Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday, 14 July 2009

वॉट ऍन आयडिया...!

handy little iPhoneImage by Leeks via Flickr

महेंद्रजींची पोस्ट वाचुन मला ही माझा किस्सा सांगावासा वाटला, म्हणुन अर्ध्यात सोडलेली हे पोस्ट पुर्ण करतोय!

तर किस्सा असा- माझ्या मोबाइल सर्विस - आयडियाचा, झिरो बॅलन्सचा प्लान आहे. साहजिकच कैलिंग रेट जरा महाग आहेत. शिवाय गेली पाच वर्षे सर्विसधारक असल्यामुळे - सो-कौल्ड - गोल्ड [की प्लॅटिनम? कसलं डोंबलाचं!!] लेबल असंच लावलेलं ... त्याचं आपल्याला काय? असो.. मग मी जरा चौकशी केली अन् कळालं की मी जर ५९ रु. मंथली पॅकेज घेतलं तर कौलिंग रेट अर्धा पडेल. मी म्हटलं चला.. काही हरकत नाही.... आजच जोडुन दे [१ जुन]... तर तो आउटलेटवाला म्हणाला की मंथली बिलिंग सायकलच्या वेळीच हा चेंज करता येइल. बरं .. माझी दर महिन्याची १५ तारीख बिलिंग सायकल! तेंव्हा तो म्हणाला १३ ला शनिवारी या... पॅकेज जोडुन देतो.. १५ पासुन चालु होइल. मी ठीक आहे ... १४ ला रविवार आहे, शनिवारी १३ ला [जुन] येतो...आणि बाहेर पडलो.

१३ जुनला जाउन, माझ्या दोन्ही मो. नंबरांना पॅकेज जोडुन घेतले. १५ जुन पासुन चालु होण्याच्या खात्रीवर!.... जुनचे बिल आले तेंव्हा त्यात हे १२० रु. [+टॅक्स] जोडुन आलेले!! शिवाय ज्या मो. नंबरसाठी जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठीही ६० पैसे लावुन!! आयडियाच्या कौल सेंटरला फोन लावला.. तर नेहमीप्रमाणे "आमचे सर्व प्रतिनिधी साध्या इतर ग्राहकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. कृपया प्रतीक्षा करा" आणि त्यानंतरची ती जाहिरातीची टेप सुरु... ५-७ मिनिटांनी फोन लागला! नशिब!! मी माझी तक्रार त्या प्रतिनिधिला संगितली, तर कळाले की "तो प्लान" १३ जुन पासुनच चालु झाला आहे आणि मला १३-१४ तारखेसाठी १२० रु. द्यावे लागतील! मी म्हटलं. तु मला तुझ्या मॅनेजरशी फोनवर जोडुन दे, तर तसं करता येणार नाही असं म्हटला... ठीक आहे.. तक्रार लिहुन घे - घेतली...आमचे प्रतिनिधी २४ तासांत फोन करतील म्हणाला.... ठीक आहे म्हणुन फोन कट केला.


दुसर्‍या दिवशी फोन आला....
ती: सर, तुमच्या तक्रारी साठी हा फोन करण्यात आला आहे. आपली काय तक्रार आहे?
मी: मी जे पॅकेज जोडले आहे, ते दोन दिवस आधी जोडुन त्यासाठी पुर्ण महिन्याचे चार्ज लावण्यात आले आहेत. हे कसं?
ती: सर, तुम्ही १३ तारखेला पॅकेजची रीक्वेस्ट केली होती. गोल्ड मेंबर असल्यामुळे ती ताबडतोब पुर्ण करण्यात आली आहे.
मी: पण मी १ जुनला चौकशी केली, तेंव्हा का नाही जोडुन दिले - गोल्ड मेंबर म्हणुन?
ती: ......... सर, ती रीक्वेस्ट आम्हाला १३ जुनला मिळाली.
मी: मग आयडिया आउट्लेट उघडुन बसलेले "ते" लोक कोण आहेत? त्यांनी मला चुकीची माहिती का दिली? आणि गोल्ड मेंबर म्हणुन तुम्ही दोन दिवसाचा डिस्काउंट का नाही दिला?
ती: ........!.... सर मी आमच्या मॅनेजरला विचारुन तुम्हाला परत फोन करते.
मी: ठीक आहे!!

