Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday, 8 September 2009

फीडबर्नरची सुविधा

परवाच्या एका मेल मध्ये विक्रमने फीडबर्नर कसे वापरायचे हे विचारलं होतं .. त्याच्या रीप्लाय-खातर ही पोस्टः

फीडबर्नरः २००४ मध्ये सुरु झालेली हे "वेब बेस्ड फीड मॅनेजमेंट" [वेब २.०] ची सुविधा आजच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स [ब्लॉगर/ वर्डप्रेस] वरती चांगलीच प्रसिद्ध आहे. याद्वारे पब्लिशर्स/ ब्लॉगर्स आपल्या वाचकांना फीड रीडर किंवा ई-मेलच्या स्वरुपात आपल्या लिखानाबद्दल कळवु शकतात. आपण ज्या ब्लोगच्या फीडबर्नर मध्ये रजिस्ट्रेशन करता त्या नंतर तुमच्या दिलेल्या ई-मेलवरती नविन प्रकाशित झालेल्या लेखांची मेल येते. अशा प्रकारे, त्या ब्लॉगवरती न जाताही विजिटर्स ब्लॉगर्सचे लिखान वाचु शकतात. ब्लॉगर्सच्या फीडमेल मध्ये आपणास जाहिराती दाखवण्याचीही सोय असते. उदा. गुगल ऐडसेन्स. २००७ मध्ये गुगलने फीबर्नर आपल्या सुविधांमध्ये दाखल केले.


१. फीडबर्नरला - जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा.
२. ही अशी स्क्रीन दिसेल.
३.
http://YourBlogName.blogspot.com/feeds/posts/default?alt=rss

YourBlogName= तुमच्या ब्लॉगचे नाव.
४. आता तुमच्या ब्लॉगची पुर्ण लिंक कॉपी करा आणि "Burn a feed right this instant. Type your blog or feed address here:" च्या खालच्या बॉक्समधे पेस्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
५. तुमच्या ब्लॉगचे नाव लिहा - डिफॉल्ट येईलच, नेक्स्ट क्लिक करा.
६. आता नेक्स्ट - नेक्स्ट क्लिक करत या स्क्रीनवर या.
७. आता "Publicize" टॅबवर क्लिक करुन डाव्या बाजुला "Email Subscriptions" या लिंकवर क्लिक करा. आणि "Activate" या बटनांवर क्लिक करा. हे असं दिसेल
८. आता ही स्क्रीन दिसेल. त्यात दिसणारा पुर्ण कोड कॉपी करा.
९. ब्लॉगरला लॉगिन करा - "Layout" टॅब - वर जाऊन "Page Element" वर क्लिक करा.
१०. आता जिथं हा कोड टाकायचा असेल तिथं "Add Gadgets" वर क्लिक करा.
११. "HTML - Javascript" चा बॉक्स क्लिक करुन त्यात हा कोड टाका.
१२. झालं. आता तुमच्या ब्लॉगवर ई-मेल सबस्क्रिप्शनचा फॉर्म दिसु लागेल!

अपडेटः महेंद्रजीच्या वर्डप्रेस ब्लॉगसाठी :)
वरच्याच स्टेप्स:
१. स्टेप नं. १ मध्ये दाखवलेली तुमच्या फीडची लिंक अशी असेल:
http://MyWordpressBlog.wordpress.com/feed/

MyWordpressBlog = तुमच्या ब्लॉगचे नाव.
२. स्टेप नं. ८ मध्ये दाखवलेली स्क्रीन अशी दिसेल.
३. तो कोड कॉपी करा
४. वर्डप्रेसला लॉगिन करुन - विजेट्स मध्ये जा.
५. तिथे "HTML - TEXT" सिलेक्ट करुन त्यामध्ये वरील कोड पेस्ट करा.
६. आता तुमच्या साइडबार मध्ये "Subscribe to YourBlogName by Email' अशी लिंक दिसेल YourBlogName = तुमच्या ब्लॉगचे नाव.

आता पुढील स्टेप्स सारख्याच... फीडबर्नला लॉगिन करा आणि तुमचे सबस्क्रायबर्स पहा.

काही ब्लॉगर्स पुर्ण लेख/ पोस्ट फीडच्या माध्यमातुन प्रकाशित करतात तर काही अगदी सारांश. सारांश प्रकाशित करणे चांगले - कारण जर तुमचा लेख उत्तम असेल तर सारांश वाचुनही लोक पुर्ण लेख वाचण्यासाठी तुमच्या ब्लॉगर येतीलच! ब्लॉगर मध्ये - पोस्टचा सारांश - पहिल्या काही ओळी - सुमारे २५५ शब्द दाखविण्यासाठी किंवा पुर्ण लेख दाखविण्यासाठी:
१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन "साइट फीड" क्लिक करा.
३. Allow Blog Feeds मध्ये "Full" किंवा "short" सिलेक्ट करा.
४. Post Feed Redirect URL मध्ये तुमच्या फीडबर्नरची लिंक द्या.
5. सेव करा.

वर्डप्रेससाठी हीच माहिती या साईटवर आहे = http://support.wordpress.com/settings/reading-settings/


काही अडचण?

