Tuesday, 8 December 2009

ब्लॉगर कमेंट्स - तुमचे रिप्लाय ठ़ळकपणे दाखवा!

ब्लॉग वर आलेल्या कमेंट्सना रिप्लाय देणे हा ब्लॉग - एटिकेट्स एक भाग असतो. त्यामुळे तुमच्या विजिटर्स सोबत एक संवादही सांधता येतो. आता हे रिप्लाय देताना गरज वाटते ती स्वतःच्या, म्हणजे ब्लॉग कर्त्याच्या कमेंट्स ऊठुन दिसण्याची. त्यामुळे दिलेली कमेंट ही 'रिप्लाय' आहे हे जाणवते.

उदा. दयायचे तर - माझ्या ब्लॉगवर मी दिलेले रिप्लाय जरा वेगळे - उठुन दिसताहेत. त्यांच्याभोवती बॉर्डर आहे, शिवाय भुंग्याचे चित्रही आहे. अच्छा, मला काय म्हणायचे आहे ते समजले तर! ठिक, तर हा प्रकार तुमच्या ब्लॉगवर कसा करता येईल, ते पाहु!

०. सर्वात महत्त्वाचे म्हणजे - आपल्या टेंप्लेटचे बॅकअप घ्या - "Download Full Template" या लिंकवर क्लिक करुन ते सेव करा. काही अडचण झाल्यास आपणास ते पुन्हा अपलोड करता येईल!
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेआऊट" वरुन - Edit HTML टॅब क्लिक करा.
२. 'Expand Widget Templates' च्या समोर असणारा चेबॉक्स् चेक करा, म्हणजे संपुर्ण कोड दिसेल.
३. आता, कमेंट्स दाखवणारा कोड शोधु.. हा खाली दिलेला कोड शोधा -

<b:if cond='data:comment.isDeleted'>
<data:comment.body/>
<b:else/>

<data:comment.body/>

</b:if>

४. आता त्याच्या जागी - तो डिलिट करा किंवा सिलेक्ट करुन त्याच्यावर खाली दिलेला कोड पेस्ट करा.
<b:if cond='data:comment.authorUrl == "http://www.blogger.com/profile/PasteYourProfileNumber"'>

<b:if cond='data:comment.isDeleted'>
<data:comment.body/>
<b:else/>

<data:comment.body/>

</b:if>

<b:else/>

<b:if cond='data:comment.isDeleted'>
<data:comment.body/>
<b:else/>

<data:comment.body/>

</b:if>

</b:if>
५. वरती पहिल्या ओळीत - PasteYourProfileNumber च्या जागी तुमच्या ब्लॉगरचा प्रोफिईल नंबर टाका. हा ' प्रोफिईल नंबर' प्रत्येकाच वेगवेगळा असतो.
तो पाहण्यासाठी ब्लॉगरच्या डॅशबोर्डवरुन 'View Profile' या लिंकवर क्लिक करा. तुमच्या प्रोफाईल पेज दिसेल. आता त्या लिंक मध्ये शेवटी दिसणारा नंबर म्हणजे - प्रोफाईल नंबर!
६. आता ' ]]></b:skin> ' च्या लगेच वरती खाली दिलेला कोड पेस्ट करा.
.comment-body-admin{
width:300px;
border-style: solid;
border-top: 1px solid #FFD129;
border-right: 1px solid #ffd129;
border-left: 1px solid #ffd129;
border-bottom: 3px solid #ffd129;
-moz-border-radius: 3px;
background-color: #f5f6f7;
margin-top: 5px;
margin-bottom: 15px;
font-size:13px;
line-height:20px;
padding: 10px 10px 10px 95px;
background:#fff url(http://LinkToYourPicture.jpg) no-repeat 0 bottom;
min-height: 100px;

७. वरच्या कोड मध्ये 'http://LinkToYourPicture.jpg' च्या जागी तुमच्या फोटोची लिंक पेस्ट करा. फोटो शक्यतो छोटाच असावा.
८. 'सेव टेंप्लेट' करुन एखाद्या कमेंट्ला उत्तर द्या - किंवा तुम्ही दिलेलं उत्तर शोधा आणि पहा - तुमची कमेंट वेगळी दिसते का!
९. नं. सहा मध्ये जे '#FFD129' हे असे कलर कोड आहेत त्याजागी तुम्ही तुमच्या डिझाईनला अनुसरुन कलर कोड लिहा. '#FFD129' च्या जागी 'blue' लिहिला तरी चालेलच!

