आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!
आनंद मेळावा: ५५० कलाकारांनी साकारलेली १०० वर्षांपुर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण लोककला, संस्कृती व गाव यांचे सजीव दर्शन.
विकि वरुन घेतलेली अधिक माहिती अशी:
उबुंटु अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणार्या आवृत्त्या अशी उबुंटुची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. याशिवाय केडीई डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत.
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वरील लिखाण लिहिताना मित्रासोबत या विषयांवर थोडं बोलणं झालं, मात्र त्यातील वादग्रस्त मुद्दे असे:
निखिल: मला रोज कुणी ना कुणी एखादा लेख/ कविता/ फोटो पाठवत असतं. अर्थातच ते फॉरवर्डेडच असतं. मलाही माहिती आहे की पाठवणार्याची हे लिहिण्याची किंवा तयार करण्याची क्षमताच नाही. मात्र त्यालाही हे कुणीतरी फॉरवर्डच केलेलं असतं? अशा वेळी कॉपीराईट किंवा मुळ लेखक/ छायाचित्रकार यांचा संबंध कसा?
मी: हे बघ, लेखकाने त्याचे विचार लेखनात उतरवले किंवा छायाचित्रकाराने एखादे छायाचित्र काढुन ते प्रकाशित केलं की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. जर मुळ लेखक/ छायाचित्रकार माहित नसेल तर असं फॉरवर्डेड मटेरियल शक्यतो आपणहुन फॉरवर्ड करणं थांबवावं [ हां, मात्र काही सामाजिक संदेश/ माहिती देणार्या मेल्स फॉरवर्ड करा.] शिवाय अशी मेल पाठवणार्यालाही आपण हाच संदेश द्यावा. माहित असेल तर संबधिताच्या संकेतस्थळाचा दुवा द्यायलाच हवा. ते लेख/ छायाचित्र प्रत्यक्ष त्या - त्या संकेतस्थळावरच पाहुन आपणही त्या लेखकाला/ चित्रकाराला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं माझं मत. शिवाय अशा प्रकारे आपणही कुठतरी अशा प्रकाराला थांबवण्यात मदत करतोय ही जाणीवही राहिल.
निखिलः आता मला सांग, समज मी माझ्या एखाद्या मित्राचा/ ओळखीच्याचा किंवा आवडलेला एक लेख/ एक फोटो किंवा एखादं डिझाईन मी माझ्या ब्लॉगवर वापरलं. मला माहित आहे की तो लेख ज्या संगणकावर लिहिला गेला आहे - त्याची प्रणाली [ओ.एस] - किंवा - तो फोटो जे सॉफ्टवेअर [फोटोशॉप/ लाईटरुम] वापरुन प्रोसेस केला आहे - किंवा - ते डिझाईन जे सॉफ्टवेअर वापरुन बनवलं आहे [फोटोशॉप/ इलुस्ट्रेटर] - ते सारं पायरेटेड आहे! त्याच्या मशिनवर कित्त्येक - पायरेटेड - सिनेमे पडलेत!! जर आपण आपले काही चोरी झाल्याचे म्हणत असाल तर ते चोरीतुनच निर्माण झालेलं नाही का? मग त्याने "कॉपीराईट - कॉपीराईट" असं म्हणावं का? की तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?
मी: अरे बापरे! अगदी खोडालाच हात घातलास लेका!
हे बघ माझं प्रामाणिक मत असं आहे की पायरसी आणि कॉपीराईट्स दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. " स्वत: पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरुन कॉपीरायटेड मटेरियल आहे " असं संबोधणं चुकीचं असेल/ नसेल. त्याकडे नक्कीच प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. आणि कॉपीराईट्स संबंधी जागरुक असणारे हे लिगल सॉफ्टवेअर्सच वापरतील ना? कारण उद्या त्यांनी अशा एखाद्या चोरा-विरुध्द तक्रार करायची म्हटली तर त्यांना संबधित पुरावे देताना त्यांच्याकडील असणार्या मुळ प्रतिसोबत संबधित संगणक किंवा सोफ्टवेअर्स यांचीही माहिती द्यावी लागु शकते आणि अशा वेळी कॉपीराईट्सच्या ऐवजी पायरसीची केस होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
संस्कृत भाषा पृथ्वीवरील प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानतात. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांची उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ञ "पाणिनी"ने इ. स. पूर्व काळात "अष्टाध्ययी" या ग्रंथात संस्कृताची पुनर्रचना केली. संस्कृत भाषेतील शब्दांनाच भारतीय भाषांमध्ये योजले आहे. संस्कृतमधूनच इतर भारतीय भाषा जन्मल्या आहेत. - विकिपीडिया
मला मिळालेल्या ई-मेल वरुन - जसंच्या तसं - आपल्या माहितीसाठी.
यासंदर्भात वाचावं असं काही:
त्याच्यासाठी: महेंद्र कुलकर्णीं लिखित = "रोमॅंटीक आयडीयाज.."
तिच्यासाठी: कांचन कराई लिकित = "रोमॅंटीक आयडीयाज.. माझ्याही"
व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे: = "मराठी ग्रिटींग"
"व्हॅलेन्टाईन्स डे" साजरा करायचा की नाही - यावर वादा-वादी होतेच - दरवर्षी!! मला वाटतं - प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा अशा सणाची गरज नाही.
अधिक माहिती - या संकेतस्थळावर आहे.
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!