Monday, 7 September 2009

खतरों के खिलाडी - भाग दोन

दैनंदिनी. ७ सप्टें. २००९.
चार दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस... ९४ ई-मेल.. बर्‍याच एफ्.वाय.आय. च्या... कामाच्या फारच कमी.. चहाच्या कपाबरोबर सगळ्या वाचल्या... आणि कामाच्या बाजुला करुन कामाला प्रायारीटीनुसार सुरुवात.

खतरों के खिलाडी - भाग दोन:
संध्याकाळी, खास "खतरों के खिलाडी - भाग दोन" बघण्यासाठी वेळ काढुन ठेवलेला... १४ पोरी.. माफ करा - बायका - सगळ्याच काही ओळखीच्या नाहीत मात्र काही चेहरे जाने पेहचाने -आणि त्यांचे पार्टनर [१२]... सुरुवात तर चांगली झालीय.. विषेशतः गांडुळांनी भरलेल्या भांड्यातुन गांडुळे तोंडाने काढुन दुसर्‍या बॉक्स मध्ये - पार्टनरच्या डोक्यावर टाकणे जरा किळसवाणेच होते... ही ही ही! पण मज्जा आली असेल.. मला तर आली - बघायला...!

.. कलर चॅनलवरती मध्येच अमिताभची नविन "बिग बॉसची" जाहिरात पाहिलीत का? अच्छा, मला वाटतं यावेळच्या बिग बॉसमध्ये हे लोक असतील:
अमिताभ बच्चन, रेखा, दारासिंग, धर्मेंद्र, हेमा मालिनी, डॅनी, सुरेश ओबेरॉय, रीमा लागु

... अजुन काही तुम्हाला आठवताहेत?
विषेशतः "रेखाला कणीक मळताना" आणि हेमाजींना "कपडे धुतानाची" टास्क दिल्यावर काय होईल .... अमिताभ आणि धरमजी "शोले" च्या आठवणी बद्द्ल बोलताना काय काय सांगतील...अमिताभ - रेखा चोरुन भेटायचा प्रयत्न करतील का... धरम - हेमा पुन्हा जुळतील का? दारासिंग कीती तुप खायचे हे सांगतील का? सुरेश ओबेरॉय जुन्या आठवणींत काय सांगतील? डॅनी शोलेतील गब्बर असता तर? हे पाहताना - ऐकताना मज्जा येईल, नाही? ... उगाच माझं आपलं इमॅजिनेशन!
... तर, खके-२ च्या आजच्या भागात- शोनाली - चंदन [?] ची जोडी बाद - घरी परत! उद्याचा खेळ - उद्या पाहुच! शुभ रात्री!

Sunday, 6 September 2009

तुमचा ब्लॉग आणि ब्लॉग हिटस् ..!

परवाच्या एका पोस्ट वरती श्री. रानडे यांनी ब्लॉग हिटस् कशा वाढवता येतील? असं विचारलं होतं. लागलीच उत्तर देता येणं शक्य नव्ह्त, म्हटलं सविस्तर लिहाव. कदाचित इतरांनाही उपयोगी पडेल. तर, ब्लॉग हिटस् वाढवण्यासाठी काही काही टेक्निकल गोष्टीही लागतात, जसं सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन वगैरे वगैरे. पण त्या आधी आपण काही इतर नॉन-टेक्निकल म्हणता येतील अशा गोष्टी पाहु.

१.तुमच्या ब्लॉगचे कंटेंटस् - ओरिजिन्यालिटी: हे सर्वात महत्त्वाचे. तुम्ही काय लिहिता, कसं लिहिता यावर तुमच्या ब्लॉगवर लोक येत असतात. ओरिजनल कंटेट्स असणार्‍या ब्लॉगवरच लोक वाचनं पसंद करतात. म्हणजे तुम्ही जर इतर साइट्स / ब्लॉग्ज वरुन कॉपी करुन पोस्ट करत असाल तर, लोकांना त्यात नविन काही वाटेल किंवा आवडेल असं सांगता येणार नाही. शिवाय ते ब्लॉगिंगच्या एथिक्स मध्ये बसत नाही, असंच मी म्हणेन. जर कंटेट्स इतर साइटवरुन घेतले असतील तर ते लिंक करा. मुळ लेखकाचा आदर करा! आता ओरिजनल कंटेंट्स लिहिण्यासाठी थोडं डोकं चालवावं लागतं हे ही खरंच! पण स्वतः लिहिलेले - मनमोकळे पणानं लिहिलेले पोस्ट्स वाचकांना नेहमीच भुरळ घालतात हेच खरं. उदा. दयायचं म्हटलं तर महेंद्र कुललर्णीं किंवा अनिकेत चा ब्लॉग वाचा. भन्नाट आणि बिंधास्त लिहितात हे. आणि म्हणुनच त्यांचे हिटस ५०००० पेक्षा अधिक आहेत. शिवाय खुद्द वर्डप्रेसच्या हॉट ब्लॉग लिस्ट मध्ये त्यांचे ब्लॉग आहेत!