आता तुमच्या कमेंट्स येऊ दयात..... :)

20 comments:

Thank you very much for sharing such very helpful tips. I got it working.

@सिद्धार्थ,
हा, मी पाहिलं तुझ्या ब्लॉगवर... मस्तच!

ट्राय करून पाहायला हवं...
माहितीसाठी धन्यवाद!

खूप छान आणि महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही करून बघितली व्यवस्थित चालते..धन्यवाद
- वैभव

@ वैभव,
कमेंट्स पाहिल्या... वा! पोस्ट आपल्या कामी आली तर!

धन्यवाद, मी ही प्रयत्न करतो :)

तुम्ही दिलेली माहिती मस्तच आहे आणि पण अजुन नविन आहे ...प्रयत्न केला...वर दिलेला कोड आणि मला मिळालेला कोड वेगळा दिसला... त्यामुळे याचा उपयोग करायला जरा वेळ लागेल असं दिसतेय ....

@नकुल,
कोणता कोड मिळाला - व वेगळा दिसला - समजले नाही.

@देवदत्त, आनंद,
हो, प्रयत्न करुन पहा. काही अडचण आली तर कळवा!

दादा, तुझ्या या पोस्टच्या मदतीने मी पण जरा ट्राय करून पाहिलं..(माझे पोस्ट्स पाहिल्यानंतर तुला दिसेलच...) हं जरा विचित्र दिसतंय पण परीक्षा झाल्यानंतर व्यवस्थित करीन... या नविन माहितीबद्दल आभार! :)

भुंगा नमस्कार,
सर्वात आवडली ती सूचना प्रतिक्रिया बद्धल......टिप्पणी कशी असावी.
मीही करीन.
अभिप्राय ठळक कसे करावेत माहिती अमलात आणीन.
माझ्या ब्लॉग वर आपण मित्र व अभिप्रायांसाठी नेहमीच असाल.

@अनुक्षरे,
अरे वा! तुझी[चालेल?] कमेंट बघुन बरं वाटलं.. !
हां, ती कमेंट्स ची सुचना, ना - मुद्दाम लिहिलीय... उगाचच असंबंध विषयांवरती वाद नको म्हणुन! :)

तुझ्या बर्‍याच पोस्ट वाचल्यात - अगदी संवेदनशील विषय आहेत.. छान लिहितेस.. लिहित रहा!

भुंगा,
माझ्या ब्लॉगवर आण्खी काय सुधारणा करता येतील ?
खुपच साधा दिसतो .. आणि विजेट्स पण नाहियेत.

मी,
http://thelife.in

तुम्ही दिलेल्या माहितीनुसार कोड टाकून पाहिला. माझे प्रतिसाद आता उठून दिसत आहे. ही युक्ती छानच आहे. मनापासून धन्यवाद!

@कांचन,
हो, मी पाहिलं ब्लॉगवर!
बर्‍याच जणांना माहिती उपयोगी पडली - पोस्ट लिहिण्याचं चीज [बटर!] झालं!

@मी,
खरं सांगु, मला तुझा ब्लॉग मस्त वाटतो!...... हां, तुझा ब्लॉग 'वर्डप्रेस' वरती आहे - आणि आम्ही ब्लॉगर वाले.
वर्डप्रेसच्या अनेक फ्री थिम आहेत: themes2wp या साईटवर च्या थिम्स बघ, एखादी आवडली तर डाऊनलोड करुन इंस्टाल कर!

धन्यवाद भुंगा!
खुपच उपयुक्त माहिती होती ही... ब्लॉग कमेंट्स आता उठुन दिसत आहेत.

@आनंद,
अरे वा! बघितलं तुझ्या ब्लॉगवर...!
छान दिसतयं. :)

नमस्कार दिपकभाऊ,
हि माहिती खरेच खुप उपयुक्त आहे. मला माझ्या ब्लॉगवर हे करुन पाहण्याची इच्छा आहे. माझा ब्लॉग वर्डप्रेसवर आहे. तिथे हे कसे करता येइल? अजुन काही टिप्स मिळाल्या तर खुप छान वाटेल. आभारी आहे

सस्नेह
विशाल (v.kulkarni@omnistar.in)

Heil भुंगा!
पोस्ट आवडली. प्रतिक्रिया उठून दिसायला हवी.
तू सांगितल्या प्रमाणे केलं सगळं, पण image येत नाही :(
माझ्या ब्लॉगवरची माझी प्रतिक्रिया इथे बघू शकतोस.

@आत्मा,
मला "मी-माझा" या पानावरुन मेल कर - म्हणजे मला तुला उत्तर देता येईल.