Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday, 27 February 2009

वेळ घालवण्याचे माझे - सध्याचे - उद्योग...

हा.... त्याचं काय आहे.. औफिसमधुन घरी गेल्यानंतर स्कायवरचे सगळे - अवॅलेबल - चॅनेलस बघणे हाच मोठा उद्योग आहे.. पण सालं ते डबडं गेला आठवडा झाला बंद पडलय... म्हणे सॅटेलाइट सिग्नल मिळत नाही! तसं फार वाईट वाटत नाही.. कारण, इन-मिन ३-४ चॅनेल दिसतात.. स्टार गोल्ड - ज्याच्यावर तेच तेच सिनेमे कितीतरी वेळा दाखवताहेत... आणि मी बघतोय.. दुसरा - स्टार वन आणि उत्सव ..यांच्यावरही भारतात संपलेल्या किंवा बंद पडलेल्या मालिका दाखवल्या जाताहेत.. एक दोन मुझिक चॅनेल - ९-एक्स... तेच का टाईमपास.

बोलायला पण कुणी नाही... तसा यांच्याकडे वेळच नसतो म्हणा.. नुसतं हाय- हॅलो - आणि बाय एवढच काय ते पर्स्नल बोलणं...  नाही तर - तेच रोजचं - प्रोजेक्ट - डेड्लाईन - अपडेटस - चेन्जेस - ब्ला ब्ला ब्ला... हुर्रर्र्रर्र..!

मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा  [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..

..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.

रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!

तसा रेडी-टु-इट चा  पण कंटाळा आलाय... पण काय करणार... नाईलाज आहे.... अधुन मधुन फिश आणि चिप्स किंवा फ्राइड चिकन हेच ते काय जरा बदल.. मायला, पण या कोंबड्यांना टेस्टच नाही राव, अगदिच सपाक आहेत..! रविवारी मात्र मस्त कोल्हापुरी स्टाइलमध्ये चिकन बनवतो. तसे आपल्याकडचे सारे मसाले मिळतात म्हणुन बरे... नाहीतर इमॅजिन करा - आपल्याकडच्या मसाल्या बिगर - कोल्हापुरी चिकन अन् रस्सा .. कसा लागेल?

व्हेज - लोकांनी या नौन-व्हेज डिस्कशन बद्दल मला माफि करावी!

असो... रविवारी पुन्हा भेटु ...

Monday, 23 February 2009

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन श्रद्धांजली!

....... आज काल बातम्या जरा उशिराच मिळतायत... आत्ताच लक्ष्मणराव देशपांडे यांच्याबद्द्ल महेंद्रच्या ब्लौगवर वाचले... आता तसे म्हणाल तर ही बातमी तशी अनेक ब्लौगवर वाचायला मिळाली असती .. मात्र एका पर्स्नल टच मध्ये वाचायला अन् पहायला महेंद्रच्याच ब्लौगवर मिळाले... महेंद्रच्या ब्लौगवरती "वराड निघालय लंडनला" चा विडिओ सुध्या आहे... जरुर पहा..! ..असो....

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन माझ्याबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांकडुन भावपुर्ण श्रद्धांजली!

... "वराड निघालय....." मी आमच्या शाळेच्या दिवसांमध्ये पाहिलेलं - मामाच्या गावी. मामाचं गांव, शेतावरचं घर, आणि आम्ही १५ बच्चे कंपनी [३ मामा आणि त्यांची ५+४+५ आणि मी = १५ मुलं, थोडक्यात हे घर म्हणजे खाटाल्यांचं!] आणि या नाटकाचं सेट-अप अगदी सेम असावं असं... !