२.कमेंटस् - प्रतिक्रिया: तुम्ही जर एखादी पोस्ट / ब्लॉग वाचलात तर आपलं - प्रामाणिक - मत जरूर नोंदवा. पटलं - नाही पटलं हे लिहा. त्यामुळे लिहिणार्‍यास चालना आणि लोकांपर्यंत आपले म्हणने पटल्याचा आनंद होतो. पुढील लिखानास उत्तेजनाही मिळते. आता त्यात तुमचा फायदा असा की, तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया - कमेंट ही त्या ब्लॉगवर येणार्‍या - कमेंट करणार्‍या दुसर्‍या वाचकाच्या नजरेस पडते. स्वतः कमेंट लिहिण्याआधी बरेच लोक, इतरांनी काय मतं मांडली आहेत हे वाचतात. त्यामुळे तो/ ती तुमच्या ब्लॉगवर येण्याची शक्यता असतेच. आहे ना फायदा!
आता ब्लॉगर म्हणुन येणार्‍या प्रतिक्रिया/ कमेंटस यांना उत्तर देण्याची जबाबदारीही तुमची आहेच. तेंव्हा, कुणी प्रतिकिया दिली तर त्याला उत्तर जरुर द्या! त्यामुळे ब्लॉगर आणि वाचक यांच्यामध्ये एक फ्रेंडली नातंही होऊन जातं आणि एक सोशल नेटवर्क तयार होऊन तुम्हाला "माऊथ पब्लिसिटी" चा ही फायदा होतो.

३.बॅक लिंक्सः आवडलेल्या ब्लॉगला जरुर फॉलो करा. परस्पर सहमतीने एक-मेकांच्या ब्लोगवरती लिंक एक्सचेंज करा. म्हणजे तुमच्या आवडत्या ब्लॉगची लिंग तुम्ही तुमच्या ब्लॉगवर द्या आणि बदल्यात तुमच्या ब्लॉगची लिंक त्या ब्लॉगवर टाकण्यास विनंती करा.

४.पोस्टचे नाव - टॅग्ज - लेबल्सः पोस्टचे नाव हे "कॅची" असावं म्हणजे क्युरॅसिटीनेही लोक तुमच्या ब्लॉगवर येतील. मात्र पोस्ट - लेख - नावाला धरुनच असावी. नाही तर पोस्टचे नाव "पुण्यात उडत्या तबकड्या" असं द्यायचं आणि लेख "स्वाईन फ्ल्यु" वर लिहायचा, असं करु नका. कदाचित सुरुवातीला काही लोक येतीलही, मात्र नंतर त्यांचा पोपट झाल्याचं पाहुन फिरकणारही नाहीत! तसेच पोस्टच्या खाली लेबल्स, टॅग्ज जरुर लिहा. त्यामुळे तुमचा ब्लॉग कॅटेगरायझ व्हायला मदत होते. शिवाय सर्च इंजिनमध्येही फायदेशीर ठरते!

५.सोशल नेटवर्किंग साइटस - फोरम्स - ट्विटर: जर तुम्ही ऑर्कुट/ फेसबुक वर असाल तर मित्रांना नविन पोस्टचे स्क्रॅप टाका.. मात्र त्यांचे पुर्ण पेज अशा स्क्रॅपनी भरुन नका टाकु. एखाद्या फोरम - किंवा डिस्कशन साइटवर रजिस्टर्ड असाल तर प्रोफाइल मध्ये आपल्या ब्लॉगचा उल्लेख करा.
ट्विटर ला रजिस्टर करा आणि आपले नेटवर्क - फॉलोअर्स - वाढवा - मायक्रोब्लॉगिंगचा हा प्लॅटफॉर्म तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी चांगलीच करु शकतो.

६.जाहिराती: जाहिरातींनी भरलेल्या ब्लॉगवर मी शक्यतो जात नाही. तिथं वाचण्यपेक्षा त्या जाहिरातीच त्रासदायक ठरतात. हां, तुम्ही गुगल एडसेन्स किंवा तत्सम जाहिराती वापरत असाल तर हरकत नाही. मात्र त्यांनी तुमचा ब्लॉग भरुन टाकु नका! जाहिराती - ब्लोगच्या डिझाइन प्रमाणे व्यवस्थित टाकलेल्या असाव्यात. पॉप अप वापरुच नका. अशा साइटस/ ब्लॉग्ज फार इरिटेट करतात. बरेच लोक पुन्हा अशा साइटवर येण्यास तयार नसतात.

७.ग्राफिक्स - फोटोज: फक्त टेक्स्ट असणारे पोस्ट वाचणे कंटाळवाणे असते. त्यामुळे तुमच्या पोस्ट मध्ये ग्राफिक्स - इमेजेस असणं महत्त्वाचं. आता फोटो किंवा ग्राफिक्स मिळवण्यासाठी ते कोणत्याही वेबसाइटवरुन घेणे योग्य नाही. घेतलेच तर - ग्राफिक्स *** या साइटवरुन घेतले असं नमुद करा. त्यामुळे तुमची बाभ़ळ बुडणार नाहे [गावची म्हण - नुकसान होणार नाही!] मात्र तुमचा प्रामाणिकपणा नक्कीच दिसुन येईल. शिवाय झिमँटा सारखी सुविधा आहेच या साठी!

