आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
Image by Getty Images via Daylife
कसे लोक असतात ना...? आपण फार सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी केवढा मुर्खपणा करतात!
Experts assume the virus "most likely" emerged from pigs in Asia, and was carried to North America by infected persons.न्युयॉर्क टाइम्सनेही यालाच दुजोरा दिलाय!
पेबच्या भटकंती नंतर आता पुन्हा पावसाळी ट्रेकची स्वप्नं पडु लागली होती.... पण कुठं जायचं... तसे पर्याय भरभुर होते, पण विशाल म्हटला की त्याला भीमाशंकरला त्रिशुल आणि शिवलिंग यांची पुजा करुन स्थापना करायची आहे... मग काय.. भीमाशंकर लाच जायचं ठरलं... मेल - फोनची देवाण-घेवाण झाली आणि १ ऑगस्टला भीमाशंकरचा जंगल ट्रेक करायचा ठरला! इंटरनेवरुन बरीच माहिती काढली... कसं जायचं... कुठ रहायचं... आधी जाऊन आलेल्यांकडुन माहिती घेणं वगैरे - वगैरे! शिडी घाट की गणेश घाट असा वाद बराच रंगला.... कारण शिडी घाट म्हणजे "वन्स इन लाइफटाइम" म्हणता येइल असा थ्रिलिंग आहे, अंदाज एकंदरीत माहितीवरुन आला होताच! तेंव्हा तिथे जाऊनच ठरवु असे ठरवुन पुढच्या तयारीला लागलो.कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
पुर्ण वाचा...
बाकी ... खाल्ल्यानंतर ... आपण आणलेला आपला मौल्यवान कचरा पुन्हा आपल्याच बॅगेत भरुन परत न्या! शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!
भीमाशंकरचा जंगल ट्रेक करण्यासाठी शारिरीक तयारीबरोबर तुमची मानसीक तयारीही फार महत्त्वाची.. कोणत्याही ट्रेक - भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्या साथीदारांनाही कमजोर करते!जिथे हे दोन रस्ते मिळतात त्या ठीकाणी मोबाइल नेटवर्कही मिळाले.. लागलीच सर्वांनी "घरी यायला उशीर होइल - सुखरुप आहोत" सांगुन टाकले!.... या ठीकाणी झोपडी सारखे हॉटेलही [२] आहेत.. तुम्ही जर परत उतरणार असाल तर जेवणाची ऑर्डर देऊ शकता.... मस्त चिकन वगैरेचा बेत होऊ शकतो.... पण श्रावणात नक्की सांगता येणार नाही.... आणि शिवाय - देवाला - देव कार्याला गेल्यानंतर वेज खाणंच योग्य, नाही का?
शेवटी बॅटरी हातात घेऊन मी, सुरिंदर आणि अमोल असं तिघांना काही अंतर जीपच्या समोर रस्ता दाखवत चालायचं ठरवलं... आणि त्याप्रमाणं आमचा परतीचा प्रवास सुरु झाला!
समोरुन येणार्या वहानांना लाइट दाखवुन - हळु करत आम्ही चालत होतो....एक - दीड कि.मी. नंतर धुकं मावळलं आणि आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो....!
हुम्म... नेहमी प्रमाणे.. काही फोटो येथे आहेतच!

अरे हो.. नुकताच मित्र झालेल्या अनिकेतला [ हा ही भुंगाच बरका! ] आज मैत्रीबरोबर वाढदिवसाच्याही शुभेच्छा!..... आणि गेल्यावर्षीचा हा मैत्रीचा लेख आहेच, तुमच्या वाचनासाठी आणि अधिक शुभेच्छासाठी...!
...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!
हाय...!ट्रेकिंग - पिकनिक च्या वेळी काळजी घेणं आणि सामाजिक - नैतिक जबाबदारी निभावणं या दोन्ही वेगवेगळया गोष्टी [दिसत - वाटत] असल्या तरी त्या आपल्याच कर्त्यव्याचा एक भाग आहेत, हे विसरुन चालणार नाही, हो ना?
पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.
- प्रगती बाणखेले
आर.बी.आय. च्या नोटीफिकेशन नुसार आपण आपले [भारतामध्ये दिले गेलेले] क्रेडिट कार्ड १ ऑगस्ट २००९ च्या आधी "वेरिफाइड बाय विजा" किंवा "मास्टर कार्ड ३डी सेक्युर" साठी रजिस्टर करणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २००९ पासुन ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी आपणास हा कोडही द्यावा लागेल. आपण जर क्रेडिड कार्ड होल्डर असाल तर कधाचित आपणास बँकेने या आधीच ही सुचना दिली असेल'च. तरीही माहिती नसल्यास खात्री करुन घ्या.मला आलेल्या मेलच्या आधारे खाली काही बँकाची नावे आणि रजिस्ट्रेशनच्या साठी दिली आहेत
ए.बी.एन. अॅम्रो
आंध्रा बँक
अॅक्सिस बँक
सिटी बँक
एच्.डी.एफ्.सी. बँक
एच.एस्.बी.सी. बँक
आय्.सी.आय्.सी.आय. बँक
कोटक महिंद्रा बँक
स्टँडर्ड चँर्टर्ड
स्टेट बँक
करुर वैश्य बँक
डच बँक

२०२३ साली चीनचे सैनिक तिबेटमध्ये घुसले अणि अनेक मंदिरांचा, गूढ ठिकाणांचा त्यांनी विध्वंस आरंभला. त्या मोहिमेत त्यांच्या हाती लागलं संस्कृतमधलं एक प्राचीन हस्तलिखित. हरियाणा विद्यापिठाकडुन त्यांनी त्या हस्तलिखिताचा अनुवाद करुन घेतला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले! कारण त्या हस्तलिखितात लिहिलं होतं, भारतात एका गुढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की जी हाती लागली तर तिच्या सहाय्याने संपुर्ण विश्वाची रह्स्यं उघडतील.माणुस संपुर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल! कर्मधर्मसंयोगानं त्या वस्तूचा ठावठिकाणा चिनी लोकांना लागला आणि मग सुरु झाला एक जीवघेणा पाठलाग! एक गट निघाला ती वस्तू मिळवायला तर दुसरा त्या वस्तूचे विसर्जन करायला - बिंदुसरोवरात. कुठे आहे ते बिंदुसरोवर? कोणती रहस्यं दडली आहेत त्यात?
वास्तवाकडुन अदभुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढवणारी सर्वस्वी अनोखी कादंबरी!
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.'
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, 'मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.'
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, 'हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'बाहेरगावी जाणे रद्द.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'आपली भेट रद्द.'
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, 'माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.'.
..... ........ ........
बाबांनी पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, 'माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जात आहोत !!