काही वेळांनी...
ती: सर, तुमची तक्रार आणि कारण ग्राह्य धरुन आम्ही १२० रु. रीवर्ट करत आहोत.
मी: आभारी आहे!
....................................
ती: तुमची अजुन काय तक्रार आहे का?
मी: हो, आहे ना... माझ्या दुसर्‍या मो. नंबरसाठी ज्यावर जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठी ६० पैसे कसे लावलेत?
ती: माफ करा... किती चार्ज लावलाय?
मी: ६० पैसे, फक्त!
ती: ................ चुकुन लागला असेल सर! आणि ही अमाउंट काही मोठी नाही!!
मी: तुमचे किती कस्टमर्स असतील हो... अंदाजे?
ती: जवळ - जवळ ८ लाख..!
मी: जर तुम्ही त्यातील ५ लाख लोकांना ६० पैसे "चुकुन" लावले तर होणारी अमाउंट नक्कीच मोठी असेल, नाही?? वाट ऍन आयडिया, मॅडमजी!!
ती: ...................... माफ करा सर. तुमची अमाउंट रीवर्ट करण्यात येत आहे!!
मी: मी आपले लाख - लाख आभार मानतो!

................ तर असा हा किस्सा... नाइस आइडिया, हो ना!




Reblog this post [with Zemanta]

Sunday, 12 July 2009

निळु भाऊ: देव तुम्हाला चिरशांती देवो!

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये जिवंत खलनायक उभा करणारे निळु फुले आज आपल्यात राहिले नाहित.



त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!

फोटो - म.टा.

आइस-एज ३, पाहिला?

"फादर्स डे" ला मी माझ्या छोकरीला "आइस-एज- ३" दाखवण्याचं प्रौमिस केले होतं... आज मुहुर्त लागला..! सिनेमा तसा मस्त आहे... हिंदी वर्जन बघितला.. उगिचच आपली इंग्रजीची अक्क्ल पाजळायला नको म्हणुन... आणि खरं सांगायचं तर यातील विनोद आणि काही टपोरी संवास हिंदीमध्येच ऐकायला चांगले वाटतात... :)


फोटो - आइस - एज: रामा'ज सक्रीन
तर.. एकंदरीत मस्त वाटला सिनेमा... जरा छोटासा आहे... पण छकास... !
चला.. डोळयाची झापडं बंद होताहेत....कालच्या "पेब विकटगड ट्रेकची" सुस्ती अजुनही आहे... नंतर भेटु...!

Monday, 6 July 2009

भटकंती - अधिक माहिती ...

भटकंतीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे जरुर पहा:
ट्रेकक्षितिज
सह्याद्री वरील पुस्तके
सह्याद्री
भटकंती
ट्रेकडी
युवाशक्ती
भ्रमंती
पुणे - आसपास
दिपक चौधरी आणि अभिजित अवलसकर

बाकी.... जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर जरुर लिहा ...!

पुणे - गड आणि किल्ले - माहिती...

पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्‍याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.

पुणे गड - किल्ले - माहिती

सदर फाइल नेटवर सापडल्यामुळे - मालकाची माहिती नाही

Thursday, 2 July 2009

ये रे.. ये रे.. पावसा!

आज दोन दिवस झाले, आमच्या सोसयटीमध्ये पाणी नाही.. तसे पण कार्पोरेशनचे पाणी अजुन आले नाही आणि टँकरवाले पाणीच नाही म्हणताहेत! पिण्याच्या पाण्यासाठी बिसलरी चालु आहे..धुण्या- भांड्यासाठी पाणीच नाही... आई-बाबा वैतागुन गावी निघुन गेले... :(

Rain on an umbrella from passing showersImage via Wikipedia

"लगान" चे सिन राहुन - राहुन डोळ्यासमोर येताहेत.... !

