Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 11 March 2010

image - graphics collctions : Never delete this post!







































































































------------------ ---------------------
























































MM Hotlink Testing


Thursday, 25 February 2010

सादर करत आहोत मराठी मंडळी.कॉम, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ!

ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.

होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते. जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.


याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.
गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.

ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!

नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.

संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?

अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.

आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.

तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”

संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?

सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, मराठीमंडळी.कॉम

यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

आपली ऑनलाईन उपस्थिती नोंदवा.

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा

pankajzarekar[at]gmail.com
mebhunga[at]gmail.com
aniket.com[at]gmail.com
vikrant.deshmukh888[at]gmail.com

- मराठी मंडळीसाठी - पंकज झरेकर.

Thursday, 18 February 2010

शिवजयंतीच्या शुभेच्छा!


प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलवतंस,
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर,
राजाधिराज, छत्रऽपतीऽऽ शिवाजी महाराज कीऽ जऽयऽऽ!

[छायाचित्र साभारः मराठी विकि]

Tuesday, 16 February 2010

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ह्या वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा १. शासकीय संकेतस्थळे आणि २. अशासकीय संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येईल. पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे १५०००, १०००० आणि ५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे ३५०००, २०००० आणि १५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.

दि. २०/०२/२०१०पासून दि. ०६/०३/२०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या दुवा क्र. १ ह्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशपत्रिकेचा दुवा (लिंक) राज्य मराठी विकास संस्थेच्या दुवा क्र. २ तसेच दुवा क्र. ३ आणि दुवा क्र. ४ ह्या संकेतस्थळांवरही देण्यात येईल. वरील कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्णपणे भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे. प्रवेशपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत ०६/०३/२०१० ही आहे. वरील गटांपैकी प्रत्येक गटाला पहिले, दुसरे आणि तिसरे अशी तीन पारितोषिके देण्यात येतील.

संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅन्डर्ड्‌स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावत्‌पणा, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय (इण्टरऍक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.

[मनोगत वरुन - जसंच्या तसं - माहितीसाठी.]

सदर स्पर्धेसाठीची ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेंव्हा ६ मार्चपुर्वी आपला अर्ज पाठवा.

Monday, 1 February 2010

बुकमार्कलेट्सः एक क्लिक - काम फत्ते!

कधी कधी इंटरनेटवर अगदी छोट्या गोष्टी म्हणजे - पहात असलेल्या साईटची पी.डी.एफ. बनवने, लिंक ट्विटर वर पाठवने किंवा तुम्हाला आवडलेली ती वेबसाईट/ ब्लॉग मित्राला पाठ्वणे यासाठी बरीच मशागत करावी लागते. मात्र या सार्‍या आणि आणखी काही उपयुक्त गोष्टी जर एका क्लिक मध्ये करता आल्या तर? सोप्प आणि काम फत्ते ना?


फायरफॉक्ससाठी: हिरव्या बॉर्डर च्या बॉक्स वर क्लिक करुन [धरुन ठेवा] ते वरच्या बुकमार्कबारवर आणुन सोडा! किंवा हिरव्या बॉर्डर च्या बॉक्सवर राईट क्लिक करुन - "बुकमार्क धिस लिंक" सिलेक्ट करा. आलेल्या बॉक्स मधुन "Folder = Bookmarks Toolbar" सिलेक्ट करा आणि सेव करा!

आय.ई.: हिरव्या बॉर्डर च्या बॉक्सवर राईट क्लिक करुन - "अ‍ॅड टु फेवरीट" सिलेक्ट करा. जरी अनसेफ आहे असा मेसेज दिला तरी ठिक आहे म्हणा!

बुकमार्कः ब्राउजरमध्ये, अ‍ॅड्रेसबारच्या खाली [या जागेला बुकमार्क'बार म्हणतात] एखाद्या वेबसाईट/ ब्लॉगची लिंक जोडुन ठेवणे. [बुकमार्कींग]

बुकमार्कलेटः ब्राउजरमध्ये, बुकमार्क'बार वर 'जावास्क्रिप्ट' किंवा ब्राउजर मध्ये चालणारी स्क्रिप्ट वापरुन एखादं काम [ई-मेल/ प्रिंट/ ट्विट इ.] एका क्लिक मध्ये करुन देणार्‍या छोट्या कमांड्स.


गुग.ल: सध्या माझ्या सर्वात जास्त वापरात असणारी ही सुविधा. ट्विटर वगैरेसाठी लांबलचक लिंक छोटी करण्यासाठी ही सोय मस्त आहे. तशा, टायनी युआरएल किंवा बीट्.ली अशा आहेतच. मात्र बुकमार्ककरुन एका क्लिकमध्ये तुम्हाला शॉर्ट लिंक करुन देणारी ही सोय माझी तरी आवडती आहे!

गुगल बुकमार्क: गुगलची गुगल बुकमार्क ही सुविधा आपल्या आवडत्या वेबसाईट्स एकत्र केलेली करण्यास मदत करते. यामध्ये जोडलेल्या साईट्स/ लिंक्स आपणास कधीही आणि कोणत्याही ब्राउजर मधुन पाहता येतात. त्यामुळे एखादी साईट आवडली की ती लागलीच बुकमार्क करणं कधीही फायद्याचच!

नोट करा:गुगलची नोटबुक ही सुविधा म्हणजे ऑनलाईन नोंदवहीच आहे. यामध्येही आपण वेबसाईट्स लेबल्स आणि आपल्या विशेष नोंदीसह बुकमार्क/ सेव करु शकता.

ट्विट करा: ट्विटरबद्दल नव्यानं काही सांगायची गरज नाहीच. आपण जर "एकोफोन" वापरत असाल तर अतिउत्तमच. नाही तर ही सोय वापरुन तुम्हाला लागलीच सध्या पहात असलेल्या साईटबद्दल ट्विट करता येईल.

