आज दोन दिवस झाले, आमच्या सोसयटीमध्ये पाणी नाही.. तसे पण कार्पोरेशनचे पाणी अजुन आले नाही आणि टँकरवाले पाणीच नाही म्हणताहेत! पिण्याच्या पाण्यासाठी बिसलरी चालु आहे..धुण्या- भांड्यासाठी पाणीच नाही... आई-बाबा वैतागुन गावी निघुन गेले... :(
Image via Wikipedia
"लगान" चे सिन राहुन - राहुन डोळ्यासमोर येताहेत.... !चिंब पावसात भिजुन जमाना झाला असं वाटतयं... गरमा-गरम वडा-पाव आणि वाफाळणारा अमृततुल्य चहा.... लोणावळ्याचे - राजमाची - ट्रेकिंग साठी आणि पाण्याच्या मस्तीशी - भुशी डॅम यांना अगदी आसुसलोय... पावसा... राजा .. नको रे असा अंत पाहु..!
.. ये बाबा... आता तरी ये..!
4 comments:
नाही म्हणायला आज धड-पडलाच आज थोडास्सा.. पण सलग कधी पडेल कोण जाणे..
खरंच चिंब पावसात भिजून जमाना झालाय... सह्याद्री खुणावतोय... पाय फुरफुरताहेत भटकायला...
आज आला पुण्यात. मी सांगितलंय त्याला, "ये, बस जरा, आल्यासरशी चांगला महिनाभर रहा... आताशा तुझं वेळेवर येणे होत नाही...!!!"
@प्रभास - .. हो.. आज सुरुवात तर झालीय... !
@पंकज - पाऊस पाव्हणा, एक महिना काय... चांगले दोन-तीन महिने राहिला तरी चालेल!
..... प्रतिक्रियेबद्दल आभार!
Post a Comment