चिंब पावसात भिजुन जमाना झाला असं वाटतयं... गरमा-गरम वडा-पाव आणि वाफाळणारा अमृततुल्य चहा.... लोणावळ्याचे - राजमाची - ट्रेकिंग साठी आणि पाण्याच्या मस्तीशी - भुशी डॅम यांना अगदी आसुसलोय... पावसा... राजा .. नको रे असा अंत पाहु..!

.. ये बाबा... आता तरी ये..!

Tuesday, 30 June 2009

नंबर्सचे लौजिक...

रोजच काही ना काही शिकायला मिळतं.... आत्ताच एका मित्राची मेल आली... नंबर्सचे लौजिक...अर्थात आपण जे १,२,३ अंक लिहितो [इंग्रजी मध्ये!] , त्यांना वन, टु, थ्री... का म्हणतो... किंवा त्यांचा आकार तसा का आहे.. किंवा वन ला टु आणि टु ला थ्री का म्हणत नाही? त्याच्या पाठीमागे अँगल्सचे लौजिक असतं म्हणे.. आजच कळाले!

वन या इंग्रजी अक्षरामध्ये एकच अँगल असतो.. टु मध्ये दोन, थ्री मध्ये तीन आणि अशाप्रकारे नाइन मध्ये नऊ अँगल्स असतात... तर झीरो एकही अँगल नसल्यामुळे गोल आहे!

हे प्रेझेन्टेशन पहा.. म्हणजे लक्षात येइल, मला काय म्हणायचे आहे ते..

वांद्रे-वरळी सी लिंक आणि राजकारण!

...राजकारण गेलं चुलीत म्हणतात ते काही खोटं नाही.. एवढा चांगला लिंकरोड झाला... लोकांची सोय झाली.. आणि राजकारण्यांना चेव चढलाय - नामांतराचा!



मला मात्र एक गोष्ट समजत नाही... नामांतरावरुन एवढा गोंधळ का? कशासाठी... ? राजीव गांधी किंवा सावरकरजी - दोघांच्याही नावाचे राजकारण करण्याची गरज नाही. सत्तारुढ पक्षाने "राजीव गांधी" असे नामकरण केले तर विरोधी पक्षाचे आक्षेप.... मात्र हाच पक्ष सत्तारुढ असता आणि सत्तारुढ विरोधी पक्ष असतात तर ही हे प्रकरण असेच रंगले असते.. तेंव्हा हा पक्ष योग्य आणि तो अयोग्य असे होत नाही ना? एखाध्याने चांगलं काम केलं तर त्यात पाय आडवा आणायलाच पाहिजे का? नामकरण ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले नाही तर असे लोक या रोडचा वापर करण्याचे सोडतील का? किंवा, सावरकरांचे नाव दिले तर सत्तारुढ पक्षाचे नेते या रोडवरुन येणे-जाणे वर्ज करतील.... दोन्हीही प्रश्न्नाचे उत्तर नाही, असेच आहे! मग वाद कशाला?
.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!

असो... वादावादी कीतीही चालो... आपण मात्र मुंबईला गेलो कि या रोडवरुन एक चक्कर जरुर मारणार! आतापर्यत परदेशात आणि सिनेमातच पाहिलेलं असे रोड आता आमच्या भारतात - मुंबईत ही आहे, असं अभिमानाने सांगण्यासाठी आणि तो अनुभव घेण्यासाठी!

Monday, 29 June 2009

वारीचे फोटो..

सकाळची सुरुवात चांगली झालीय... मित्राने वारीच्या फोटोची लिंक्स पाठवल्या होत्या..