ब्लॉग पोस्ट करा: जर तुम्ही ब्लॉगरवर लिहित असाल आणि एखादी झटपट पोस्ट टाकायची असेल तर हा उत्तम मार्ग. म्हणजे समजा तुम्ही एखादं बातमीपत्र वाचताहात आणि वाटलं की ती न्युज पटकन ब्लॉगवर टाकावी. या बुकमार्कलेटचा वापर करा. तो त्या बातमीची लिंक वगैरे आपोआपच घेईल. हां मात्र तुमचे एकापेक्षा जास्त ब्लॉग असतील तर पब्लिश करायच्या आधी उजव्या कोपर्‍यात जरुर पहा - कोणत्या ब्लॉगवर पब्लिश करताहात.

जीटॉक: जीमेल नेहमीसाठी ओपन न ठेवता जर जी'टॉक पहायचं असेल तर ते एका छोट्याशा पॉप-अप बॉक्स मध्येही दाखवता येतं. हवं तेव्हा पहा.. बंद करा. एक क्लिक!

जीमेल: एखादी लिंक पटकन जीमेल ने पाठवण्यासाठी हा मस्त शॉर्टकट. एका क्लिक मध्ये मेल कंपोज होते. विषय आणि आशय आपोआपच भरला जातो. कुणाला पाठवायची, त्याचा इ-मेल अ‍ॅड्रेस टाका आणि क्लिक सेन्ड!

कोण ट्विटले?:तुमच्या पहात असलेल्या साईट् किंवा ब्लॉगची/ वेबपेजची लिंक ट्विटरवर आहे का? असेल तर कुणी ट्विट टाकले हे एका क्लिकमध्ये माहित करुन घेण्यासाठी ही चांगली सोय आहे!

स्क्रीनशॉट:ही आणखी एक भन्नाट सोय आहे. काहीवेळा आपणास वेबपेजचा स्क्रिनशॉट हवा असतो. प्रिंटस्क्रिन करुन - पेंटब्रश वापरुन फार अवघड काम होतं! मग ही सोय - एकाच क्लिक मध्ये समोर असलेल्या पानाचा स्र्कीनशॉट तयार. शिवाय हीच सोय वापरुन तुम्ही घेतलेला स्क्रीनशॉट पीडीएफ/ मेल./ ब्लॉग/ ट्विट..... आणि बरंच काही करु शकता. शिवाय तो स्क्रीनशॉट एडिट करण्यासाठी पिक्सलर ही सुविधाही वापरता येईल.

पीडीएफ:ऑनलाईन पी.डी.एफ. बनवण्यासाठी ही चांगली सोय आहे. समोर ओपन असलेल्या साईटची एका क्लिकमध्ये पी.डी.एफ. फाईल बनवता येते. मराठी किंवा इतर भाषांमधील साईट्स यांच्या पी.डी.एफ, चांगल्याबनत नाहीत. मात्र इंग्रजीमधल्या साईट्सची चांगली पी.डी.एफ बनवता येते. ओपन ऑफिसच्या रायटरमध्येही तुम्हाला एका क्लिकमध्ये पी.डी.एफ. बनवता येते हे माहितच असेल. शिवाय टेंप्लेट वापरुन तुम्हीही ई-बुक बनवु शकता!

जर तुम्ही पी.डी.एफ. बनवण्यासाठी सॉप्टवेअर शोधत असाल तर जीडॉक क्रीएटर नावाचं फ्री सॉप्टवेअर उत्तम आहे. वर्ड/ पॉवरपॉईंट यापासुन पी.डी.एफ. बनवण्यासाठी हे उत्तम सॉप्टवेअर आहे.

या शिवाय, पिक्सलर, ब्राउजर मध्ये चालणारा एक फोटो एडिटर आहे. फोटोशॉप वगैरे सारखी सॉप्टवेअर ला चांगला पर्याय आहे! त्याचं फायरफॉक्सचं एक्टेंशन वापरुन कोणताही ऑनलाईन फोटो तुम्ही ब्राउजरमध्येच एडिट करु शकता! फायरशॉट हे फायरफॉक्सच एक्टेंशन ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी अतिउत्तम! पिकनिक हा ऑनलाईन फोटो एडिटरही त्याच तोडीचा आहे!

आणि हो, गुगलच्या काही सुविधा वापरण्यासाठी गुगल अकॉंटनं लॉगिन करणं गरजेचं आहे

तुम्ही हे बुकमार्कलेट्स वापरुन पहा.. पुन्हा भेटुच! हो, काही प्रश्न - आहेत..? कमेंट्स/ ई-मेल लिहा!

Monday, 25 January 2010

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!



मुळ ग्राफिक्स - साभार - सुलेखाब्लॉग्ज

ये सायबा....

पुण्यात [आणि काल मुंबईलाही पाहिलं!] चालताना - गाडी चालवताना - जरा आसपास नजर हिरवा. आपणांस "सायबांचे" अभिनंदन किंवा स्वतःचे "शुभेच्छा" करणारे/ देणारे छोट्यापासुन बोर्डपासुन अगदी मोठ्या होर्डींग दिसतील. सगळयांची चुरस हीच की आमचा/ माझा बोर्ड सगळ्यात मोठा कसा दिसेल! मग अक्कल पायतळी तुडवत बोर्डावर बोर्ड चढवायचे. सगळीचकडे बॅनर्स/ होर्डींग लावायची जणु होडच लागली आहे.

[वर्षाने पाठवलेल्या ई-मेल मधील हे अधिक बोलकं चित्र!]

हे सारं पाहुन मनात प्रश्नांच काहुर उभारतं:
  1. ह्या बोर्ड लावणार्‍यांना असं वाटत असेल का - की आपण आपल्या सायबाचा बोर्ड जेवढा मोठा लाऊ, तेवढा आपल्याला लोक सायबाचा डावा-उजवा हात समजतील? 'उजवा' समजणारच नाहीत कारण तो आधीच कुणीतरी जवळचा किंवा घरातलाच असतो! डाव्याची कामं माहित असुनही यांना 'डावा' व्हायला काय-काय करावं लागतं?
  2. भलेही अंगठा छाप असला तरी फोटो मात्र रेबॅन ग्लास मध्ये - फ्रेंच कट ठेऊन का असतो?
  3. वरती ब्लेझर चढवलेला असतो, मात्र खाली पायात स्पोर्टस् शुज का असतात?
  4. गल्ली किंवा मतदार संघ/ वार्ड सोडला तर यांना कुणी ** ओळखत नसलं तरी फोटो मात्र अगदी विक्टरी V - ची पोज मध्ये का असतो?
  5. शहिदांना श्रध्दांजली असं लिहिलेल्या बोर्डवर यांचेच फोटो शहिदांपेक्षा मोठे होते. म्हणजे हे सायबा किंवा त्यांचे ते कार्यकर्ते शहिदांच्या श्रेणीचे किंवा त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत का?
  6. हे कार्यकर्ते किंवा त्यांचे 'सायबा' कितीही म्हातारे झाले तरी या बोर्डावर फोटो हे जवानीतलेच का लावतात? संदेश देताहेत की लग्नाची उमेदवारी जाहिर करताहेत?
  7. काही बोर्डांवर तर अक्षरशः काळे - सावळे - गोरे अशा तीन रंगात यांचे फोटो होते. ही त्या फेअर अन् लवली ची जाहिरात नव्हती?