तर, हे नाटक गावांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं होतं की - बरेच दिवस आम्ही ही "त्या" हिंग्लिश स्टाइल मध्ये बोलत होतो... जवळजवळ रोजच्या रात्रीच्या जेवणानंतर , अंगाणातल्या वाळुवर गोल करुन आम्ही टेप-रेकार्डवर ही कॅसेट ऐकत असू. ..... बरेच दायलौग तोंडपाठ होते.... ब-याच वेळा "होल वावर इज अवर!" यासारखे डायलौग असायचे.. मोठी मंडळी कधी कधी आमच्या थिल्लरपणाला वैतागुन म्हणायची "च्या आयचं बावळंट! नुसतं आसलंच बोला... लक्षणं काय नीट नाहिती.... आवतार बघा... आन् लंडनचा आव आणत्याती.... हुड.." .... आज लक्ष्मणरावांची आणि त्या वेळेची आठवण येवुन गेली....!

Friday, 20 February 2009

माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण...

महेंद्रच्या ब्लौगवरची "५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ" ही पोस्ट वाचता वाचता, माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण झाली....

... अंदाजे १९९४ च्या उन्हाळ्यातला हा किस्सा... आपल्या "देवाच्या गाडीने *" रेल्वेने मी मामाच्या गावावरुन माझ्या गावी चाललो होतो. "बिरोबाची जत्रा" असल्याने ट्रेन अगदीच खचा खच भरलेली. तसा माझा गाव म्हणजे तिसरा थांबा. अगदी दरवाज्याच्या तोंडात उभा राहण्यापुर्ती जागा मिळाली...दोन्ही हातानी दरवाजाजवळचा तो खांब पकडला होता. तर, उन्हाळ्याचे दिवस आणि मला सौलिड घाम आलेला... ! शिवाय महत्त्वाचं म्हणजे - त्यावेळी माझ्या तळपायाला खुपच [घाम?] पाणी सुटायचे... जरा कपाळावरचा घाम पुसायला एक हात वर नेला आणि शेजारच्याचा धक्का लागला... मग काय.. पायातील चप्पल आधीच स्लीपरी झालेली... गेला तोल.. घसारलो आणि गड-गडा लोळत त्या पटरीच्या उतारावरुन खाली... !!

........................ गाडीच्या त्या शेवटच्या डब्याकडे पहात.. कसा बसा उभा राहिलो.. उजव्या पायातली चप्पल आधीच पडल्यामुळे एक दगडाची खापरी चांगलीच तळव्यात घुसली होती.. कपडे झाडले आणि ती उजव्या पायाची चप्पल शोधली.... नशीब - सापडली लगेच.. आता प्रश्न होता त्या गावच्या स्टेशनपर्यंत पोहचायचा... रस्ता एकच - रेल्वेचा मार्ग - रेल्वे रुळांच्या कडं-कडंनी अंदाजे ४ कि.मी. चालत गेलो. गावांतुन परत मामाच्या गावाला जाणारी एक प्रवासी वाहतुक करणारी जीप पकडली आणि बॅक टु मामाचे घर! अर्थात घरी पोहोचल्यावर दवाखाना आणि मलम-पट्टी झालीच... मायला ... त्या डौक्टरचे इंजेक्शन मला पायाला झालेल्या जखमेच्या दुखन्यापेक्षा जास्त वेदनादायक वाटले होते..!

असो... त्या नंतर बराच काळ रेल्वेची धास्तीच घेतली होती.. मागच्या वेळी लंडनच्या त्या ट्युबमध्ये बसतानाही या किस्स्याची एक आठवण झाली होती हे नक्की! ...

* देवाची गाडी - मिरज - पंढरपुर दरम्यान वाहतुक करणारी आगगाडी. सध्या हा मार्ग ब्रौडगेज बनतोय म्हणे, आणि ती देवाची गाडी - मिरजच्या कारखान्यात - की - संग्राहालयात उभी आहे!


Wednesday, 4 February 2009

केंब्रिज - कँबोर्न - स्नोफौल चे फोटो...



हुम्म्म.... जरा आरामात लिहिन म्हणतो.. तो पर्यंत तुम्ही फोटो बघुन घ्या .. कसं..?

Tuesday, 13 January 2009

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला...

खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..


तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!

Wednesday, 31 December 2008

नविन वर्षाच्या शुभेच्छा...

