांना केळी आणि तिळाचे लाडु वाट होते... किमान पुण्य मिळवण्याचा तो एक पर्यायच वाटला.. असो, ज्याची त्याची श्रद्धा! एक - दोन ठीकाणी वारक-यांची मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप चालु होते... मात्र स्पिकरवरती मोठ - मोठ्याने त्यांच्या स्पौन्सर्सची नावे आधी सांगुनच!
आणि मग - पुण्याच्या वाहतुकीचे कौतुक काय सांगावे... समोर रस्ता बंद आहे असं बेंबीच्या देठापासुन सांगुनही जेंव्हा लोक तसेच आपली दुचाकी पुढे रेटत होते.. बराच वेळ सांगुनही माझे पेशन्स संपले होते.. मग काय... चांगला मध्येच जाऊन उभारलो... आणि कधी प्रेमाणे.. तर कधी अक्षरशः ढकलुन गाड्या बाजुला करत होतो... काही वयस्क मंडळीही साथ होती... आणि अशीच काही "वयक्स" मंडळी दवाखाण्याचे कारण सांगुन पुढे जायला बघत होती.... कमाल आहे ना?
असो.. तीन तासानंतर रस्ता खुला झाला... पाठमो-या पालखिला नमस्कार करुन हडपसरहुन निघालो... आणि आत्ताच औफिसात पोहोचलो... लगेच पटापट हे लिहिले.... चला आता कामाला लागतो..!
बोला - ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
पंढरीनाथ महाराज की जय!
4 comments:
D same experience I got in d morning....
post your blog at...
www.myvishwa.com
काय सुंदर कव्हरेज केलंय. फोटॊग्राफ्स तर उत्तमच. आधी कसं सुटलं पहायचं कोणासठाउक.. :) एकदम प्रोफेशनल रिपोर्ट वाटतो.
आभार महेंद्रजी,
लिहिण्यासारखं बरंच होतं... पण औफिसातुन तेवढा वेळ मिळत नाही ना... म्हटलं "राहुन जायच्या आधी".. लिहुन टाकु!
फोटो मी माझ्या मोबाइलवरुन काढलेत.. डिजिकॅम असता तर अधिक सुंदत आले असते.. तसे बरेच प्रोफेशन फोटोग्राफर फोटो काढतच होत... प्रेस फोटोग्राफर असावेत बहुदा!
पालखीचे फोटो या वेबसाइटवर आहेत.. पहा .. तुम्हाला जरुर आवडतील - http://www.sandeshbhandare.com/html/CurrentExhibition.html
Post a Comment