उत्पादने, सुविधा किंवा बाजारात एखादं नविन उत्पादन आलं की कंपन्या भली मोठी होर्डींग्ज लाऊन त्याची जाहिरात करतात. उद्देश सरळ असतो, त्यांचं ते उत्पादन सगळ्यांना दिसावे, समजावे त्यांनी ते खरेदी करावे. एक सरळ-सरळ व्यावसाहिक पावित्रा असतो तो. थोडक्यात म्हणजे "ही वस्तु विकावु आहे!" गल्लो-गल्ली आणि रस्त्यांच्या मध्ये लावलेले हो बोर्ड वाहतुकीसाठी नक्कीच एक 'पेन इन **' आहेत!

मात्र मला आजपर्यंत हे नाही समजले की - आपला स्वत:चा किंवा सायबांचा - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी असे बोर्ड लावणे आवश्यक आहे का? तुम्ही काय विचार करुन असे बोर्ड लावता हो? तुम्ही स्वत: ला आणि 'सायबा' लाही 'विकायला' तर मांडत नाही ना?

मला सांगा - दर वेळी/ दरवर्षी येणारे हे - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी तुम्ही किमान २५ हजार तरी नक्कीच खर्चत असाल..? हो, या पेक्षाही जास्तच! मग त्या पैशात:
  • एखाद्या शेतकर्‍याचं कर्ज फेडायला तुमची किंवा सायबाची ** मरते काय? नाहीतरी, "गरज सरो आणि वैद्य मरो" ही म्हण सार्‍यांनाच लागु आहे...! द्या ना ते पैसे शेतकर्‍यांना - सांगा तुमचा/ सायबा चा वाढदिवस आहे - करा मदत. कीती दिवस फक्त त्यांच्या दु:खावरच / आत्महत्यांवरच आपली खिचडी पकवणार आहात?
  • एखाद्या गरिब/ आश्रम शाळेला वह्या-पुस्तके / कपडे द्या... "शिक्षणाच्या आयचा घो" घालण्यापेक्षा त्याचा प्रसार करायला मदत करा!
  • तुमच्या गल्लीत/ वार्डात नसलेला/ बिघडलेला एखादा रस्ता दुरुस्त करा... नव्याने बनवा आणि सांगा - वाढदिवसानिमित्त आम्ही जनतेला रस्ता बनवुन दिला. आशिर्वाद मिळतीलच हो!
  • शिवाय असं काहीतरी वेगळं - चांगलं केलंत तरे फायदाही तुमचाच आहे - तुमचं नाव होऊल - चार लोकं चांगल्या कामाचं कौतुक करतील... माझ्यासारखाच एखादी सा.की. तुमच्या बद्दल/ सायबाबद्द्ल चार शब्द 'चांगले' लिहिल. सायबाचीही तुमच्यावर 'मेहर' राहिल शिवाय सत्कार्य केल्याचं जे सुख-समाधान आहे त्याची महती म्या पामरानं काय सांगावी... आपणच ती अनुभवा!

अजुनही बरेच मार्ग आहेत.. तुमचे आणि सायबाचे "संदेश" चांगल्या मार्गाने जनतेपर्यंत पोहचवण्याचे..!

ही पोस्ट कुण्या एका 'सायबा' साठी नाही. माझ्यासाठी सारे सायब, बाबु, आण्णा, काका, तात्या, दादा, मावशी वहिनी सगळे सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही कुणा एकाला धरुन विचार करु नका!

संदेश/ शुभेच्छा मनापासुन निघाव्यात आणि मनापर्यंत पोहचाव्यात. दिखाव्याची काय गरज आहे हो? तुमचे काम तुमच्या समाज कार्यातुन दाखवुन द्या.. काय सायबा ...?

मलाही माझा आणि माझ्या नेत्याचा/ सायबाचा रास्त अभिमान आहे.. पण फालतु आणि पोकळ शुभेच्छा आणि संदेशांपेक्षा मी नेहमीच कार्याला/ कृतीला महत्त्व देईन. तुमचं काय?

Sunday, 17 January 2010

आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत!


गेल्या काही दिवसांपासुन महाजालावरती चर्चिला जाणारा "मराठी ब्लॉगर्स मेळावा" आज पार पडला. मी जास्त काही लिहित नाही, कारण यावर आधीच - प्रभास, पेठे काका, अनिकेत, पंकज, हरेकृष्णाजी आणि काही मान्यवरांनी, ट्विटर वरुन लिहिले आहे. मला फक्त आपणा सर्वांचे आभार मानायचे आहेत :)

आजचा हा मेळावा सफल करण्यासाठी आपण दिलेले योगदान, आयोजक, सहकारी, आलेले - न आलेले ब्लॉगर्स, वाचक, पत्रकार यांचे मनःपुर्वक आभार आणि अभिनंदन!

Wednesday, 13 January 2010

संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..

तुम्हाला माहितंयः [साभार - सुहास]
  • १४ जानेवारी १७६१ ला याच दिवशी पानिपतच्या मैदानात मराठे अणि गिलिचे यांचे युद्ध झाले....
  • यात देशासाठी आहुति देणारे ४५,००० मराठा वीर होते ...
  • त्या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला वैधव्य आले...
  • महाराष्ट्रातील स्त्रियांच्या त्या दिवशी १,५०,००० बांगड्या फुटल्या...
  • मराठा वीर ५ दिवस उपाशी राहून लढला अणि लढता लढता वीरगतिस प्राप्त झाला ...
  • त्यादिवशी पानीपत च्या मैदानात सदाशिव भाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवे, सूर्याजी पवार असे असंख्य मराठे त्यादिवशी अमरात्वाला प्राप्त झाले...

