Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday, 24 March 2009

कार पार्किंग!

Monday, 23 March 2009

२३ मार्च, हौतात्म्यदिनी शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना सादर वंदन!


आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढार्‍यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.

आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत. - शहिद भगतसिंग 


निशब्द अन् नतमस्तक,
भुंगा!

Friday, 20 March 2009

माणुस म्हणुन जगण्यासाठी....

Friday, 6 March 2009

विजय मल्ल्यासाहेब - मंडळ आपले आभारी आहे!

यु.एस. मध्ये लिलावात काढलेल्या गांधींच्या काही वस्त बोली जिंकुन परत मिळवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे!

मागच्या वेळी आपण टिपु सुतानांची तलवार भारतात आणलीत...
आणि आठवड्याभरात बापुंचे हे साहित्य भारतात येइल..

तसे कोणी काही ही म्हणो .. मला मात्र तुमचा अभिमान वाटतो!

Wednesday, 4 March 2009

मी.. आणि माझं ब्लौगिंग ...

आजकाल नविन विषय मिळवण्यासाठी काही खास डोकं वापरावं लागत नाही. मराठीब्लौग्ज. नेट वर जायचं आणि मस्त वाचायचं.. कीतीतरी ब्लौग्ज .. कित्येक ब्लौगर्स.. कितीतरी पोस्ट्स् आणि कीतीतरी विचार ... गेल्या आठवड्यात महेंद्रच्या ब्लौगवर "अभिव्यक्ती" बद्दल वाचलं... एक कमेंटपण टाकली पण नंतर म्हटलं .. जरा विस्तारानं लिहावं.

हां... तर - अभिव्यक्ती स्वातंत्र्य: लोकशाहीचं एक प्रभावी शस्त्र. घटनेनं प्रत्येकाला दिलेलं स्वातंत्र्य! आपलं मत - विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकारही!
... मला वाटतं ह्याच अधिकार आणि स्वातंत्र्याच्या जोरावर काही पत्रकार आणि न्युज चॅनेलवाले वाट्टेल ते बोलत असतात... या स्वातंत्र्याचा फायदा की गैरफायदा किती आणि कसा घेतात ते कोणी ठरवायचं. परवाच न्युज वाचली की 'अजित डी' नावाच्या एका पो-याने - जो स्वतः कंम्प्युटर इंजि. आहे - शिवसेनेच्या नावाने बोंब मारायल और्कुटवर एक कम्युनिटी सुरु केली आणि आता पोलिसी तक्रारीनंतर सध्या त्याच्या वर न्यायालयिन खटला चालु आहे/ होईल. आता फक्त हेच एक उदाहरण नाही, सांगायला गेलो तर हेच बघा:

  • न्युज चॅनेलवर कुठल्या न्युज ब्रेकिंग न्जुजच्या नावाने दाखवल्या जातात - हे बघा उदाहरण
  • कीती सिरियल्स मध्ये विवाहपुर्व आणि विवाहबाह्य - एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि सासु - सुनेचे कुभांड दाखवले जातात
  • पेपरवाले - खप होण्यासाठी कुठल्या बातम्या ठळक माथळयाखाली दाखवतात - काही पेपर्सची औनलाइन एडिशन्स बघा, तुम्हाला अंदाज येइल, मी काय म्हणतोय ते.

आता मला सांगा, या स्वातंत्र्याच्या बरोबरीने स्वत:च्या काही जबाबदा-या आपसुकच येतात, जसे
  • आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असु नये
  • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय आपल्या नावाने - प्रकाशित करु नये.
  • ब्लॉगवरुन - वेबसाइटवरुन - आपण कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावु नये.
  • ब्लॉगवरुन -वेब-साइटवरुन वरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करु नये.
  • आपल्या ब्लॉगमध्ये वेब-साइटमध्ये - कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे.
  • आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती आपण आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत करु नये.
  • राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण आपण आपल्या ब्लॉगमधून - वेब-साइटवरुन करु नये।[ संदर्भ - पुर्व परवानगीसहित :मराठी समुदाय - वामन परुळेकर ]
... आता प्रश्न - कंटेन्ट - कौपी - पेस्ट चा... मला वाटतं ह्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अहो, ब्लौग तर सोडा, पण ब-याच वेबसाईटसवरती पण तुम्हाला सेमच टेक्स्ट कंटेंट दिसतील, जशा काय या कंपन्या - सिस्टर कंसर्न आहेत. उदा:
  • "We've seen companies struggle with new web design technology, and web design companies that never delivered on their promises." हे वाक्य गुगलमध्ये सर्च केले तर ८३ लिंक्स सापडतील!!

तशा भरपुर वेबसाइटस सापडतील... पण मुद्दा कंटेन्टचा आहे ... तुम्हीच सांगा कुणाचे कंटेन्ट - खरे - ओरिजिनल आणि कुणी याबाबत केस-तपास करत बसावा?