" येवो समृध्दी अंगणी, वाढो आनंद जीवनी
तुम्हांसाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभ-दिनी !
"


...भुंगा!

Tuesday, 16 December 2008

भटकंती: कोराईगड [कोरीगड]


गेल्या शनिवारी कोराईगड [कोरीगड] गेलो होतो.. प्लान तसा ट्रेकिंगचा होता.... भैरवगड अथवा गोरखगड फायनल होता होता.. लोणावळ्याजवळचा कोराईगड फिक्स झाला..... तसा हा गड ट्रेकिंगसाठी नाहीच मुळी... अर्थात तुम्ही जर पाय-यावरुन मस्त चालत जाणार असाल तर... नाहीतर पाठीमागच्या बाजुने ट्रेकिंग करण्यासारखा एक रस्ता आहे [कदाचित अंबावणे गावातुन असावा] .. गडावर दोन मोठाली म्हणता येतील अशी तळी आहेत.. एक शिव मंदिर, एक हनुमान - गणेश मंदिर आणि मुख्य 'कोराई देवी' चे मंदिर... शिव आणि हनुमान मंदिरे चांगल्या स्थितित आहेत मात्र कोराई देवीचे मंदिर ओसाड पडले आहे... वरील छप्पर कधीच उडुन गेले आहे.. देवीची सुंदर मुर्ती ऊन - पावसात उभी आहे.... समोर एक दिपमाळ आणि भग्नावस्थेत एक-दोन मुर्त्या.... त्या दिपमाळेवर फडकणारा भगवा वा-यामुळे काठीभोवती अडकुन बसला होता.... व्यवस्थित मोकळा करुन पुन्हा उभा केला.... तोही अभिमानाने फडकण्यास सज्ज..!

.... कोराई देवी कधी काळी अलंकारानी भरलेली असायाची.... इंग्रजांच्या लढाईनंतरच्या काळात या देवीचे सारे दाग-दागिने लुटुन नेण्यात आले ... आजच्या घडीला हे दागिने मुंबईच्या 'मुंबादेवी' च्या अंगावर आहेत - प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची


गडा वरील सारा परिसर एक- दीड तासात फिरुन होतो... डाव्या बाजु / बुरुजावरुन 'ऍम्बे वॅली' चा एरीयल व्ह्युव्ह मस्त दिसतो..! रात्री पांढ-या हॅलोजनच्या प्रकाशात गडाचे दर्शन काही औरच असते...!

खाली उतरुन मस्त जेवण केले आणि परतीच्या वाटेवर - पवना धरणाकडे आगेकुच सुरु केली... धरणाच्या ठीकाणी एस. एन. डी. टी. च्या महिला आल्या असल्यामुळे त्यांचे डुंबुन आणि बोटींग होईपर्यत आम्हीही थोडे फ्रेश होण्यासाठी थोडे पलिकडे असलेला किनारी गेलो... एखादी डुबकी मारण्याची ईच्छा झाली आणि पाण्यात उतरलोही.. बाहेर पाह्तो तो एक पाणसाप आमच्या कडे जसे रागाने पहातच होता... त्याच्यापाठीमागे दुसरा... त्यांचा पुरी फॅमिली यायच्या आत पटापट कपडे घालुन बोटिंग करायला पळालो... बोटिंग केले... मस्त चहा पिलो आणि परतीच्या वाटेला लागलो...

तुम्ही जर पवना धरणाला जाणार असाल तर - पाण्यात उतरु नका अथवा पाणसापांपासुन सावधानगी बाळगा...


बाकी, नेहमी प्रमाणे काही फोटो येथे आहेतच..!


भुंगा...




...भुंगा!

Monday, 8 December 2008

गेले ते दिवस... राहिल्या त्या उचापती ....