आज त्या अमरवीरांची आठवण करुन त्यांना आदरांजली वाहतो!

कोणावरही अशी संक्रांत येऊ नये ह्याच शुभेच्छा ....
आणि गोड-गोड = शूभ-शूभ बोला हाच संदेश!

बाकी काही मस्त मिठाई व हलवा अनुक्षरेमहेंद्रजी यांच्या ब्लॉगवर चाखायला हरकत नाही!

..... आणि काही गोड - हलवा आणि तिळाचे लाडु, आमच्या कडुन ही - गोड - गोड बोलण्यासाठी!


Monday, 4 January 2010

पोटोबा - मराठी पाककृतींचं ई-बुक!

नमस्कार!
मायाजालावर असणार्‍या अनेक सुविधांपैकी एक म्हणजे "खादाडी"! हो, बर्‍याचदा तुम्ही आम्ही या मायाजालावरती पटापट बनवता येणार्‍या किंवा घरच्याघरी बनवता येणार्‍या काही पाकक्रिया शोधत असतो. बायकोसाठी काहीतरी नविन मेनु शोधणं माझ्या इतर कामांपैकी एक. आता मायाजालावर या सगळ्या पाकक्रिया शोधणे आणि त्या एकत्र करणं तसं अवघड नसलं तरी कंटाळवाणं नक्कीच वाटतं. शोध-शोध शोधायचं आणि नेमकं हवं त्यावेळी ते सापडत नाही, मग मनाचा आणि खाण्याचा मेनुच बदलतो! तेंव्हा म्हटलं - मायाजालावर आपल्या पाकक्रिया लिहिणार्‍या "खवैय्यांच्या" परवानगीने आपण एक छोटसं "ई-बुक" तयार करावं आणि त्याच संकल्पनेचं हे एक रुप!


पोटोबा - १: चाळीस पाककृतीं साधं - सोपं पुस्तक!
डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा!
"पोटोबा"चं पहिलं "ई-बुक" भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.
चला तर मग - खादाडी सुरु करुया!

डाऊनलोड्स:

Sunday, 3 January 2010

ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग!

महेंद्रजींनी ब्लॉग न लिहणार्‍यांची बरीच कारणं दिलीत.. प्रत्येकाचे काही न् काही कारण असतेच.. पैकीच एक म्हणजे - दरवेळी कोणत्या विषयांवर लिहायचे? ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर काही मंडळीकडचा ब्लॉगच्या आयडिया - किवा विषय म्हणा - संपल्यासारखे वाटु लागतात. मग लिहण्यासाठी टाळाटाळ साहजिकच आहे! असो. तर मलाही असं होतंच.. म्हणुन एकदा महाजालावर थोडी शोधा-शोध करुन पाहिलं आणि ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे चक्क शंभरपेक्षा अधिक मार्ग सापडले!

मला माहित आहे.. ही पुर्ण पोस्ट वाचणे जरा वेळ खर्ची करण्यासारखं आहे. म्हणुनच त्याची साधी पी.डी.एफ. बनवली आहे.
डाऊनलोड करा आणि आरामात वाचा.

चला त्यावर सविस्तरच बोलुया...!

१. आवडीचे कोनाडे शोधा:
बर्‍याच ब्लॉग/ वेबसाईट्सवर आपल्या आवडीचे लेख/ विषय असतात. गुगल-रीडर मध्ये अशा वेबसाईट्स/ ब्लॉग यांची ई-मेल वर्गणी [सबस्क्रिप्शन] घेऊन ठेवा आणि दररोज - वेळ मिळेल तेंव्हा किमान त्याच्या मथळयावर नजर फिरवा. तुम्हाला तुमचा विषय मिळेल. अशाच काही मथळ्याचसाठी "डंप लिटल मॅन" किंवा "लाईफहॅक" या संकेतस्थळांना भेट द्या - त्यांचे सबस्क्रिप्शन घ्या.

२. लोकल - स्थानिक वर्तमान पत्रे वाचा:
तुमच्याच शहराचे - विभागाचे किंवा गावचे स्थानिक वर्तमान पत्रही तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर एखादी बातमी - आयडिया देऊ शकतं. बर्‍याचदा, आपल्या आवडीबाहेचं वाचनही आपल्याला एखादी भन्नाट कल्पना/ विषय देतं.

३. वाचकांना विचारा
तुमचा ब्लॉग वाचणार्‍यांना विचारुन पहा - त्यांना कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल? काही जण, अगदी प्रोफेशनल ब्लॉगर्सही, त्यांच्या वाचकांकडुन अशी माहिती विचारतात आणि त्यावर येणर्‍या मतांमधुन/ प्रतिसादातुन तुम्हाला तुमचा विषय निवडता येतो. उदा. प्रोब्लॉगरचा डॅरन रोज.

४. तुमचे प्रश्न - उत्तरे शोधा:
चांगल्या पोस्ट/ लिखाण हे तुम्हाला पडलेल्या लाख मोलाच्या प्रश्नावर अवलंबुन असतं. तुमच्या विषयाला अनुसरुन विचारलेले प्रश्न, त्याची उत्तरे यातुनच तुम्हाला लिहायला एक चांगला विषय मिळु शकतो. किमान तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच एखादी पोस्ट होऊ शकतं! याहु आणि विकि वर तुम्हाला अशी बरेच प्रश्नोत्तरे सापडतील.

५. कल्पना करा - तुम्ही एक सॉलिड लेख लिहिलाय!
जरासं वेगळं वाटलं ना? अहो कल्पना करा की तुमची एक भन्नाट पोस्ट झालीय.. लोक त्या लेखांबद्दल चर्चा करताहेत... प्रतिक्रिया लिहिताहेत आणि त्यातुनच तुम्हाला नविन विषय सुचतोय - नवी पोस्ट लिहायला!