थोडक्यात काय तर ह्या जबाबदा-या घ्या आणि त्या पाळण्याचा प्रयत्न करा!

सनी डे ...

कालच्या सोमवारी एकडे मस्त सनी डे होता... म्हटले औफिसला चाली - चाली करत जावे... मग काय गेस्ट हाऊस आणि औफिसच्या मधला रस्ता पकडला आणि त्या हिरव्यागार हिरवळीवरुन हुंदडत - हुंदडत हाफिसात हालो [... ह ची मात्रा ..] ... तसे येता येता काही फोटो पण काढले .. हे बघा..!







तसा "ह" च्या मात्रेवरुन "ह" चे वाक्य आठवले - हिमालयातील हिरव्या - हिरव्या हिरवळीवर ही हेमा हिरोइइन, हात हालवत हिंडत होती !

Monday, 2 March 2009

म्या वळु पाहिला....

... हुम्म .. तर... शनिवारी मी "वळु" पहिलाच... आणि रविवारी .. "चकवा" पाहिला.... दोन्ही सिनेमे मस्त वाटले....
अतुल कुलकर्णीचा सौलिड अभिनय आहे... तसा आपला गाववाला - [ सोलापुर हो ! ]- म्हणुन थोडी पर्स्नल अ‍ॅटॅचमेंट ही आहेच की.. असंच हो ... नाही तर म्हणाल, लागला लगेच नाती जोडायला ;-) ... असो!
जास्त काही लिहित नाही .... तसा एका विषयावर विचार करतोय.. लवकरच लिहिन म्हणतोय.. भेटू लवकरच ......

Friday, 27 February 2009

वेळ घालवण्याचे माझे - सध्याचे - उद्योग...

हा.... त्याचं काय आहे.. औफिसमधुन घरी गेल्यानंतर स्कायवरचे सगळे - अवॅलेबल - चॅनेलस बघणे हाच मोठा उद्योग आहे.. पण सालं ते डबडं गेला आठवडा झाला बंद पडलय... म्हणे सॅटेलाइट सिग्नल मिळत नाही! तसं फार वाईट वाटत नाही.. कारण, इन-मिन ३-४ चॅनेल दिसतात.. स्टार गोल्ड - ज्याच्यावर तेच तेच सिनेमे कितीतरी वेळा दाखवताहेत... आणि मी बघतोय.. दुसरा - स्टार वन आणि उत्सव ..यांच्यावरही भारतात संपलेल्या किंवा बंद पडलेल्या मालिका दाखवल्या जाताहेत.. एक दोन मुझिक चॅनेल - ९-एक्स... तेच का टाईमपास.

बोलायला पण कुणी नाही... तसा यांच्याकडे वेळच नसतो म्हणा.. नुसतं हाय- हॅलो - आणि बाय एवढच काय ते पर्स्नल बोलणं...  नाही तर - तेच रोजचं - प्रोजेक्ट - डेड्लाईन - अपडेटस - चेन्जेस - ब्ला ब्ला ब्ला... हुर्रर्र्रर्र..!

मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा  [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..

..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.

रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!

तसा रेडी-टु-इट चा  पण कंटाळा आलाय... पण काय करणार... नाईलाज आहे.... अधुन मधुन फिश आणि चिप्स किंवा फ्राइड चिकन हेच ते काय जरा बदल.. मायला, पण या कोंबड्यांना टेस्टच नाही राव, अगदिच सपाक आहेत..! रविवारी मात्र मस्त कोल्हापुरी स्टाइलमध्ये चिकन बनवतो. तसे आपल्याकडचे सारे मसाले मिळतात म्हणुन बरे... नाहीतर इमॅजिन करा - आपल्याकडच्या मसाल्या बिगर - कोल्हापुरी चिकन अन् रस्सा .. कसा लागेल?

व्हेज - लोकांनी या नौन-व्हेज डिस्कशन बद्दल मला माफि करावी!

असो... रविवारी पुन्हा भेटु ...

Monday, 23 February 2009

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन श्रद्धांजली!

....... आज काल बातम्या जरा उशिराच मिळतायत... आत्ताच लक्ष्मणराव देशपांडे यांच्याबद्द्ल महेंद्रच्या ब्लौगवर वाचले... आता तसे म्हणाल तर ही बातमी तशी अनेक ब्लौगवर वाचायला मिळाली असती .. मात्र एका पर्स्नल टच मध्ये वाचायला अन् पहायला महेंद्रच्याच ब्लौगवर मिळाले... महेंद्रच्या ब्लौगवरती "वराड निघालय लंडनला" चा विडिओ सुध्या आहे... जरुर पहा..! ..असो....