.... हा .... तर सांगायचा मुद्दा हा की, राणे सायब सद्ध्या लयच भावात आहेत.. त्यांना म्हणे "बरेच काही" आधीपासुनच माहित होते.... आणि लवकरच ते "ते गुपित" उघडे करणार आहेत.. बरीच एलेक्शनं पाहिली.. बंडखो-या पाहिल्या... पर ह्यांची बंडखोरी ...! स्वतःला "मिडियावाले" संबोधणारे हे साहेब, शेवटची अक्षता पडेपर्यंत नवरीच्या मामासारखे गप्प होते... खुर्ची मिळाली नाही आणि त्यांचातला खरा "मामा" जागा झाला की काय? आरं सायबा... चालु परिस्थितीचा तरी अंदाज असु दे ...!

'चार दिवस थांबा, काय करणार ते सांगतो!'- राणे
नेत्यांचाच दहशतवाद्यांना आसरा
राणेंची 'दादा'गिरी.. म्हणे, 'ताकद दाखवायला लावू नका!'

... बरं ठीक आहे.. आम्हीही तुमच्याच प्रहार/राची वाट बघतोय.... बघु तुम्ही काय मैदान मारताय ते..!


...भुंगा!

Tuesday, 2 December 2008

म्हणे त्यांनी "नैतिक" जबाबदारी स्विकारली....

..... नैतिक जबाबदारी स्विकारुन आणि राजीनामे देऊन मुळ प्रश्न सुटला असे होत नाही...एका पदाचा राजीनामा देऊन उद्या तुम्ही दुस-या पदाचा स्विकार कराल...त्या खात्याचा - मंडळाचा पुन्हा बो-या वाजवायला तयार... पुन्हा नैतिक जबाबदारी आणि पुन्हा एका राजिनाम्याचे नाटक....पुन्हा येरे माझ्या मागल्या ..!

खरंच तुमचा - मंत्र्यांचा - अंतरात्मा जागला असेल तर जबाबदारी पुर्णपणे स्विकारा आणि आपल्या राजकिय कारकिर्दीचा राजीनाम द्या, कसं..?

...भुंगा!

Monday, 1 December 2008

दहशतवादाच्या निषेधार्थ सोमवारी 'ब्लॅक डे'!



भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पाळूया..!
- मटा

Thursday, 27 November 2008

भावपूर्ण श्रद्धांजली...!




"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"
- मिर्जा ग़ालिब.

..... त्या वीर शहीदांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!


BGImage: yoshiko

Monday, 24 November 2008

गेला आठवडा....!

.... आजकाल दिवस जरा मोठे झालेत काय हो... जसा जसा परतायची वेळ जवळ येतेय... दिवस जातच नाही.... :( .. कदाचित परतायची ओढ जरा जास्तच लागलीय ... असो... ! आठ्वडा नेहमीप्रमाणेच कामात गेला....!

... हा ..... शनिवार मस्त लोळत काढला... इकडे टी.व्ही. वर भारतीय कार्यक्रमांचा जरा दुष्काळच आहे... त्यामुळे तेलगु मधला "गजनि" लॅपटौपवरच बघितला.... काय बोलताहेत हे समजत नव्हतं , मात्र एकंदरीत स्टोरी समजण्यासाठी फार त्रास झाला नाही....मस्त वाटला सिनमा.... आता डायलौग्ज आणि गाणी यासाठी अमिर दादांचा सिनमा बघायचा .. !

रविवारी मात्र आम्ही इकडे भल्या पहाटे ९.०० वा. उठुन अभ्यंगस्नान केले.... दोन मैतर लंडन वरुन आले होते.. त्यांना केंब्रिज - केंब्रिज खेळायचे होते - म्हणजे पहायचे होते.. गाडी काढली आणि सरळ केंब्रिज.. !
फेमस कौलेजेस आणि फोटोग्राफिनंतर ते फित्सविलियम म्युझिअम पाहता - पाहता मस्त २-३ तास गेले.... मग थोडा वेळ सिनेवल्ड मध्ये गेम्स पाहण्यात घालवला... आणि नान्डो'ज मध्ये मस्त चिकन वर ताव मारला.. [शाकाहारी लोकांनी कृपया - व्हेज बर्गर आणि फिंगर चिप्स असे वाचावे..!]...

बस्स.... बाकी काय... सातच्या आत घरात ...!

...भुंगा!