[वरील फोटो - सुहास च्या पालखी या आल्बममधला आहे]

  • सुहास: सुहासच्या वेबसाइटवर "पालखी" आणि इतर आल्बम्स - गॅलरीज - खास बघण्यासारखे!

वेळ मिळाला तर एक नजर टाका.. ;)

Friday, 26 June 2009

ब्लॉग कँप - पुणे

परवाच्या अपघातामुळे - पायावर सुज असल्याने - मी आजचा पुणे ब्लौग कॅप अटेंन्ड नाही करु शकत... :(

या वर्षीही नाही... कधाचित पुढच्या वर्षी..!
आयोजक - प्रायोजक - संयोजक आणि हजर राहणारे ब्लौगर्स - सर्वांना धन्यवाद - शुभेच्छा!

Thursday, 25 June 2009

मायकल जॅक्सन - मे युर सोल रेस्ट इन पिस!

खास फॅन नसलो तरी.. बर्‍याचदा मित्राबरोबर तुझी गाणी ऐकली आहेत...
मंगेश राव [आमचे खास मित्र जे मायकल साहेबांचे अतिशय जबरी फॅन - एसी म्हणा हवं तर - आहेत] - आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.



मायकल - तुम्हाला चिरशांती लाभो!

Wednesday, 24 June 2009

मी माझाच अपघात पाहिला....!

पेट्रोल भरुन पंपाच्या बाहेर पडत होतो... अगदी १०-२० चे स्पीड.. इंडिकेटर लाऊन... तेवढ्यात..१८-१९ वर्षाचा एक नमुना... [ |- <- असा] जोरात येऊन माझ्या गाडीला ठोकतो... त्याच्या बाइकचे पुढचे चाक - माझ्या बाइकची बौडी यांच्या मध्ये माझा उजवा पाय...! मी गाडी बाजुला लावली... हेल्मेट काढुन खाली पाय ठेवला... तशी सर्रकन.. पायाची कळ चमकुन गेली... आतापर्यंत दाबुन ठेवलेला राग अन् शांतपणे सांगण्याचे मत - तिथेच संपले... खाड-खाड अशा तीन-चार त्याच्या कानाखाली वाजवल्या... तरीही राग शांत होत नव्हता... मात्र लोक म्हणाले - जाऊ दे..! त्याला त्याच्या वडिलांचा नंबर विचारुन फोन लावला.. तर नमुन्याने घरचा नंबर दिला.. आणि बघायला त्याचा भाऊ आला... आणि तोही धाकटा..!! वडील कोठे आहेत तर म्हणे बाहेर गेलेत.... तुझ्याकडे ड्रायव्हींग लायसेन्स आहे..... नाही..... मग तु असा गाडी घेऊन आलाच कसा ... वडिलांनी सांगितले - पेट्रोल भरुन आणायला.. धन्य!!
त्याच्या गाडीकडे पाहिले - पुढचे चाक बर्‍यापैकी वाकलेले..... हॅडलचा सेंट्रल बोल्ट - तुटलेला... एकंदरीत त्याच्या स्पीडची जाणीव करुन देत होते... पेट्रोल पंपावर एन्ट्री करताना एवढा स्पीड...अ‍ॅक्सिडेंडच्या जागेपासुन पेट्रोलची मशिन अगदी पाच - दहा फुटावर.. अर्थात .. त्याने माझ्या बाइकला ठोकले नसते तर त्या मशिनचे नक्कीच उदघाटन झाले असते! कदाचित मोठा बाका प्रसंग उदभवला असता..!


.... पुन्हा गाडीला कीक मारली आणि औफिसला पोहोचलो... संध्याकाळपर्यंत पाय सुजला होता.... एक पेनकिलर खाउन थोडा आराम मिळाला होता... मात्र चालताना पायात चांगलीच कळ मारत होते..!
उद्या विकेन्डला एक्स-रे काढावा म्हणतोय.. फ्रॅक्चरची उगाचच शंका नको...!