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन माझ्याबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांकडुन भावपुर्ण श्रद्धांजली!

... "वराड निघालय....." मी आमच्या शाळेच्या दिवसांमध्ये पाहिलेलं - मामाच्या गावी. मामाचं गांव, शेतावरचं घर, आणि आम्ही १५ बच्चे कंपनी [३ मामा आणि त्यांची ५+४+५ आणि मी = १५ मुलं, थोडक्यात हे घर म्हणजे खाटाल्यांचं!] आणि या नाटकाचं सेट-अप अगदी सेम असावं असं... !

तर, हे नाटक गावांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं होतं की - बरेच दिवस आम्ही ही "त्या" हिंग्लिश स्टाइल मध्ये बोलत होतो... जवळजवळ रोजच्या रात्रीच्या जेवणानंतर , अंगाणातल्या वाळुवर गोल करुन आम्ही टेप-रेकार्डवर ही कॅसेट ऐकत असू. ..... बरेच दायलौग तोंडपाठ होते.... ब-याच वेळा "होल वावर इज अवर!" यासारखे डायलौग असायचे.. मोठी मंडळी कधी कधी आमच्या थिल्लरपणाला वैतागुन म्हणायची "च्या आयचं बावळंट! नुसतं आसलंच बोला... लक्षणं काय नीट नाहिती.... आवतार बघा... आन् लंडनचा आव आणत्याती.... हुड.." .... आज लक्ष्मणरावांची आणि त्या वेळेची आठवण येवुन गेली....!

Friday, 20 February 2009

माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण...

महेंद्रच्या ब्लौगवरची "५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ" ही पोस्ट वाचता वाचता, माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण झाली....

... अंदाजे १९९४ च्या उन्हाळ्यातला हा किस्सा... आपल्या "देवाच्या गाडीने *" रेल्वेने मी मामाच्या गावावरुन माझ्या गावी चाललो होतो. "बिरोबाची जत्रा" असल्याने ट्रेन अगदीच खचा खच भरलेली. तसा माझा गाव म्हणजे तिसरा थांबा. अगदी दरवाज्याच्या तोंडात उभा राहण्यापुर्ती जागा मिळाली...दोन्ही हातानी दरवाजाजवळचा तो खांब पकडला होता. तर, उन्हाळ्याचे दिवस आणि मला सौलिड घाम आलेला... ! शिवाय महत्त्वाचं म्हणजे - त्यावेळी माझ्या तळपायाला खुपच [घाम?] पाणी सुटायचे... जरा कपाळावरचा घाम पुसायला एक हात वर नेला आणि शेजारच्याचा धक्का लागला... मग काय.. पायातील चप्पल आधीच स्लीपरी झालेली... गेला तोल.. घसारलो आणि गड-गडा लोळत त्या पटरीच्या उतारावरुन खाली... !!

........................ गाडीच्या त्या शेवटच्या डब्याकडे पहात.. कसा बसा उभा राहिलो.. उजव्या पायातली चप्पल आधीच पडल्यामुळे एक दगडाची खापरी चांगलीच तळव्यात घुसली होती.. कपडे झाडले आणि ती उजव्या पायाची चप्पल शोधली.... नशीब - सापडली लगेच.. आता प्रश्न होता त्या गावच्या स्टेशनपर्यंत पोहचायचा... रस्ता एकच - रेल्वेचा मार्ग - रेल्वे रुळांच्या कडं-कडंनी अंदाजे ४ कि.मी. चालत गेलो. गावांतुन परत मामाच्या गावाला जाणारी एक प्रवासी वाहतुक करणारी जीप पकडली आणि बॅक टु मामाचे घर! अर्थात घरी पोहोचल्यावर दवाखाना आणि मलम-पट्टी झालीच... मायला ... त्या डौक्टरचे इंजेक्शन मला पायाला झालेल्या जखमेच्या दुखन्यापेक्षा जास्त वेदनादायक वाटले होते..!

असो... त्या नंतर बराच काळ रेल्वेची धास्तीच घेतली होती.. मागच्या वेळी लंडनच्या त्या ट्युबमध्ये बसतानाही या किस्स्याची एक आठवण झाली होती हे नक्की! ...

* देवाची गाडी - मिरज - पंढरपुर दरम्यान वाहतुक करणारी आगगाडी. सध्या हा मार्ग ब्रौडगेज बनतोय म्हणे, आणि ती देवाची गाडी - मिरजच्या कारखान्यात - की - संग्राहालयात उभी आहे!


Wednesday, 4 February 2009

केंब्रिज - कँबोर्न - स्नोफौल चे फोटो...



हुम्म्म.... जरा आरामात लिहिन म्हणतो.. तो पर्यंत तुम्ही फोटो बघुन घ्या .. कसं..?

Tuesday, 13 January 2009

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला...

खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..


तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!