८.ब्लॉग मीटर - एनालिटिक्स: तुमच्या ब्लॉगवर येणार्‍या विजिटर्सना ओळखा. म्हणजे ते कुठुन आले.... कसे - काय सर्च करुन आले? कोणत्या ब्लॉगवरुन आले? हे माहित करण्यासाठी गुगलचे एनालॅटिक्स ही सुविधा किंवा स्टॅट काऊंटर वापरा. यामुळे तुम्हाला तुमच्या विजिटर्सबद्द्ल बरीच माहिती मिळते. शिवाय गुगल वेबमास्टर टुल्स ही सुविधाही खास त्यासाठीच आहे. त्यावरही तुम्हाला बरीच माहिती मिळु शकते.

९.वाचकांचे म्हणने: वाचक काय वाचण्यात इंटरेस्टेड आहेत हे आपण लिहिलेल्या वेगवेगळ्या पोस्ट मधुन आपल्याला समजेलच. त्यामुळे मुद्द्याचं आणि गरज असेल तेवढंच लिहा. हजार ओळींची पोस्ट कंटाळवाणी ठरु शकते. त्यापेक्षा थोडक्यात लिहिलेली पोस्ट कधीही वाचणीय असते!

१०.रेग्युलर लिखाण: रेग्युलर लिखान तुमच्या ब्लॉगला जिवंत ठेवतं. रोजच लिहायला पाहिजे असं नाही.. किंवा रोजच फालतु - काहीही लिहुन फायदा होईल असं नाही. दोन दिवसांतुन एखादी पोस्ट - मात्र वाचण्यालायक लिहिली तर तुम्हाला चांगला वाचक वर्ग मिळु शकतो.

११. ई-मेल सिग्नेचर: तुम्ही जेंव्हाही एखादी मेल लिहिता, त्यामध्ये तुमच्या सिग्नेचर नंतर तुमच्या ब्लॉगची लिंक टाकल्यासही तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी होण्यास मदत होते. उदा. जीमेल - याहु - रेडिफ वगैरे. हो, मात्र ऑफिसच्या मेल मध्ये तसं करु नका म्हणजे झालं.

१२: ब्लॉग रीडर्स साईटः मराठीब्लॉग्ज.नेट, ब्लॉगअड्डा.कॉम, ब्लॉगवाणी.कॉम, ब्लॉगकॅटलॉग.कॉम, स्टंबलअपॉन्.कॉम या सारख्या साईटस् वरती आपला ब्लॉग जोडा. त्यासाठी त्यांचे विजेटही मिळतात. ते तुमच्या ब्लॉगवर टाका. या साइट ब्लॉगच्या डिरेक्टरीज किंवा एकत्रिकरण करतात. शिवाय सर्च इंजिनमध्ये त्यांचं रॅकिंग चांगलं असल्याने या साइट्स वरुनही तुम्हाला भरपुर हिट्स मिळु शकतात. उदा. माझ्या ब्लॉगवर सर्वात जास्त हिट्स"मराठीब्लॉग्ज. नेट" वरुन येतात.

१३. ब्लॉग डिझाइन: तुमच्या ब्लॉगचे डिझाइन हे थोडसं वेगळं असावं. कॉमन डिझाइन्स मनात भरत नाहीत त्यामुळे वाचक किंवा विजिटर लवकरच बोअर होतो. या बद्द्लची एक पोस्ट [ब्लॉगचे डिझाइन] मी आधी लिहिलिय ती वाचा.

आता सर्च इंजिन बद्द्लः
१.खाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगर / वर्डप्रेसच्या कोडमध्ये टाका.
तुमचा ब्लॉग जर फ्री वर्डप्रेस वर असेल तर हा कोड टाकता येणार नाही. मात्र तुमचे स्वत:चे होस्टींग घेऊन केलं असेल तर मात्र नक्कीच करता येइल!
... अपडेटः
ह्या दोन ओळी तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या कोड मध्ये टाकायच्या आहेत.
१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. लेआऊट टॅब वर क्लिक करा.
३. "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
<title>data:blog.pageTitle/></title>

दिसेल, त्याच्या लागलीच खाली ह्या दोन ओळी पेस्ट करा.
<meta name="Keywords" content="keywordOne, SecondKeyword, 3rdKeyword, add your won keywords here!"/>

<meta name="Description" content="This is my website. Add your own description here!"/>

४. कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन टेक्स्ट बदला.
५. सेव बटन क्लिक करा.... झालं

ह्या कोड मुळे सर्च इंजिन मध्ये दिसणारी तुमची लिंक त्या की-वर्ड साठी कॅटेगरायज होईल आणि लिंकच्या खाली दिसणारी ओळ ही तुमचे डिस्क्रीप्शन असेल.

२.तुमचा ब्लॉग गुगल, याहु, एम्.एस.एन/बिंग या सर्च इंजिनना सबमिट करा!

हुम्म.. झालं! काही वर्षांपुर्वी मी हेच काम प्रोफेशन चा भाग म्हणुन करत होतो.... सध्या नाही! त्यामुळे कदाचित अजुनही काही मुद्दे असतील!!

सुट्टीचा दिवस आणि टीव्ही!