६. फ़ोरम - चर्चासत्रांना भेट द्या
इंटरनेटवरील फोरम - चर्चा सदरांनी भेट द्या.. बघा लोक कशाबद्दल आणि काय बोलताहेत. त्यांना काय हवंय, कशाबद्दल माहिती हवीय? जर तुम्हाला हे कळालं तर तुमची पुढची पोस्ट बनलीच ना! इंग्रजीच नाही तर तुम्हाला "मिसळपाव", "मनोगत", "मायबोली" यांवरही रोज नविन विषय वाचायल मिळतील हो!

७. आर्टीकल डिरेक्टरीजना भेट द्या
विषयवार माहिती देणार्‍या "मार्गदर्शिकांना" - डिरेक्टरींना भेट देऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या किंवा न आवडत्या विषयांवरही अधिक माहिती मिळवता येईल. काही वेळा लिहु घातलेल्या किंवा पुर्ण होत आलेल्या पोस्टलाही संपुर्ण करण्यासाठी अशा मार्गदर्शिका फार उपयोगी पडतात. उदा. इझाईन मार्गदर्शिका

८. इंटरनेट वरील शोधाचा उपयोग करा.
गुगल वर काही शोधताना तुमच्या शोध शब्दासारखेच - साधर्म्य असणारे शोध तुमच्याआधी घेतल्या गेल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. ते शोध शब्द काय होते.. लोक त्यातुन काय शोधत होते हे त्या शोधा वर - पोस्टवर जाऊन पहा, तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळतेय का? म्हणजे काही शोधताना सापडलेल्या माहितीचाही - पुढची पोस्ट लिहिताना उपयोग होईल, नाही का?

९. काही ठराविक शब्द शोधा
हा अजुन एक सोपा मार्ग. एखादा शब्द घ्या आणि त्यावर शोधा. बघा काय - काय हाती लागतंय. उदा. देतो. समजा मी "पुणे" असा शब्द "वर्डट्रॅकर" या साधनाच्या सहाय्याने शोधला तर मला चिक्कार शब्द सापडले. तुम्हीही तुमचा एखादा शब्द शोधुन पहा!

१०. ऑनलाईन वाचा
स्थानिक बातम्या प्रमाणेच ऑनलाईन न्युज ही नविन लिहायला विषय मिळवुन देतात. ऑनलाईन बातम्या वाचण्याचा मोठा फायदा म्हणजे - ताबडतोब बातमी वाचायला मिळते. शिवाय, गुगल वापरुन देशात चाललेल्या "हॉट ट्रेन्ड्स" बद्दल ही माहिती घ्या. यातुनच तुम्हाला तुमच विषय मिळेल ना! उदा. आजचे "हॉट ट्रेन्ड्स" पहा.

११. ऍनालीटीक्सचे आकडे पहा
पाठीमागच्य एका पोस्टमध्ये मी गुगल ऍनालीटीक्स बद्दल लिहलं होतं. त्याच्या रिपोर्ट मध्ये पाहताना तुम्हाला कळेल की लोक कोणत्या विषयावर जास्त वाचताहेत, कोण काय शोधुन तुमच्या ब्लॉग/ साईटवर आलं. ही माहिती वापरुन किंवा त्यावरच तुम्हाला नविन पोस्ट लिहिता येईल.

१२. जुन्या पोस्ट धुंडाळा
तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला लिहिलेल्या विषयाबद्दल आठवतंय? जरा स्वत:च्याच जुन्या पोस्ट धुंङाळुन पहा. त्यातले विषय, वाचकांच्या प्रतिक्रिया यावरुन तुम्हाला नविन पोस्टसाठी काही सुचेलच ना!

१३. दुसऱ्यांच्या ब्लॉगच्या जुन्या पोस्ट धुंडाळा
काही जाणकार आणि प्रसिध्द ब्लॉगर्सच्या जुन्या पोस्ट धुंडाळा. काही नविन आयडिया मिळतील.... हां, मात्र तीच पोस्ट कॉपी - पेस्ट मारु नका म्हणजे झालं!

१४. कुणाची तरी मुलाखत घ्या!
कुणाची तरी म्हणजे एखाद्या विचारवंताची, गावच्या सरपंचांची, शेतकर्‍याचीही! पत्रकार म्हणुन नव्हे.. त्यांचे विषय ... अडचणी/ मत समाजाला अवगत करुन देता आलं तर एक समाजसेवाच होईल नाही का?

१५. अमेझॉन वर शोधा
अमेझॉन वर तुम्हाला सध्याच्या प्रसिध्द पुस्तकं - विषय या बद्दल माहिती मिळेल. ती वापरुन एखादी ब्लॉगपोस्ट नक्कीच लिहिता येईल.

१६. टेड.कॉम वर पहा - नविन काय आहे?
टेड.कॉम या साईटवरुन तुम्हाला समजेल की सध्या तांत्रिक - करमणुक किंवा इतर बाजारात काय चालु आहे. या नविन घडामोडीबद्दल तुम्हालाही माहिती मिळेल.

१७. रिकाम्या वेळात - विचार करा!
रिकामं मन - शैतानाचा कारखाना असतो असं म्हणतात... हाच कारखाना आपण आपल्या ब्लॉगसाठी नविन पोस्ट छापायला वापरायचा! मनात आलेला विषय लागलीच कागदावर - समोर असणार्‍या वहीत, हवं तर मोबाईलमध्ये ड्राफ्ट करुन ठेवा आणि त्यावर लिहा.

१८. पी.एल.आर. आर्टिकल्स शोधा
अगदीच विषय संपले असं वाटत असेल तर हा पर्याय. पी.एल्.आर. म्हणजे "प्रायवेट लेबल राईट्स". यानुसार तुम्ही एखादं पुस्तक, लेख खरेदी करुन नंतर तुमच्या सोयी/ आवडीनुसार त्यात बदल करु शकता. उदा. पी.एल.आर. स्टोर

१९. संगित ऐका.
गाणी ऐकणं - सर्वांनाच आवडतं.. नाही का? गाणी ऐकताना एखादा शब्द/ कडवं किंवा त्यातला एखादा ठेकाही तुम्हाला नविन पोस्ट लिहायला विषय मिळवुन देईल. शिवाय - आवडती गाणी/ गायक/ संगीत अशा अनेक विषयांवर लिहिता येईल ते सांगायची गरज नाही, हो ना :)

२०. मुक्त विचार
कोणताही विषय पुर्वनियोजित न ठेवता नविन विषयांच्या विचारात मनाला अगदी मोकाट सोडा.. बघा काय विचार मनात येताहेत.. ते विचार लागलीच नोंद करुन ठेवा.