दैनंदिनी: ६ सप्टें. २००९

सकाळी लवकर उठणे - आणि तेही विषेशतः सुट्टी असताना... जिवावर येतं.! मात्र उठलोच..! काही वेळ मुलीसोबत खेळलो - आणि पुन्हा टी.व्ही. समोर! नॅट-जिओ वरचा "जेल्ड एब्रॉड्" कार्यक्रम पाहिला... असे काही कार्यक्रम मी नेहमीच आठवणीने बघतो... जसे - नॅट-जिओ वरचा "जेल्ड एब्रॉड्", डिस्कवरी वरचा "मॅन वर्सेस वाईल्ड", हिस्टरीवरचे इंडियाचे बेस्ट डॉक्युमेट्रीज.. बरीच माहिती मिळते यांतुन! असो... माझ्या आवडत्या टी.व्ही. प्रॉग्राम्सबद्द्ल आरामात एखादी पोस्ट लिहिन!

काल रात्री "वॉटेंड" बघायचा राहिला. आज दुपारी पाहिला.. थँक्स एच्.बी.ओ. = रीपिट टेलिकास्टसाठी.. "वॉटेड" बरा वाटला... मात्र ट्रेलर मध्ये पाहताना तो जास्त इंटरेस्टींग असेल असं वाटलं होतं...! असो.. बघितलाच! त्यानंतर थोडावेळ मस्त झोप!

संध्याकाळी काही ब्लॉग्ज वाचले - काही कमेंट्स टाकल्या.. काही ब्लॉगवरती "मिरजेतला प्रकार" वाचला.. धर्मांध लोक अजुनही आहेत - सुन्न होतं अशा वेळी!

उद्या ऑफिसला जायचं आहे - हे सत्य चार दिवसांच्या सुट्टीनंतर मान्य करणे जरा अवघडच आहे! मात्र, जाना तो पडेगा, बॉस!

ब्लॉगिंगवरती एक पोस्ट लिहिलीय, उद्या सकाळी पोस्ट करेन.

एकंदरीत ठिक दिवस! शुभ रात्री!

Saturday, 5 September 2009

मास्तरांना चरणस्पर्श नमस्कार!

दैनंदिनी: ५ सप्टें. २००९

पुन्हा असाच उनाड दिवस!

शेअर्स असलेल्या दोन कंपन्या आणि एका बॅकेचा एन्युअल रेपोर्ट मिळाले... बघुनच कोपर्‍यात ठेऊन दिले... असंही त्यातलं आपल्याला काय ** कळणार आहे? लाखाचे बारा हजार होतात हे ऐकलं होतं.. आता प्रत्यक्ष बघतोय!

शिक्षक दिनाच्या - निमित्ताने - शाळा, कॉलेजच्या काहीं आठवणी झाल्या.

हायस्कुलमध्ये - असताना मी ही एकदा ईतिहासाचा शिक्षक झालो होतो... तेंव्हा आधीच्या शिक्षकाच्या तासाला मुलांनी घातलेला गोंधळ पाहुन मी हातात छडी घेऊन गेलो होतो... उगाचच धाक धाकवण्यासाठी. माझा तास मात्र व्यवस्थित झाला... त्यानंतर कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा तास घेतला होता.. आमच्या लेक्चररनी डिक्लेअर केलेल्या चाप्टर वर... मस्त झाला होता.... कारण मी जे सांगत होतो ते सर्वांसाठीच नविन होतं.. त्यामुळे समजले किंवा नाही चा प्रश्नच येत नव्हता. हां, मी आधीच आमच्या लेक्चररकडुन त्या चाप्टरच्या नोटस् घेतल्या होत्या. त्यामुळे फक्त [कदाचित] मलाच माहित होतं की मी बरोबर तेच सांगतोय.

मात्र आज ते शिक्षक, ते कॉलेज यांच्यात फारच अंतर पडले आहे. मला मान्य आहे की यासाठी मीच जबाबदार आहे. कदाचित मला - आजही शिक्षक - विद्यार्थ्याचं ते नातं - अंतराने का होईना, जपता आलं असतं! विसरलेल्या त्या मास्तरांना, सरांना, लेक्चररांना आज आठवणीने - चरणस्पर्श नमस्कार!


.... असो.. हे असंच चालायचं.. रात्री ९ वा. एच. बी. ओ. वर एंजेलिना चा "वाटेंड" बघायचा आहे. ;-)
शुभ रात्री!

आम्ही मराठी!

मायक्रोसॉप्ट युरोपचा चेअरमन निवडण्यासाठी बिल गेटस् मोठ्या प्रमाणावर एक मुलाखत भरवतो. ५००० कँडिडेटस् या मुलाखतीसाठी हजर राहतात. आमचा मकरंद त्यातलाच एक!

बिल गेटस्: आपण मायक्रोसॉप्ट मध्ये ईच्छुक असल्याचे पाहुन आनंद झाला. आपण आल्याबद्दल आभार. आता, ज्यांना "जावा" माहित नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे. सुमारे २००० कॅडिडेटस् नाइलाज म्हणुन बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मला "जावा" येतच नाही. पण थांबलो तर काय जातयं? एक ट्राय तर मारु! आणि तो थांबतो.

बिल गेटस्: ज्या कँडिडेटस् ना १०० पेक्षा अधिक लोकांना मॅनेज करण्याचा अनुभव नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे. सुमारे २००० कॅडिडेटस् पुन्हा नाइलाज म्हणुन बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मी कधीच कुणालाच मॅनेज केलं नाही. पण थांबलो तर काय जातयं? बघु काय होतंय ते!

बिल गेटस्: ज्या कँडिडेटस् कडे मॅनेजमेंटचा डिप्लोमा नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे.
बॅड्लक म्हणुन ५०० कॅडिडेटस् बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मी १५ व्या वर्षीच शाळा सोडली, पण आता गमावण्यासारखं आपल्याकडे आहेच काय? आणि तो थांबतो.

शेवटी, बिल गेटस्: ज्यांना "सेरब्रो - क्रोट" बोलता येत नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे... आणि ४९८ कॅडिडेटस् बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मला तर "सेरब्रो - क्रोट" चा एक शब्दही येत नाही! पण म्हणुन काय झाल? आणि तो थांबतो.
आता त्या रुममध्ये मकरंद आणि दुसरा एक असे दोघेच उरतात.

बिल गेटस्: हां, तर फक्त तुम्ही दोघेच आहात ज्यांना "सेरब्रो - क्रोट" बोलता येतं. म्हणुन, आपण दोघांनी आता त्या भाषेत वार्तालाप करावा.

मकरंद शांतपणे, त्या दुसर्‍या कँडिडेट कडे वळुन विचारतो: "कोठुन आलास रे?"
दुसरा: पुण्याहुन!

........... तर, मानलं का नाही - आम्हा मराठी माणसांना!

[मित्राच्या आलेल्या इंग्लिश जोक वर आधारीत हा मराठी जोक!]

Friday, 4 September 2009

मोबाईल / ई-मेल ब्लॉगिंग!

समजा तुम्ही एखादा मस्त फोटो काढलाय किंवा एखादी सिच्युएशन दाखवणारा फोटो काढलाय आणि तुम्हाला तो इतरांना दाखवायचा आहे. साहजिकच तुम्ही मित्रांना तो एम्.एम्.एस. / एस.एम्.एस. कराल. मात्र तेच जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर टाकायचा असेल तर - साहजिकच तुम्ही तो ब्लु टुथ ने मशिनवर ट्रान्सफर कराल आणि मग ब्लॉग कराल. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही [जी.पी.आर.एस - आवश्यक!] ब्लॉगिंग करु शकता हे आपणास माहित आहे का?

"ब्लॉगर मोबाईल" ही सुविधा पुरवते.

तर, मोबाईल ब्लॉगिंग कसे कराल?
१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन "Email & Mobile" वर क्लिक करा.
३. त्या पेज वर "Mobile Devices" च्या समोर "Add mobile device' वर क्लिक करा आणि पॉप मध्ये आलेला कोड "go@blogger.com" वर मेल करा.

बाकीच्या पुढच्या स्टेप्स ब्लॉगर करेल. अधिक माहिती पहा!

जर तुमचा मोबाईल सोनी - एर्रिक्सनचा असेल तर, त्याच्या काही मॉडेल्स मध्ये ही सुविधा इन-बिल्ट आहे. फक्त तुम्हाला त्याचे सेटींग्ज करावे लागतात.

ई-मेल ब्लॉगिंग
मोबाईल पेक्षा ई-मेल ब्लॉगिंग सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तो फोटो किंवा लिखान मेल करावं लागतं, बस्स एवढंच.
१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन Email & Mobile" वर क्लिक करा.
३. "Email Posting Address" च्या समोरच्या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल ब्लॉगिंगसाठीचा शब्द टाका. म्हणजे तो एक पुर्ण ई-मेल एड्रेस तयार होईल.
उदा. bloggerID.NEWWORD@blogger.com
४. त्याच्या खाली असणार्‍या रेडिओ बटन्स पैकी:
Publish emails immediately - लागलीच प्रकाशित करण्यासाठी
Save emails as draft posts - पुन्हा प्रकाशित करण्यासाठी
Disabled - सेवा बंद करण्यासाठी
- जे योग्य असेल त्यावर क्लिक करा
५. आता तुम्ही या ई-मेल वरती पाठवेलेला मेल हा तुमची नविन ब्लॉग पोस्ट असेल!

.... अधिक माहिती - ब्लॉगरवर आहेच!

वर्डप्रेस मधुन ई-मेल ब्लॉगिंग करण्यासाठी:
१. वर्डप्रेसला लॉगिन करा.
२. "Dashboard" वर क्लिक करुन "My Blogs" लिंक वर क्लिक करा.
३. तुमचे सारे रजिस्टर्ड ब्लॉग दिसतील. ज्याच्यासाठी ई-मेल ब्लॉगिंग सुरु करायचे आहे त्याच्यासमोर असणार्‍या "Post by Email" कॉलमधील "Enable" या बटनवर क्लिक करा.
४. तुमच्यासाठी एक खास - युनिक ई-मेल एड्रेस तयार होईल.
५. आता त्या ई-मेलवर पाठवलेले मेल्स - म्हणजे तुमची नविन पोस्ट

काही मुद्दे:
ब्लॉगर च्या मोबाईल - ईमेल ब्लॉगिंग मध्ये तुम्हाल लेबल किंवा कॅटेगरी लिहिने, पोस्ट डीले - स्केड्युल करणे अशा गोष्टी करता येत नाहीत. मात्र वर्डप्रेस मध्ये तशी सोय आहे. वर्डप्रेसच्या ई-मेल ब्लॉगिंग बाबत अधिक माहिती.