२१. कोट्ससाईला भेट द्या
थींक-एक्जिस्ट किंवा ब्रेनीकोट्स यांसारख्या संकेतस्थळांना भेट देऊन पहा. अनेक वेगगेळया विषयांवर तुम्हाला चांगले कोट्स - विचार वाचायला मिळतील. त्यातलेच काही विचार तुम्हाला एखादी चांगली पोस्ट लिहायला मदत करतील.

२२. मित्र आणि नातेवाईकांना विचारा
मित्र आणि नातेवाईकांकडे "मी नविन पोस्ट लिहितोय, तुम्हाला काही प्रश्न किंवा माहिती हवी आहे का?" असं विचारुन पहा. एका पेक्षा एक आयडिया मिळतील. कदाचित तुम्ही विचार न केलेला किंवा मनात नसलेला सुद्धा एखादा विषय लिहायला मिळेल.

२३. माईन्ड ब्लॉकेज!
अगदी तडकाफडकी विषय - म्हणजे, बरेच आठवुनही जर तुम्हाला एखादा विषय/ नाव किंवा सिनेमाच आठवत नसेल तर तो विषय मना आल्या-आल्या तुम्हाला सुचलेला विषय किंवा कल्पनाही नविन पोस्ट लिहिण्यास पुरेशी असते. अगदी मुळात न घुसता लागलीच मिळालेल्या - सुचलेल्या विषयावरच लिहायला घ्या!

२४. ध्यान - मेडिटेशन करा
मेडिटेशन - मी काही अगदीच ध्यानमग्न व्हायला सांगत नाही, पण बर्‍याचदा अगदी डोळे मिटुन शांत - निर्विकार बसुनही मनातले अनेक विचार साफ होतात. मनात शांत रस निर्माण होऊन तुम्हाला एखादा विषय नक्कीच सुचतो!

२५. गुगल-वंडर-व्हील
गुगल वंडर व्हील ही सुविधा वापरुन आपल्याला आपण शोधत असलेल्या फ्रेज बद्दल जरा अधिक माहिती मिळते. आता हे चक्र कसे वापराल?
१. गुगल.कॉम वर जा - शक्यतो गुगल त्या त्या देशाचे सर्च इंजिन वापरते त्यामुळे गुगच्या होमपेजवर जाऊन गुगल.कॉम वर क्लिक करा.
२. एखादा शब्द किंवा फ्रेज शोधा.
३. सर्च रिजल्ट पानावर, गुगलच्या लोगो खाली "show options" दिसेल. त्यावर क्लिक करा.
४. जरा खाली स्क्रोल करुन "standard view." पहा आणि त्यामध्ये "wonder wheel." वर क्लिक करा आणि पहा, तुम्हाला अनेक पर्याय दिसतात!

उदा. गुगल वंडरवर "ब्लॉगिंग" शोधा... आणि हे घ्या निकाल.
आता तुम्हाला तुमच्या शोधाबद्दल अधिक माहिती घेणे सोपं जाईल!

२६. ट्विटरवर टॅग्स व टॉपिक्स शोधा
ट्विटरबद्दल आपणांस माहितचा आहे. १४० अक्षरांत आपल्या सद्य - परिस्थिती - कार्य इ. बद्दल आपण इतरांना माहिती देवु शकतो. ट्विटरवर "हॅश टॅग" या सदरात आपण आपला निरोप जोडुन त्या विषयांवर अधिक ट्विट्स पाहु शकता. असे "हॅश टॅग" आपणांस नविन लेखन करण्यासाठीही वापरता येतील. सध्याचे हॅश टॅग पाहण्यासाठी आपण हॅशटॅग या संकेतस्थळालाही भेट देवु शकता.

२७. काहीतरी वेगळं करा - लिहा!
वेगळं म्हणजे, जे करायचं राहुन गेलं.. जसं एखादा गड किल्ला - ट्रेक - सामाजिक कार्य वगैरे. असं काही हातुन घडलं तर त्यात जो आनंद आहे तो अवर्णनियच! आणि तो आनंद - अनुभव इतरांशी वाटण्यातही वेगळाच आनंद आहे. त्यावर एखादी पोस्ट नक्कीच होईल, नाही का?

२८. पुस्तक वाचा!
आता हे काही सांगावं लागत नाही! मात्र बर्‍याचदा कामाच्या गडबडीत अगदी प्रसिध्द आणि आपली आवडती - आवडत्या लेखकाची पुस्तकं वाचणेही राहुन जाते. थोडा वेळ काढुन ती वाचुन काढा. मग त्यातील आवडलेल्या लेख/ मुद्दा/ लेखक यांवर आपणांस नक्कीच लिहता येईल.

२९. खेळ खेळा
सध्याच्या धावपळीच्या जगात मैदानी खेळ खेळायला वेळ मिळणं जरा कठीणच, नाही का? असो. आपण काही संगणकावर असणारे खेळ - ज्याला व्ही.डी.ओ. गेम्स म्हणतात ते तर खेळुच शकतो. अशाच आपल्या आवडत्या खेळाबद्दल, तो कुठे - कसा खेळता येईल/ त्यातील टिप्स - ट्रिक्स यावर लिहा.

३०. मुलांशी बोला
"मुलं म्हणजे देवाघरची फुलं" असं म्हणतात. अगदी निरागस आणि बिंधास्त विषयही त्यांच्याकडुनच तुम्हा - आम्हाला ऐकायला मिळतील. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारा. बघा तुम्हाला तुमचा नविन लेखनाचा विषय कसा पटकन मिळतो ते!

३१. चालायला किंवा व्यायामाला जा!
माझ्यासाठी तरी व्यायाम करणे ही गोष्ट "धर - सोड" या प्रकारात मोडते. म्हणजे अनेकदा सुरुवात करुनही त्यात आजही नियमितता नाही. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम करायला अथवा चालायला जात असाल तर तुमचे शरीर नक्कीच निरोगी राहिल. आता व्यायामशाळेतील अनुभव - किस्से किंवा सकाळी - सायंकाळी चालायला गेल्यानंतर इतरांशी होणारे संभाषण यातुन तुमच्या ब्लॉगसाठी चांगलाच खुराक मिळेल!