ब्लॉगिंगचा ई-मेल एड्रेस सिक्रेट ठेवा. तो कुणाला देऊ नका. नाही तर तुमच्या ब्लॉगवर कोणीही पोस्ट करु शकते!

चला तर... आता तुम्ही कधी ही ब्लॉगिंग करु शकता!

डु नॉट डिस्टर्ब [डी.एन.डी.] तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठीच आहे का?

दैनंदिनी: ४ सप्टें. २००९.

पुन्हा एक सुस्त दिवस! मात्र सुरुवातच टेलिमार्केटिंग च्या कॉलने झाली! त्यानंतरचा 'क्राय' चा डोनेशन्साठीचा फोन. त्यानंतरचे काही सेल्सचे एस.एम.एस.! ही ऑफर - ती ऑफर. मी माझा मोबाईल - डी.एन.डी. साठी २००७ मध्ये रजिस्टर केलाय.. तरीही हा पिछा काही अजुनतरी सुटला नाही. कॉलपेक्षा आजकाल - मेसेजेसच फार येतात!

अरे हां, तुम्हाला जर तुमचा मोबाईल डी.एन.डी. साठी रजिस्टर्ड झाला आहे किंवा नाही हे चेक करायचे असेल तर ही लिंक पहा!

दुपारी छोकरीबरोबर पेंटींग केली... तारे जमिन पर - स्टाइल. एक मात्र खरं - ही चित्रकला कोणाच्याही हातचं काम नाही.. मला वाटतं माझ्यापेक्षा माझी मुलगीच चांगलं पेंटींग करते. मात्र मला खुष करण्यासाठी - "बाबा, तुझं पेंटींग छान झालयं हां, मला आवडलं", असं म्हणायला विसरत नाही!

@शिनुचं नविन टेंप्लेट अपडेट झालेलं दिसतयं - मीही खुष!
..... बाकी उद्या बोलु - शुभ रात्री!

"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन..?

"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन, मला वाटतं, प्रत्येकानं काही ना काही डोनेट करावं... आता यांत काही कंपलशन नाही... काहींना नसेल असं वाटत!

YANGON, MYANMAR - APRIL 24:   A mother holds h...Image by Getty Images via Daylife

सध्यातरी मी कोणत्याही मोठ्या संस्थेला डोनेशन देण्याच्या मुडमध्ये नाही. कारण - मला वाटतं आपण दिलेल्या डोनेशनच्या पैशाचा योग्य उपयोग - सदुपयोग - होतोय यबद्दल मी [एकटाच?] बराच साशंक असतो. त्यामुळे गेल्या वर्षी गावच्या शाळेत ४०० वह्या वडिलांमार्फत दिल्या. यावर्षी चं डोनेशनचं पैसे [रु.५०००] जुन्या एका मित्राच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी दिले. आता तुम्ही म्हणाल - या स्लोडाऊन - रिसेशन मध्ये जिथं आमचंच कसंतरी भागतंय तिथं डोनशनचा प्रश्न येतोच कुठे... असो! पण माझ्यासाठे पैसे साठवण्याचा एक [नवा!] पर्याय यावर्षी खुला झालाय. तो म्हणजे - स्मोकिंक सोडलंय!! म्हणजे आता किमान दर दिवशी मी अंदाजे रु. २० तरी वाचवु शकतो. [ ४ गोल्ड फ्लॅक * ५ = २० * ३० [दिवस] * १२ [महिने] = रु. ४८०० दर वर्षी ] . शिवाय मी वाढदिवस अगदिच ओवाळणी करुन करतो, म्हणजे अंदाजे रु. ५०० तरी शिल्लक पडलेच ना! झालं ना - एका वर्षाचं डोनेशन!

आता प्रत्येकाचं डोनेशन करण्यची पध्दत वेगळी असु शकते. माझे काही मित्र श्रमदान करतात.. काही अंध मुलांच्या शाळेत जाऊन अन्न दान करतात... काही रक्तदान करतात तर काही माझ्यासारखं किंवा माझ्याच डोनेशन मध्ये शेअर करतात....असंच आणखीन काही..! तुम्हीही कोणत्या न् कोणत्या पध्दतीने डोनेशन करतच असाल ना?

Reblog this post [with Zemanta]

Thursday, 3 September 2009

मी प्रमाणापेक्षा जास्त आळशी झालोय?