३२. काहीतरी बनवा!
काहीतरी बनवा म्हणतोय - कुणालातरी बनवा, असं नाही. शाळा - कॉलेज पर्यत असताना क्राप्टचा विषय असायचा. त्यातील काही कलाकुसरीवर नविन एखादा प्रयत्न करुन पहा. शिवाय "मी हे सुरु करतोय" असं सदर सुरु करुन त्यावर चालु घडामोडींबद्दल लिहित रहा. यामध्ये स्वत:च्या घराचे काम - ते तंत्रज्ञान या पर्यत अनेक विषय तुम्हाला निवडता येतील.

३३. शाळेला एकदा भेट देऊन या!
तुम्हाला तुमची शाळा - कॉलेज आठवतंय.. काहीतरीच काय? आठवतच असेल! तुमची शाळा किंवा दुसरी एखादी शाळा जवळ - शहरात असेल तर एक फेरफटका नक्की मारा. विद्यार्थी/ शिक्षक यांच्याशी गप्पा मारा.. अहो चिक्कार विषय मिळतील तुम्हाला लिहायला!

३४. एखादा ग्रुप जॉईन करा
आता ऑनलाईन ग्रुपचा तर ढीग पडलाय.. तरीही एखादा क्रियाशील असा ग्रुप निवडुन त्यात सहभागी व्हा. शिवाय आसपास असणारे - भाषिक, सामाजसेवा करणारी मंडळे यांनाही सहभागी होऊन तुम्हाला काहीतरी मदत करता येईल. त्यांच्या अडी - अडचणी. कार्यशिलता याबाबत त्यांना मदत करता करता तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी कित्येक विषय मिळतील.

३५. शैक्षणिक संकेतस्थळांना भेट द्या
महाजालावरती अशी अनेक संकेतस्थळे मिळतील की जिथे तुम्हाला शिक्षण - पध्दती - नविन पदवी वगैरे असं बरंच काही शिकता येईल. टोटल ट्रेनिंग ही त्यापैकीच एक. तेथे सापडणार्‍या विषयांवर तुमची नविन पोस्ट लागलीच लिहिता येईल.

३६. स्वतःच्या जीवनातील गोष्टी पहा.
कालच मी माझ्या मुलीकडुन नविन कविता शिकलो. हो, लहानपणीच्या आपल्या बालकविता आणि आत्ताच्या कविता यांत फार फरक आहे. अगदी छोट्या गोष्टीही आपणांस बरंच शिकवुन जातात. शिवाय नोकरी करताना - लग्नानंतर - एखादा मित्र मिळाल्यानंतर तुमच्यांत झालेले बदल .. शिकलेल्या गोष्टी अशा अनेक विषयांवर तुम्ही लिहु शकाल.

३७. माईंड मॅपिंग
"माईंड मॅप" अर्थात तुमच्या कल्पनेला आकृतीच्या रुपात सादर करणे. यात तुमच्या मुख्य कल्पना केंद्रस्थळी ठेवुन त्याभोवती संबंधित विचार/ कल्पना/ विषय यांचा मांडणी करतात. अशा प्रकारे तुमच्या मध्यवर्ती कल्पनेबरोबरच तुम्हाला लिहायला अनेक उपविषयही मिळतील. माझ्या वाचनातील "माईंड मॅप" चा सर्वोत्तम वापर मी सोमेशच्या ब्लॉगवर पाहिला. तुम्हीही पहा.. कसे विषयाला - विषय मिळत गेलेत!

३८. नेहमी छोटी डायरी आणि पेन बाळगा.
तुम्हाला कोणता विचार विषय कोठेही सुचु शकतो. अगदी रस्ते - बस - बस स्टॉप वगैरे वगैरे. त्यासाठी एखादी छोटीशी डायरी आणि पेन सोबत ठेवा. विषय सुचल्यावर लागलीच तो विषय आणि त्यातील मुख्य मुद्दे यांचे नोंद करा. हे आपणांस आपल्या मोबाईलवरही करता येईल. वेळ मिळताच त्यावर सुंदर पोस्ट लिहा.

३९,. सेमिनार - व्याखानाला हजर रहा.
शहरामध्ये - कंपनीमध्ये असणार्‍या व्याख्यानमाला वगैरेना हजर रहा. त्यातुन तुम्हाला त्या विषयांवरच्या चालु घडामोडी कळतील. शिवाय अशा व्याख्यानमाला - सेमिनार्स यावर तुम्हांला तुमचं मतही लिहिता येईल.

४०. आसपासच्या परीसराबद्दल बोला.
आसपास चालणार्‍या घडामोडी - हालचालींवर तर नक्कीच तुम्हाला लिहता येईल. अगदी घराच्या पाठीमागे चालु असलेल्या ईमारतीच्या बांधकामापासुन, त्यावर काम करणार्‍या रोजगार्‍यांपर्यत ते तुमच्या परीसरातील नविन बागेपर्यंत!

४१. स्वतःचे अनुभव लिहा.
स्वानुभव हा अगदी नविन ब्लॉग सुरु करण्यासारखा विषय आहे. गेल्या वर्षीच्या "स्टार माझा - ब्लॉग माझा" च्या विजेत्यापैकी श्री. देव हे आपल्या अनुभवावरतीच लिहितात. आता तुम्ही तुमच्या ब्लॉगवरही अशा काही पोस्टस् नक्कीच लिहु शकाल, नाही का?

४२. सिझनल लिखान - सण - वार
हा एक प्रमुख विषय होईल. म्हणजे, नविन वर्षापासुन नाताळापर्यंतच्या सर्व सण- सणावळीवर तुम्हाला एक-दोन पोस्टस् आरामात लिहिता येतील.

४३. केस स्टडी - मोस्ट कमेंटेड - विचारलेले प्रश्न!
तुमच्या ब्लॉगवरील आलेल्या प्रतिक्रिया - विषय - वाद विवाद यावरही चांगले लेखन होईल. श्री. महेंद्र कुलकर्णींच्या ब्लॉगवर याची उदाहरणे पाहता येतील.