दैनंदिनी - ३ स्प्टें. २००९
सुट्टीचा दिवस... मस्त आरामात उठणे.. सोप्यावर पडुन टीव्ही पाहणे.. यातच सकाळ संपली...!
दुपारी गेलेली लाईट रात्री ९.१५ आली... आणि म्हणे पुण्यात लोड शेडिंग कमी होणारयं... हो.. खरं का? कधी पासुन?
संध्याकाळी पाऊस - रिमझिम - होताच... त्यामुळे पुण्यात जाऊन - म्हणजे - पेठेत जाऊन - "गणपती पाहणे" झालेच नाही... असो... सोसायटीचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम - खिडकीतुनच पाहिला.... कदाचित मी प्रमाणापेक्षा [*] जास्त आळशी झालोय, हेच खरं!

@शिनु साठी कमेंटस् मध्येच हेल्प पॉईंटस् लिहिलेत... होप, ही विल सक्सिड् !
विचार होता - ऑनलाइन न जाण्याचा... पण जाम बोअर होतं... विदाऊट ब्लॉगिंग, मेलिंग... :(
माझं अगदीच "अट्टल दारुड्या" सारखं झालयं… कितीही नाही म्हटलं तरी तो गुत्त्यावर आणि मी नेटवर जायला चुकत नाही !
* आळसाचं प्रमाण कसं ठरवायचं? चला, शुभरात्री .. उद्या भेटु!

Wednesday, 2 September 2009

विश्रांती नम:

दैनंदिनी - २ सप्टें. २००९
... मंथली रिव्ह्युवज मिटींग... रिपोर्ट... डिस्कशन.. बस्स.. दिवसाची सुरुवात! दोन - ती असायन्ड टास्कस् ... डन!
सोमवार पर्यंत मस्त सुट्टीवर आहे... ट्विटर किंवा चॅटवर ऑनलाइन नसणार... थोडक्यात म्हणजे - विश्रांती नम: ||
रात्री वेळ - मिळाला तर एखादी टेक पोस्ट टाकावी म्हणतोय... बघु..! चला.. तसं सोमवारी भेटुच ... काळजी घ्या!

झिमँटा - ब्लॉगिंगच्या भन्नाट अनुभवासाठी!

पोस्ट किंवा एखादे आर्टिकल लिहिताना ब्लॉगर्सना गरज पडते ती संबधित फोटो किंवा इमेजची. शिवाय फोटोसहित लिहिलेली पोस्ट दिसायला आणि वाचायलाही छान असते! असा फोटो नेटवर शोधणे तसं फार अवघड नाही, मात्र बर्‍याचदा कॉपी-राइट च्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता असते. तसं भारतामध्ये ही प्रकरणं तशी "किरकोळ" जरी समजण्यात येत असली तरी हा फार मोठा इश्शु आहे - होऊ शकतो. तर यावर "झिमॅटा" नावाची वेबसाइट - फायरफॉक्स प्लगिन आपल्या फार उपयोगी पडतं. कसं ते या डेमो मध्ये पहा!
तुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे!] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा!

कसे वापरावे:
एकदा झिमँटा इंस्टाल झाले की तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस ला लॉगिन करा. पोस्ट लिहिण्याच्या उजव्या बाजुला ते दिसेल. तुम्ही काही पोस्ट संबंधित ओळी लिहिल्या की ते तुम्हाला संबंधित ग्राफिक्स आणि लिंक्सही दाखवेल. संबधित इमेजवर क्लिक केलं की ती इमेज तुमच्या पोस्ट मध्ये जाईल.. सोप्प ना! झिमँटा हे, विकि - फ्लिकर्, नेट वरच्या कॉपी राइट्स फ्री - इमेजेस दाखवतं म्हणजे आपण त्या वापरायला मोकळे. आता तुम्ही मराठी किंवा हिंदीत लिहित असाल तर संबधित ग्राफिक्ससाठी काही शब्द/ ओळी इंग्रजीत लिहा म्हणजे तुम्हाला योग्य ग्राफिक्स सापडेल. नंतर पब्लिश करण्याआधी ते शब्द / ओळी डीलीट करायला विसरु नका!

आता, ग्राफिक्स डाव्या [डिफॉल्ड सेटींग] बाजुला जातात.. ते तुम्ही उजव्या बाजुलाही सेट करु शकता. पोस्टच्या खाली - रीब्लॉगचे बटन येते. ते तुमच्या विजिटर्सनी पुन्हा ती पोस्ट पब्लिश करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला ते नको असेल तर HTML टॅब मध्ये जाउन तो कोड डिलिट करा.

शिवाय तुमच्या पोस्टशी निगडीत काही इतर पोस्टच्या लिंकही त्या ग्राफिक्सच्या खाली दिसतात. त्यावर क्लिक केलं की ती लिंक तुमच्या पोस्ट मध्ये टाकली जाते. तसेच पोस्टमध्ये वापरलेले शब्द आपण लेबल्स म्हणुनही क्लिक करुन टाकू शकता. हे प्लगिन जवळ - जवळ सर्व ब्राउजर्स [फायरफॉक्स, आय.ई वगैरे] आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी [ब्लॉगर, वर्डप्रेस वगैरे] आहे. आणि हो! हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं! सही ना?

हुम्म..! तर, आशा आहे आपणांस हे वाचुन ब्लॉगिंगसाठी मदत होईल. चला तर मग - लागा तयारीला! शिवाय तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर सांगा - हॅपी टु हेल्प!
Reblog this post [with Zemanta]