४४. नियमित लिखानाचा रकाना - दैनंदिनी!
रोजच्या आढाव्यावर तुम्हाला ब्लॉगवर एक "दैनंदिनी" असा रकाना बनवता येईल व त्यामध्ये तुमचे रोजचे लेखन करता येईल.. कसं?

४५. तुमचे आवडते ब्लॉगर्स!
आवडते कवी - लेखक - अभिनेता... अगदी तसंच आवडते ब्लॉगर्सही असतातच ना! अशाच तुमच्या आवडत्या ब्लॉग आणि ब्लॉगर्स विषयी लिहा. कदाचित आठवड्यातुन एकदा तुम्ही "या आठवड्याचा ब्लॉगर मित्र" यांवर नक्कीच लिहु शकता. हो, अधिक माहितीसाठी तुम्ही आधी त्या आवडत्या ब्लॉगशी संपर्क साधा.. त्याला/ तिला एखादी प्रश्नावली पाठवुन अधिक माहिती घ्या.. अगदी मुलाखत घेतली तरी वावगे ठरु नये!

४६. फ़ोटो गॅलरी!
छायाचित्र - फोटो काढणे आणि काढुन घेणे हा माझ्या आवडत्या छंदापैकी एक. आता हा छंद काही माझा एकट्याचाच नाही. मला वाटतं प्रत्येका - दिसणारी सुंदर - चांगली गोष्ट टिपुन घेणे - ठेवणे आवडतेच. मग अशा ठेवणीतल्या आठवणींसाठी एखादा रकाना - पोस्ट लिहा. त्यात त्या फोटोबद्दलही माहिती लिहा.

४७. डिग्.कॉम
डिग्.कॉम वर तुम्हाला प्रशिध्द आणि वाचकांना आवडणार्‍या विषयांबद्दल माहिती मिळेल. त्यातुनच तुम्हाला तुमच्या तुमचा नविन "पॉप्युलर" विषयही मिळेल.

४८. आठवड्यातुन एकदा - गुगल ऱीडर्सचे टॉप पोस्ट पहा
गुगल रीडर्स मध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्लॉगचे वर्गणीदार व्हा. किमान आठवड्यातुन एकदा तुम्ही तुमच्या गुगल रीडरला भेट द्या आणि पहा की तुमचे आवडते ब्लॉगर्स काय लिहिताहेत.. कशावर बोलताहेत. यातुनच तुम्हाला तुमची "आठवड्याची पोस्ट" लिहायची प्रेरणा मिळेल.

४९. वादविवाद - वादंग करणारी पोस्ट!
आता आपल्याकडे अशा विषयाला काय कमी? असे विषय तुमच्या ब्लॉगला चांगलीच प्रसिध्दी देवु शकतात. मात्र अशा विषयावर लिहण्याआधी त्या विषयाचा पुर्ण विचार - अभ्यास करा. मन आणि डोकं शांत ठेवुन विचारपुर्वक लिहा. कुणाच्या भावना दुखावतील असं लिहु नका. येणार्‍या प्रतिक्रियांनाही शांतपणेच उत्तरे द्या!

५०. सुधार - सुधारणा यांवर लिहा.
सुधारणा आणि बदल काही एका दिवसांत होत नाहीत. तुमच्यातील काही बदल कसे झाले किंवा काही सामाजिक बदलांसाठी काय करता येईल.. किंवा समोरचा रस्ता / उड्डाणपुल कसा 'अर्थ'पुर्ण / निरर्थक ठरला इ. विषयांवर तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडु शकता ना?

५१. तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट दाखवा
५२. टॉप टेन लिस्ट लिहा.
५३. वाचकांना मदत करा!
५४. पुस्तकाचा आढावा लिहा.
५५. ई-मेल वरती लक्ष द्या!
५६. बुकमार्क केलेल्या साईट्स पहा
५७. तुमच्या समजुती - विश्वास यावर लिहा
५८. एखाद - दुसरा, पाहुणा ब्लॉगर शोधा
५९. तुमच्या वाचनातील - महिला ब्लॉगर्स चे लेख मांडा.
६०. ब्लॉगकार्निवल - ब्लॉगोत्सव - हजर रहा.
६१. पैज लावा
६२. इंटरनेट वरुन कंटेट शोधा
६३. स्वतःचा विड़ीओ - क्लीप करा.
६४. ब्रेक घ्या
६५. इव्हेंट हजर रहा
६६. स्वप्नांची दुनिया
६७. ऍफ़िलिएटस - साईट्स
६८. डमि'ज गाईड
६९. ई-बे.कॉम
७०. प्रकाशकांचे कॅलेंडर
७१. जुन्या फ़ॅशन्स - नवं रुप!
७२. नाटक पहा.
७३. तुमचं भय!
७४. नविन कोर्स?
७५. शासकिय आकडेवारी
७६. रिकाम्या जागा भरा!
७७. टी.व्ही. गाईड!
७८. मान्यवर काय म्हणताहेत?
७९. न्युजलेटर सबस्क्रिप्शन?
८०. ब्लॉगचे पुढे काय? भविष्य?
८१. फ़ॅबल वापरा
८२. बेस्ट ऑफ़
८३. गुण-दोषविवेचन
८४. बेस्ट ऑफ़ टॉप पोस्टस.. का?
८५. सल्ला - मसलत
८६. साधन उपलब्धी
८७. विशिष्ट काळातील लोकप्रिय प्रघात
८८. लोकांवर नजर!
८९. न आवडत्या विषयावर लिहा.
९०. बातम्यावर मत मांडा
९१. व्याख्या देणे
९२. स्फूर्तिस्थान = प्रेस रीलिजेस
९३. वस्तु / उत्पादना ची शिफारस करा.
९४. कसे कराल..? हाऊ टु?
९५. ग्रीटींग कार्ड - नजरानजर
९६. ज्ञानकोश शोधा
९७. गूगल एलर्ट
९८. येऊ घातलेले बदल
९९. मतदान किंवा सर्वेक्षण
१००. खेळ - खेळाडु बद्द्ल लिहा!
१०१. शिका आणि शिकवा

कदाचित माझ्या ब्लॉगरील ही सर्वात मोठी पोस्ट असेल..